यशाचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर अथक परिश्रम करा-प्रा.नितीन बानुगडे – “आयआयबी” तर्फे आयोजित मार्गदर्शन मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
यशाचे रहस्य म्हणजे मागे हटणे नाही आणि अथक परिश्रम करणे आणि जर तुम्ही त्याचे पालन केले तर डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक बनण्याचा तुमचा दृढनिश्चय सार्थकी लागेल. “तुम्ही कोण आहात, यापेक्षा कोण होणार आहात, याचा विचार करा. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चांगले मार्गदर्शन घेण्यावर भर द्या. जितके जास्त कष्ट घ्याल, तितकेच मोठे यश मिळते. कुठलेही काम लहान, अवघड नसते. मनातून...
पुणेकरांनो लक्ष द्या! भिडे पूल तब्बल दीड महिन्यासाठी बंद – वाहनचालकांसाठी वाहतुकीचा मोठा बदल, पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर
पुणे मेट्रो कामासाठी ऐतिहासिक भिडे पूल वाहतुकीसाठी बंद – वाहनचालकांसाठी आव्हान निर्माण, प्रशासनाने केले पर्यायी मार्गाचे नियोजन पुणे | २१ एप्रिल २०२५ – पुणे शहरातील ऐतिहासिक आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भिडे पूल आजपासून तब्बल दीड महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे. पुणे मेट्रोच्या डेक्कन स्थानकाजवळील पादचारी पुलाच्या कामासाठी हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे डेक्कन, कर्वे रस्ता, नारायण पेठ,...
वारजे माळवाडीत दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांचा शिताफीने पकड! लोखंडी हत्यारांसह दोन आरोपी अटकेत
पुणे | प्रतिनिधी :- पुणे शहरातील वारजे माळवाडी परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला आव्हान ठरणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट ३ व वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल पथकाने संयुक्तरित्या शिताफीने अटक केली आहे. दि. ८ जून २०२५ रोजी, बीट मार्शल पथक गस्त घालत असताना फिर्यादी इसमाने आहेरगाव गाव कमानीजवळ पोलिसांना थांबवून माहिती दिली की, त्याच्या मित्रांनी...
खून करून स्वतः पोलीस ठाण्यात हजर झालेल्या नराधमास अटक!
पुणे – दिनांक २३ मे २०२५ रोजी एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना पुणे शहरात उघडकीस आली. यवत येथील रहिवासी राहुल शिवाजी मिसाळ (वय ३२) याने आपल्या नातेवाईक असलेल्या अनिता ऊर्फ कमल विक्रम लोंढे (वय २८) या तरुणीचा गळा दाबून खून केल्याची कबुली स्वतः यवत पोलीस ठाण्यात हजर होऊन दिली. राहुल मिसाळ याने यवत पोलीस ठाण्यात जाऊन सांगितले...
पुणे: माजी नगरसेवक रफिक शेख यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती!
पुणे: पुण्याचे माजी नगरसेवक रफिक शेख यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती: या सोहळ्यात काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यामध्ये मंत्री आरिफ नसीम खान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस नाना गवंडे, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद...
पुण्यातील बाणेरमध्ये स्पावर पुणे पोलिसांचा छापा; तीन महिलांची सुटका, व्यवस्थापक अटकेत, वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश!.
पुणे, ५ डिसेंबर २०२४ – पुणे शहर गुन्हे शाखेने ३ डिसेंबर रोजी बाणेर येथील एका स्पावर छापा टाकून वेश्याव्यवसाय चालवल्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून व्यवस्थापकासह एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही धडक कारवाई बाणेर रोडवरील बापूसाहेब मुरकुटे पाटील कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ‘मून थाई स्पा’ या केंद्रावर करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकाराची...
पुणे पोलिसांची मोठी कारवाई: १२ लाखांहून अधिक किंमतीचा मॅफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त; फरासखाना हद्दीत कारवाई
पुणे :- पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत एक मोठी आणि यशस्वी कारवाई अंमलात आणली आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. २ ने एकूण १२,१२,३६० रुपये किंमतीचा सुमारे ५९.४०० ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा घातक अंमली पदार्थ जप्त करत एक व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवार पेठ, बाटा बोळ, लक्ष्मी रोड परिसरात पार...
बाणेर पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडी करणारे सराईत चोरटे जेरबंद; लाखोचा मुद्देमाल जप्त
पुणे – बाणेर परिसरातील घरफोडीच्या मालिकांमुळे त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. बाणेर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने कौशल्यपूर्ण आणि कसोशीनं केलेल्या तपासातून ५४ लाखांहून अधिक रकमेच्या घरफोडी गुन्ह्याचा छडा लावत पाच सराईत आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला सोने, दुचाकी आणि मोबाईलसह लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरीचा थरार – तपशीलवार हकीगत: दि. ७ जून ते ९...
कुणाल कामराला त्याची जागा दाखवत शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल!
मुंबई – विनोदी कलाकार आणि स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिला आहे. मात्र, यावेळी त्याचे वक्तव्य थेट शिवसेनेच्या रडारवर आले असून, पक्षाने त्याला सडेतोड प्रत्युत्तर देत त्याची जागा दाखवली आहे. शिवसेनेने ठाम शब्दांत स्पष्ट केले आहे की, "महाराष्ट्राच्या अस्मितेचा, सत्ताधाऱ्यांचा आणि हिंदुत्वाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही." शिवसेनेची कडक भूमिका – महाराष्ट्रद्रोही वक्तव्यांना थारा नाही! कुणाल कामरा...
पुण्यापासून दुबईला जाणाऱ्या उड्डाणात सातत्याने उशीर; विमानतळ प्रशासनाने कारण न सांगणे प्रवाशांमध्ये संताप
पुण्यातील लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुणे ते दुबई हा जनता ट्रॅप असतो, असं अनेक प्रवाशांनी तक्रारीत म्हटलं आहे. गेल्या सात दिवसांत या मार्गावर अर्धा तास ते अडीच तासांपर्यंत सतत विलंब होत आहे, मात्र विमानतळ प्रशासनाकडून कोणत्याही कारणाची अधिकृत माहिती प्रवाशांना दिलेली नाही. विशेष म्हणजे, स्पाइसजेटच्या SG‑51 विमानाला २४ जुलै रोजी ३६ मिनिटे, २५ जुलै रोजी २ तास २० मिनिटे, २६ जुलै...














