Home Breaking News बाणेर पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडी करणारे सराईत चोरटे जेरबंद; लाखोचा मुद्देमाल जप्त

बाणेर पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडी करणारे सराईत चोरटे जेरबंद; लाखोचा मुद्देमाल जप्त

171
0
पुणे – बाणेर परिसरातील घरफोडीच्या मालिकांमुळे त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. बाणेर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने कौशल्यपूर्ण आणि कसोशीनं केलेल्या तपासातून ५४ लाखांहून अधिक रकमेच्या घरफोडी गुन्ह्याचा छडा लावत पाच सराईत आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला सोने, दुचाकी आणि मोबाईलसह लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
 चोरीचा थरार – तपशीलवार हकीगत:
दि. ७ जून ते ९ जून २०२५ दरम्यान, बाणेर परिसरातील मुक्ता रेसीडेन्सी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून सुमारे ₹५,४३,५००/- किमतीचे सोनं, चांदी व रोख रक्कम चोरली होती. गुन्हा बाणेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
तपासासाठी फक्त सीसीटीव्ही फुटेज हा एकमेव पुरावा असल्याने पोलीसांनी मोठ्या चिकाटीने संपूर्ण परिसरातील विविध अँगल्समधील फुटेज तपासले. त्यामधून मिळालेल्या संशयास्पद हालचालींच्या आधारे तपास पुढे नेत शाहरुख फारुख शेख (वय २१), गुलफान नफिस अन्सारी (वय १९), अर्जुन गणपत गायकवाड (वय १९) या तिघांना अटक करण्यात आली.
त्यांच्याकडून:
८०.४२२ ग्रॅम सोन्याचे दागिने
चोरीतील पैशातून खरेदी केलेली दुचाकी
२ मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
तसेच याच टोळीने दुसऱ्या गुन्ह्यात चोरी केलेली पल्सर १२० दुचाकी देखील हस्तगत करण्यात आली.
 दुसऱ्या प्रकरणातही यश
दुसऱ्या गुन्ह्यात, तळेगाव दाभाडे परिसरातील जबरी चोरीच्या घटनेतील आरोपी सनी खंडागळे (वय २०) आणि कार्तिक पोटफोडे (वय १८) यांना अटक करून जबरदस्तीने हिसकावलेला मोबाईल जप्त करण्यात आला.
 पोलिसांची मेहनत आणि यशस्वी कारवाई
ही संपूर्ण कामगिरी अपर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त श्री. सोमय मुंढे, सहायक पोलीस आयुक्त श्री. विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत व त्यांची टीम — पोउपनि के.बी. डाबेराव, संदेश माने, अंमलदार बाबा आहेर, किसन शिंगे, आप्पा गायकवाड, अतुल इंगळे यांचा मोलाचा वाटा होता.
घरफोडीच्या मालिकेचा पर्दाफाश! बाणेर पोलिसांकडून पाच आरोपी अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त