महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 176

बागेश्वरधाम महाराष्ट्र सेवा समिती आणि रिक्षा संघटनेकडून भव्य श्रीराम जन्मोत्सव सोहळा!

0

पुणे:-  पुण्यात बागेश्वरधाम महाराष्ट्र सेवा समिती आणि रिक्षा संघटनेच्या वतीने अत्यंत भव्य आणि भक्तीमय वातावरणात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यात हजारो रामभक्तांनी सहभाग घेतला असून, संपूर्ण परिसर श्रीरामाच्या जयघोषांनी दुमदुमून गेला. रामनामाचा जयघोष आणि भक्तीमय वातावरण श्रीराम नवमीच्या निमित्ताने बागेश्वरधाम महाराजांचे भक्त आणि रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा...

काळेपडळ पोलिसांची अवैध दारु अड्ड्यावर मोठी कारवाई; २०६५ लिटर हातभट्टी दारू जप्त, एक आरोपी अटकेत!

0

पुणे | प्रतिनिधी :- पुणे शहरातील अवैध दारू विक्रीविरोधात मोठी मोहीम राबवित काळेपडळ पोलीस ठाण्याच्या पथकाने एका अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा मारून तब्बल २०६५ लिटर दारूसाठा जप्त केला आहे. सदर कारवाईत एक आरोपीस अटक करण्यात आली असून पोलिसांनी ही धाडसत्र प्रभावीपणे पार पाडले. दि. ११ जून २०२५ रोजी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस तपास पथकाने...

पुण्यात 3 महिलांना वृद्ध नागरिकाला ‘हनी-ट्रॅप’ आणि ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटक; एक पोलिस कर्मचारी फरार.

0

पुण्यात तीन महिलांनी वृद्ध नागरिकाला 'हनी-ट्रॅप' करून ₹5 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक; एक पोलिस उपनिरीक्षक फरार पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी शनिवारी तीन महिलांना वृद्ध नागरिकाला 'हनी-ट्रॅप' करून ₹5 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केली आहे. हा प्रकार 29 जुलै रोजी घडला. पोलिस तपासात चौथा आरोपी म्हणून पोलिस उपनिरीक्षक काशीनाथ मारुती उभे यांचे नाव समोर आले आहे. उभे यांनी महिलांना सक्रियपणे मदत...

“भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती पिंपरी-चिंचवड महापालिकेत उत्साहात साजरी”

0

पिंपरी : भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी डॉ. कलाम यांच्या अद्वितीय योगदानाची आठवण करून देत, भारताच्या संरक्षण क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते,...

चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू; ‘एकी हेच बळ’चा उत्तम प्रत्यय!

0

चाकण – शिक्रापूर रस्त्यावर अनेक महिन्यांपासून खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नव्हते. स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन सातत्याने आवाज उठवल्यानंतर अखेर प्रशासनाने जाग घेतली असून आजपासून खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केली जात असून, नागरिकांच्या एकतेमुळेच हे शक्य झाले आहे. ‘एकी हेच बळ’ या उक्तीचा प्रत्यय...

पुण्यातील गोल्फ प्रेमींना लोहमन्य ओपन गोल्फ चॅम्पियनशिपचा आनंददायी अनुभव; स्पर्धेत शहरातील अनेक दिग्गज सहभागी.

0

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध पुणे गोल्फ क्लब येथे आयोजित लोहमन्य ओपन गोल्फ चॅम्पियनशिप या प्रतिष्ठित स्पर्धेत शहरातील गोल्फ प्रेमींसाठी खास सोहळा रंगला. ही स्पर्धा लोहमन्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित करण्यात आली होती. या उद्घाटन सोहळ्यात संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पुणे क्लबचे उपाध्यक्ष इंद्रनील मुझगुले, गोल्फ कॅप्टन जय शिरके, लोहमन्य सोसायटीचे पुणे विभागीय...

पुणे सीसीटीव्ही व्हिडिओ: भिगवणमध्ये कार शिकणाऱ्या व्यक्तीच्या गाडीखाली सापडून सायकल चालवणाऱ्या १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू

0

धक्कादायक घटनेत, पुण्याच्या भिगवण भागात सायकल चालवत असलेल्या १० वर्षांच्या मुलाला कार शिकणाऱ्या व्यक्तीने चिरडले. मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सुषील शिंदे हे आपल्या कुटुंबासोबत भिगवण परिसरात राहतात आणि ते चित्रकार म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा समर्थ भिगवणमधील आदर्श विद्या मंदिरात...

संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत संगमनेर सेवा समितीचा ऐतिहासिक विजय; सौ. मैथिलीताई सत्यजित तांबे नगरअध्यक्षपदी दणदणीत निवड

0

संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांनी प्रचंड बहुमतासह ऐतिहासिक विजय मिळवत राजकीय वर्तुळात आपली ताकद सिद्ध केली आहे. या निवडणुकीत नगरअध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. मैथिलीताई सत्यजित तांबे यांनी सर्वाधिक मतांनी विजय संपादन करत जनतेचा विश्वास पुन्हा एकदा जिंकला आहे. त्यांच्या या दणदणीत विजयामुळे संगमनेर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेरच्या जनतेने माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या...

गांज्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी उधळली! — अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई, २६ किलो गांजासह रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद

0

पुणे प्रतिनिधी | पुणे शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहीमेअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथक १ (क्राईम ब्रँच, पुणे शहर) यांनी एका मोठ्या कारवाईत २६ किलो ८० ग्रॅम गांजासह एक रेकॉर्डवरील गुन्हेगार अटक केला आहे. आरोपीकडून मोटार गाडी, मोबाईलसह एकूण २१.१६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी कोण? अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव अनिल ऊर्फ अण्णा सुभाष राख (वय...

येरवडा पोलिसांची शिताफी! मकोका अंतर्गत फरार आरोपीला थरारक पाठलाग करून जेरबंद — पुणे पोलीस गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

0

पुणे — शहरात संघटित गुन्हेगारीवर कडक कारवाई सुरू असताना येरवडा पोलिसांनी मकोका अंतर्गत फरार असलेल्या आरोपीला नाट्यमय पाठलाग करून पकडत मोठी कामगिरी बजावली आहे. अनेक दिवसांपासून पोलिसांना चकवा देणारा आणि सतत मोबाईल नंबर, वास्तव्य व ओळख बदलत फिरणारा आरोपी अखेर कायद्याच्या कचाट्यात अडकला. 🔸 गुन्ह्याची पार्श्वभूमी — गंभीर कलमांखाली दाखल गुन्हा येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गु.र. नं. ४३६/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता...

Copyright ©