Home Breaking News काळेपडळ पोलिसांची अवैध दारु अड्ड्यावर मोठी कारवाई; २०६५ लिटर हातभट्टी दारू जप्त,...

काळेपडळ पोलिसांची अवैध दारु अड्ड्यावर मोठी कारवाई; २०६५ लिटर हातभट्टी दारू जप्त, एक आरोपी अटकेत!

182
0

पुणे | प्रतिनिधी :- पुणे शहरातील अवैध दारू विक्रीविरोधात मोठी मोहीम राबवित काळेपडळ पोलीस ठाण्याच्या पथकाने एका अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा मारून तब्बल २०६५ लिटर दारूसाठा जप्त केला आहे. सदर कारवाईत एक आरोपीस अटक करण्यात आली असून पोलिसांनी ही धाडसत्र प्रभावीपणे पार पाडले.

दि. ११ जून २०२५ रोजी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस तपास पथकाने हद्दीत गस्त घालत असताना, सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे व त्यांच्या टीमला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संतोषनगर, हांडेवाडी रोड परिसरातील कंजारभाट वस्तीत एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ दारूचा साठा करून विक्री केली जात आहे.

बातमीच्या आधारे त्वरित सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान दारू विक्री करणारा आरोपी नवीन दिलीप बिनावत (वय ५४) यास रंगेहात ताब्यात घेण्यात आले. सदर ठिकाणाहून पोलिसांनी ५३ कॅन व १ मोठ्या बॅरलमध्ये भरलेली हातभट्टीची २०६५ लिटर तयार दारू (एकूण किंमत ₹४,१३,०००/-) हस्तगत केली आहे.

याबाबत काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २२५/२०२५ भा. न्या. सं. कलम १२३ सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या आदेशानुसार व पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार दाऊद सय्यद, अतुल पंधरकर, खोकले, महादेव शिंदे, अमोल फडतरे, शाहीद शेख, नितीन ढोले, प्रविण कांबळे, परशुराम पिसे यांनी अत्यंत निपुणतेने सहभाग घेतला.

ही कारवाई अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, पुणे शहरातील अशा बेकायदेशीर धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांची भूमिका अधोरेखित करते.

विशेष निरीक्षण:

पुणे शहरात अवैध दारू विक्री विरोधात केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सातत्याने केला जात आहे.

स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केल्यास अशा अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवता येऊ शकते.