Home Breaking News संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत संगमनेर सेवा समितीचा ऐतिहासिक विजय; सौ. मैथिलीताई सत्यजित तांबे...
संगमनेरच्या जनतेने माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या दूरदृष्टीपूर्ण, विकासाभिमुख आणि लोकहितवादी नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त केला आहे. जनतेने दिलेला हा कौल अभूतपूर्व असून, तो थोरात साहेबांच्या गेल्या अनेक वर्षांच्या कार्याची पोचपावती असल्याचे मानले जात आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघटित कार्यशैलीमुळे संगमनेर सेवा समितीला हा मोठा विजय मिळाल्याचे बोलले जात आहे.