महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 107

तामिळनाडू व पुडुचेरीसाठी स्क्रीनिंग कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक – आगामी विधानसभा निवडणुकांसाठी संघटनात्मक बळकटीवर भर

0

तामिळनाडू व पुडुचेरीसाठी गठित करण्यात आलेल्या स्क्रीनिंग कमिटीच्या महत्त्वपूर्ण बैठकीस सदस्य म्हणून उपस्थित राहण्याची संधी लाभली. या बैठकीचे अध्यक्षस्थान माननीय श्री टी. एस. सिंग देव यांनी भूषविले. पक्षाच्या संघटनात्मक रचनेला अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभावी रणनीती आखण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली. या बैठकीस स्क्रीनिंग कमिटीचे सदस्य श्री जी. सी. चंद्रशेखर आणि श्री अनिल कुमार यादव,...

दिव्यांग बांधवांच्या मतदान जनजागृती रॅलीतून लोकशाहीचा देण्यात आला सशक्त संदेश

0

पिंपरी: मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो… माझं मत, माझा अधिकार… मतदान हा हक्क आमचा, लोकशाहीचा अभिमान आमचा... या घोषणांच्या गजरात दिव्यांग मतदारांनी लोकशाहीच्या सशक्ततेचा संदेश देत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित मतदान जनजागृती रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त...

खळबळजनक! राजस्थानमध्ये खून करून पुण्यात लपलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या – बंडगार्डन पोलिसांची मोठी कामगिरी!

0

पुणे: राजस्थानमध्ये एका ३२ वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून करून पुण्यात लपून बसलेल्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला पुणे शहराच्या बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.  काय आहे संपूर्ण प्रकरण? राजस्थानमधील सोजत सिटी (पाली जिल्हा) येथे कमलेश जेठाराम मेवाड (वय ३२) याच्या बेपत्ता होण्याची तक्रार त्याच्या वडिलांनी सोजत सिटी पोलिस ठाण्यात नोंदवली होती. मात्र, काही...

नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची संरचना तयार करणार – सभापती संजय नाना काटे

0

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन त्यांच्या जीवनमानात अधिक सुधारणा करण्यासाठी नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची सर्वसमावेशक संरचना तयार करण्यात येणार आहे. शहराचा विकास करताना नागरिकांच्या आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत नियोजनबद्ध पद्धतीने कामे राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहर सुधारणा समितीचे सभापती संजय नाना काटे यांनी दिली. शहर सुधारणा समितीची बैठक महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील...

पुण्यात हवेत सुरक्षिततेसाठी प्रखर बीम लाइट व लेझर बीम लाइट वापरण्याचे आदेश जारी

0

पुणे – पुणे शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि विमानतळाच्या हवेत चालू असलेल्या विमान वाहतुकीसाठी विशेष महत्वाचे निर्णय घेतले आहेत. पोलिस उप–आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांच्या आदेशानुसार, लोढावळा टेक्नीकल विमानतळ व नागरिक विमानतळ परिसरात दिवसाच्या वेळा तसेच रात्रीच्या वेळा दरम्यान प्रखर बीम लाइट (Search Beam Light) व लेझर बीम लाइटचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम...

युनिट ६ गुन्हे शाखेची कारवाई; उत्तरपत्रिकांचे सहा बंडल, २ लाखांहून अधिक रोकड जप्त; शिक्षण संस्थेच्या नावाला काळिमा

0

पुण्यात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. वाघोली येथील पार्वतीबाई गेणबा मोझे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी संगनमत करून परीक्षेत मोठा गैरप्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकाने या टोळीवर कारवाई करत प्राध्यापकासह तीन विद्यार्थ्यांना अटक केली असून आठ इतर विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. कारवाईचा तपशील: युनिट ६ चे सहाय्यक पोलीस...

दक्षिण मुंबई पोलिसांची मोठी कारवाई: ८५ हरवलेले आणि चोरीला गेलेले फोन शोधून दिले

0

दक्षिण मुंबई पोलिसांनी दाखवलेले कौशल्य आणि तत्परता यामुळे ८५ हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल फोन मालकांना परत मिळाले आहेत. या कारवाईत २०६ संशयितांना अटक करण्यात आली असून, हरवलेले फोन IMEI (इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी) नंबरच्या साहाय्याने शोधण्यात आले. फोन परत मिळाल्यावर मालकांचा आनंद ओसंडून वाहत आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्यावर संबंधित नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिस अधिकारी म्हणाले, "फोन मिळाल्यावर मालकांच्या...

पुण्यात भाजी विक्रेत्या महिलेचा विनयभंग; कथित नगरसेवकाच्या फोन कॉलने खळबळ.

0

पुणे, १३ डिसेंबर २०२४: वडगाव शेरी भागातील कथित नगरसेवकाने एका भाजी विक्रेत्या महिलेला फोन करून "मी तुला आवडतो, तुझ्या दुकानावर येतो" असे म्हणत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला, वय ३०, हिने दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर रोजी सकाळी सव्वा सात वाजता तिच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून...

पुण्यातील थंडी कायम राहणार; नववर्षात आणखी गारठा वाढण्याचा इशारा – हवामान विभाग

0

पुणे | प्रतिनिधी — गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि राज्यात जाणवणारी थंडी पुढील काही दिवस कायम राहणार असून, नववर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात गारठा आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. त्यामुळे यंदाचा हिवाळा अधिक काळ टिकणार असून, पुणेकरांना सुखद पण बोचरी थंडी अनुभवायला मिळणार आहे. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे, स्वच्छ आकाश आणि कोरडे हवामान यामुळे...

खडकवासला धरणातून विसर्गात वाढ! पुणेकरांनो सतर्क रहा – २८६६२ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू

0

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खडकवासला पाटबंधारे विभागाने धोक्याचा इशारा दिला आहे. आज, दिनांक २८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता खडकवासला धरणातून विसर्ग वाढवून २५,६९६ क्युसेक्स वरून तब्बल २८,६६२ क्युसेक्स इतक्या वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे मुळा आणि मुठा नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धरणातील सद्यस्थिती: क्र. धरणाचे नाव साठा टक्केवारी (%) सुरू असलेला विसर्ग (क्युसेक्स) 1 वरसगाव ९२.३७ % ९०७४ 2 पानशेत ९२.६९...

Copyright ©