पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खडकवासला पाटबंधारे विभागाने धोक्याचा इशारा दिला आहे. आज, दिनांक २८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता खडकवासला धरणातून विसर्ग वाढवून २५,६९६ क्युसेक्स वरून तब्बल २८,६६२ क्युसेक्स इतक्या वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे मुळा आणि मुठा नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

धरणातील सद्यस्थिती:
| क्र. | धरणाचे नाव | साठा टक्केवारी (%) | सुरू असलेला विसर्ग (क्युसेक्स) |
|---|---|---|---|
| 1 | वरसगाव | ९२.३७ % | ९०७४ |
| 2 | पानशेत | ९२.६९ % | ६२८८ |
| 3 | खडकवासला | ७७.०७ % | २५६९६ (वाढवून २८६६२ क्युसेक्स) |





