Breaking News

Home Breaking News Page 277

प्रामाणिकपणाचा झळाळता दीपस्तंभ! – अनिल सोनवणे यांनी सापडलेली ५० हजारांची सोन्याची अंगठी केली प्रामाणिकपणे सुपूर्त; सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव

0

शिरूर, पुणे | आजच्या भौतिकवादी युगात स्वार्थी वृत्तीने ग्रासलेल्या समाजात, प्रामाणिकतेचा उजळ व अनुकरणीय आदर्श निर्माण करणारी घटना घडली आहे. शिरूर तालुक्यातील बो-हाडे मळा येथील 'हॉटेल वैभव'चे मालक अनिल सोनवणे यांनी सापडलेली ५० हजार रुपयांची सोन्याची अंगठी आणि महत्वाची कागदपत्रे संबंधित व्यक्तीकडे पोलीसांच्या उपस्थितीत सुपूर्त केली. या प्रामाणिकपणाच्या उदाहरणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाकिट सापडल्यापासून सुपूर्त होईपर्यंतची घटना घटना काही दिवसांपूर्वीची. हॉटेल...

संतोष देशमुख हत्या प्रकरण : फरार आरोपी पुण्यातून ताब्यात, सुरेश धस म्हणाले – अजून मुख्य सूत्रधार राहिला आहे

0

बीड: मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई झाली आहे. आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना बीड पोलिसांच्या विशेष पथकाने पुण्यातून ताब्यात घेतले आहे. या दोघांना पुढील तपासासाठी सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी दिली. या कारवाईनंतर या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा भाष्य...

“राज्यसेवेतील खेळाडूंना न्याय मिळालाच पाहिजे!” – आमदार अमित गोरखे यांची विधान परिषदेत जोरदार मागणी; उच्चस्तरीय बैठकीची गरज अधोरेखित

0

 मुंबई, विधान भवन :- राज्य शासनाच्या विशेष कोट्यातून थेट नियुक्त झालेल्या आणि देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना गेल्या १२ वर्षांपासून शासनाच्या मूलभूत लाभांपासून वंचित ठेवले जात असल्याने, विधान परिषदेत आमदार अमित गोरखे यांनी या अन्यायाविरुद्ध जोरदार आवाज उठवला. गोरखे यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेण्याची मागणी करत स्पष्ट सांगितले की, "खेळाडूंना सन्मान मिळालाच पाहिजे. त्यांनी देशासाठी योगदान दिले असून त्यांच्यावर...

खराडीतील एन.डी.पी.एस. गुन्ह्याचा तपास गाजला; आरोपी प्रांजल खेवलकरवर सायबर गुन्ह्याचा नवा गुन्हा दाखल

0

पुणे – पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने खराडी पोलीस ठाण्यातील एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपी प्रांजल मनिष खेवलकर याच्याविरोधात आता आणखी गंभीर सायबर गुन्हा उघडकीस आला आहे. महिला फिर्यादीच्या तक्रारीनुसार, सन २०२२ ते जून २०२५ दरम्यान आरोपी खेवलकर याने वेगवेगळ्या ठिकाणच्या लॉजवर फिर्यादीच्या परवानगीशिवाय तिचे निवस्त्र अवस्थेतील फोटो,...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीत अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न

0

पिंपरी, शगुन चौक: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री सामाजिक संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला अभिवादन कार्यक्रम यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे शिवसेना मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन होणे. कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार गौतम...

सांगलीत भीषण अपघातात नवविवाहितेचा जागीच मृत्यू; पती गंभीर जखमी – नव्या आयुष्याची सुरुवात होण्याआधीच काळाने हिरावलं स्वप्न

0

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला आहे. नुकतीच लग्न झालेल्या नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाला असून, तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. एका भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. नवविवाहितेच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून, संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेचा तपशील – ही दुर्घटना सांगली जिल्ह्यातील येरळा घाटाच्या परिसरात घडली. नवविवाहित जोडपं दुचाकीवरून जात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबई विमानतळावर आगमन; राज्य नेतृत्वाकडून भव्य स्वागत

0

मुंबई : देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांचे आज दुपारी मुंबई विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी राज्यातील वरिष्ठ नेते आणि मंत्रिमंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधानांच्या आगमनाने विमानतळ परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री Eknath Shinde, उपमुख्यमंत्री Sunetra Ajit Pawar, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan, मंत्री Mangal Prabhat Lodha, मंत्री Ashish Shelar, मंत्री...

नवभारत टाइम्सच्या ७५व्या स्थापना दिनानिमित्त विलेपार्ले येथे भव्य सोहळा; मान्यवरांची उपस्थिती

0

मुंबई : विलेपार्ले येथे आयोजित Navbharat Times च्या ७५व्या स्थापना दिन सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरणात उपस्थित राहण्याची संधी मिळाली. गेल्या सात दशकांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या या वृत्तपत्राने सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींवर प्रभावीपणे प्रकाश टाकत वाचकांचा विश्वास संपादन केला आहे. या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis, खासदार Milind Deora तसेच Maharashtra Times चे संपादक पराग...

लातूर जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळी; एकूर्गा गटात काँग्रेस–महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार

0

लातूर | ग्रामीण प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, एकूर्गा जिल्हा परिषद गटातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. दत्तात्रय काकासाहेब टेकाळे आणि एकूर्गा पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ. पूजा गणेश ढगे यांच्या प्रचारासाठी मुरूड अकोला येथे भव्य कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मतदारांशी थेट...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय; दारूबंदी, डीजेबाबत पुनीत बालन यांचा महत्त्वाचा निर्धार आणि कोकणवासीयांसाठी एसटीची खास सोय

0

पुणे : लाडक्या गणरायाच्या आगमनाला आता अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. पुणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरात गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. मंडप उभारणी, मूर्तींचे आगमन, सजावट आणि सामाजिक उपक्रमांची लगबग सुरू आहे. उत्सव मोठ्या प्रमाणात आणि शांततेत साजरा व्हावा यासाठी प्रशासनाने आणि पोलिस यंत्रणांनी सज्जता दाखवली आहे. दारू विक्रीवर बंदी गणेशोत्सवाच्या काळात अनुचित प्रकार होऊ नयेत आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न...

Copyright ©