Home Breaking News खराडीतील एन.डी.पी.एस. गुन्ह्याचा तपास गाजला; आरोपी प्रांजल खेवलकरवर सायबर गुन्ह्याचा नवा गुन्हा...

खराडीतील एन.डी.पी.एस. गुन्ह्याचा तपास गाजला; आरोपी प्रांजल खेवलकरवर सायबर गुन्ह्याचा नवा गुन्हा दाखल

72
0
पुणे – पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने खराडी पोलीस ठाण्यातील एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपी प्रांजल मनिष खेवलकर याच्याविरोधात आता आणखी गंभीर सायबर गुन्हा उघडकीस आला आहे.
महिला फिर्यादीच्या तक्रारीनुसार, सन २०२२ ते जून २०२५ दरम्यान आरोपी खेवलकर याने वेगवेगळ्या ठिकाणच्या लॉजवर फिर्यादीच्या परवानगीशिवाय तिचे निवस्त्र अवस्थेतील फोटो, व्हिडिओ व ऑडिओज मोबाईलमध्ये कैद केले. यामध्ये त्याने फिर्यादीच्या गोपनीयतेचा आणि खाजगी जीवनाचा भंग करून भविष्यात त्याचा गैरवापर करण्याचा उद्देश ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही बाब प्रकाशात आल्यानंतर, महिला आयोगाच्या पत्रानुसार आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे अधिक तपास करण्यात आला. अखेर फिर्यादीने १४ ऑगस्ट २०२५ रोजी सायबर पोलीस ठाण्यात हजर राहून औपचारिक तक्रार दाखल केली. त्यानुसार, आरोपी प्रांजल खेवलकर याच्याविरुद्ध सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं. ८८/२०२५ भा.दं.वि. कलम ७७ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६(ई) अंतर्गत नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा व ऑनलाइन खाजगी माहितीच्या गैरवापराचा मुद्दा गंभीरपणे पुढे आला आहे. नागरिकांना पोलिसांनी आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा आणि कोणत्याही प्रकारचा दबाव अथवा ब्लॅकमेलिंग सहन करू नये.
या दाखल गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर करीत आहेत.