Home Breaking News बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीत अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीत अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न

88
0
पिंपरी, शगुन चौक: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री सामाजिक संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला अभिवादन कार्यक्रम यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे शिवसेना मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन होणे.
कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार गौतम चाबुकस्वार, युवासेना प्रमुख चेतन पवार, मराठवाडा जनसंघ अध्यक्ष अरुण पवार, पिंपरी विधानसभाप्रमुख तुषार नवले, चिंचवड विधानसभा प्रमुख हरेश नखाते यांचा समावेश होता.
तसेच, उपजिल्हा प्रमुख दस्तगीर मणियार, संतोष पवार, संतोष सौदनकर, संदीप भालके, निखिल दळवी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. महिला पदाधिकारी माजी जिल्हा संघटिका सुनिता चव्हाण, पिंपरी विधानसभा संघटिका वैशाली कुलथे, सुषमा शेलार, यास्मिन शेख यांनीही कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमादरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या विचारांवर आधारित प्रबोधनपर भाषणे करण्यात आली. उपस्थित नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.