Breaking News

Home Breaking News Page 26

पुणे मेट्रोमध्ये आजपासून एएफसी गेट्स ‘क्लोज्ड बाय डिफॉल्ट’; तिकीट स्कॅन केल्यावरच प्रवेश

0

पुणे : Pune Metro प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसह शिस्तबद्ध प्रवास सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आजपासून सर्व मेट्रो स्थानकांवरील एएफसी (Automatic Fare Collection) गेट्स पूर्वस्थितीत उघडे न राहता बंद असतील. प्रवाशांनी तिकीट किंवा स्मार्ट कार्ड मशीनवर स्कॅन केल्यानंतरच हे दरवाजे उघडतील. यापूर्वी काही स्थानकांवर गेट्स अंशतः उघडे असत, मात्र नव्या प्रणालीमुळे केवळ वैध तिकीटधारकांनाच प्रवेश मिळणार आहे. हा बदल...

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड भाजपच्या वतीने ‘समर्पण दिन’ साजरा

0

पिंपरी चिंचवड (दि. ११ फेब्रुवारी २०२६): भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्थान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी आणि 'समर्पण दिन' भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजप कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार...

पुणे शहरात पोलीस दलाची व्यापक नाकाबंदी – वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर मोठी कारवाई!

0

 पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने संपूर्ण शहरभर मोठ्या प्रमाणावर प्रभावी नाकाबंदी राबवली. या कारवाईत शहरातील प्रमुख रस्ते, चौक, आणि रहदारीच्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत एकाच वेळी ७८ ठिकाणी कठोर नाकाबंदी लावण्यात आली होती. पोलीस दलाची व्यापक यंत्रणा रस्त्यावरया मोहिमेसाठी ४ अपर पोलीस आयुक्त, ५ परिमंडळीय पोलीस उपायुक्त, १० विभागीय सहायक पोलीस आयुक्त,...

नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक व डिजिटल होणार: मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचा नोंदणी व मुद्रांक विभागाचा सखोल आढावा

0

पुणे, राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करून नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि कालबद्ध सेवा देण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी शनिवारी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाचा सविस्तर आढावा घेतला. सकाळी १० ते दुपारी १२:३० या कालावधीत झालेल्या या बैठकीत विभागाच्या प्रशासकीय, तांत्रिक तसेच नागरिक-केंद्रित सेवांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. नोंदणी सेवा अधिक सोपी व पारदर्शक...

कुवैतहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाची मुंबईत इमर्जन्सी लँडिंग! सुरक्षा यंत्रणेत खळबळ

0

मुंबई : कुवैतहून हैदराबादकडे निघालेल्या इंडिगोच्या विमानाला अचानक मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. या घटनेमुळे विमानतळावर काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. विमानात असलेल्या प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षादल, CISF, एअरपोर्ट ऑपरेशन्स आणि बॉम्ब स्क्वॉड एका क्षणात सक्रिय झाले. प्राथमिक माहितीनुसार, उड्डाणादरम्यान विमानाच्या सुरक्षा विभागाला एक तांत्रिक संशयास्पद अलर्ट प्राप्त झाला. त्यानंतर वैमानिकाने तत्काळ प्रोटोकॉलनुसार मुंबई एअरपोर्टला डिव्हर्ट करण्याचा निर्णय...

पुणे पोलिसांची कारवाई: १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन, पिस्तूल जप्त; दोघांना अटक.

0

पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने (युनिट २) आणि खंडणीविरोधी पथकाने (युनिट २) संयुक्त कारवाईत मोठा गुन्हा रोखत दोन कुख्यात आरोपींना अटक केली. या कारवाईत ₹१४.६ लाख रुपयांचे मेफेड्रोन (एमडी), एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गुन्ह्याची माहिती व आरोपींची ओळख: अटक करण्यात आलेले आरोपी आहेत: बॉबी भगवान सुरवसे (२८) - गजराज...

“राहुल गांधींच्या आजोबांचे आजोबासुद्धा संविधान बदलू शकत नाहीत”: रामदास आठवले यांचे नवी मुंबईत भाषण.

0

नवी मुंबई - केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नवी मुंबईतील कामोठे येथे झालेल्या भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारसभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना जोरदार टोला लगावत त्यांचे संविधान बदलण्याचे आरोप फेटाळून लावले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाला कोणीही बदलू शकत नाही, असे आठवले यांनी ठामपणे सांगितले. “राहुल गांधींच्या आजोबांचे आजोबासुद्धा संविधान बदलू शकत नाहीत,” असे ते...

पुणे अपघात व्हिडिओ: राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याच्या भरधाव गाडीची पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकीला धडक; 1 ठार”.

0

हा अपघात रविवारी मध्यरात्री सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर कळंबजवळ घडला, जिथे आमदारांच्या पुतण्याने एका मोटारसायकल आणि गाडीच्या भीषण अपघातात दोन जणांना धडक दिली. ओम सुनील भालेरेाव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या वेळी, खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या याचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर रविवारी पहाटे दोन व्यक्तींना बेदरकारपणे गाडी चालवत धडक...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘द इकॉनॉमिक्स ऑफ कॉटन’ पुस्तकाचे प्रकाशन – कापूस उद्योगाच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण मंथन!

0

📍 मुंबई | १० फेब्रुवारी २०२५ | दुपारी १२.१० वा. कापूस उद्योगाच्या अर्थकारणावर प्रकाश टाकणाऱ्या 'द इकॉनॉमिक्स ऑफ कॉटन' या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात पार पडले. या पुस्तकातून कापूस शेती, व्यापार, निर्यात, जागतिक बाजारपेठ आणि शेतकऱ्यांच्या भविष्यकालीन संधी यांचा सखोल अभ्यास मांडण्यात आला आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास राजकीय नेते, अर्थतज्ज्ञ, कृषिशास्त्रज्ञ, उद्योगपती आणि...

मुंबईत वाहतूक व्यवस्थेचे एकत्रीकरण — नागरिकांना मिळणार अखंड प्रवासाचा अनुभव!

0

मुंबई : महानगरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर उपाय म्हणून सर्व वाहतूक पायाभूत सुविधा — मेट्रो, मोनोरेल, बस, उपनगरी रेल्वे आणि स्थानिक रस्ते — यांचे एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना अखंड आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. शहरात विविध वाहतूक व्यवस्था स्वतंत्रपणे कार्यरत असल्याने नागरिकांना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, या सर्व व्यवस्थांना एकत्र...

Copyright ©