Home Breaking News पुणे शहरात पोलीस दलाची व्यापक नाकाबंदी – वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर मोठी कारवाई!

पुणे शहरात पोलीस दलाची व्यापक नाकाबंदी – वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर मोठी कारवाई!

84
0

 पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने संपूर्ण शहरभर मोठ्या प्रमाणावर प्रभावी नाकाबंदी राबवली. या कारवाईत शहरातील प्रमुख रस्ते, चौक, आणि रहदारीच्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत एकाच वेळी ७८ ठिकाणी कठोर नाकाबंदी लावण्यात आली होती.

पोलीस दलाची व्यापक यंत्रणा रस्त्यावर
या मोहिमेसाठी ४ अपर पोलीस आयुक्त, ५ परिमंडळीय पोलीस उपायुक्त, १० विभागीय सहायक पोलीस आयुक्त, ३९ पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण ९७ अधिकारी आणि तब्बल १८७२ पोलीस अंमलदार तैनात होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरल्यामुळे संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

४,१८७ वाहनांची कसून तपासणी – वाहतूक नियम तोडणाऱ्यांना दणका!
नाकाबंदी दरम्यान राँग साईड ड्रायव्हिंग, ट्रिपल सीट, सीट बेल्टचा अभाव यासारख्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १,५१८ वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली. यामुळे १३,६५,१०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच, ३७१ वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.

पोलीस आयुक्तांचा इशारा – वाहतूक शिस्त पाळा!


या कठोर कारवाईनंतर पुणे शहराचे मा. पोलीस आयुक्त आणि सह आयुक्त यांनी नागरिकांना वाहतूक शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. वाढती वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी यापुढेही अशीच कारवाई सातत्याने केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पुणेकरांनो, वाहतूक नियम पाळा – सुरक्षित प्रवास करा!