Breaking News

Home Breaking News Page 291

दावोस 2026 मध्ये महाराष्ट्राचा जागतिक ठसा – ‘स्केल’नंतर आता ‘ट्रस्ट’चा काळ, गव्हर्नन्समध्ये नवे युग सुरू

0

दावोस 2026 मध्ये महाराष्ट्राने जागतिक स्तरावर प्रशासनाच्या भविष्यासाठी नवी दिशा मांडली आहे. “From Scale to Trust: A Global Consensus on GovTech” या विषयावर झालेल्या प्रभावी संवादात जर्मनी, ब्राझील, फ्रान्स, बर्मुडा, गॅबॉन, संयुक्त अरब अमिराती आणि आफ्रिकन युनियनमधील वरिष्ठ नेत्यांनी सहभाग घेतला. या चर्चेत डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (DPI) च्या पुढील टप्प्यावर भर देण्यात आला. या संवादातील मुख्य निष्कर्ष असा होता की,...

चार वर्षांनंतर बीएमसीला लोकनियुक्त सत्ता; रितू तावडे यांच्याकडे महापालिकेची धुरा, भाजप सर्वात मोठा पक्ष

0

मुंबई : तब्बल चार वर्षे प्रशासकांच्या नियंत्रणाखाली असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) अखेर लोकनियुक्त सत्तेची पुनर्स्थापना झाली असून भाजपच्या रितू तावडे यांनी महापालिकेच्या कारभाराची धुरा स्वीकारली आहे. 2022 पासून निवडून आलेले सभागृह अस्तित्वात नसल्याने प्रशासकीय पातळीवरच कामकाज सुरू होते. आता जानेवारी 15, 2026 रोजी झालेल्या निवडणुकांनंतर मुंबईकरांना पुन्हा लोकप्रतिनिधी मिळाले आहेत. महापालिकेतील मागील नगरसेवकांचा कार्यकाळ मार्च 2022 मध्ये संपला होता. त्यानंतर...

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ ला प्रारंभ; अजितदादांच्या आर्थिक शिस्तीची आठवण, लोकहिताच्या निर्णयांची अपेक्षा

0

मुंबई | मंत्रालय दरवर्षी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar हे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असत. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणी, आकडेवारीवरील पकड आणि आर्थिक शिस्तीबाबतच्या ठाम भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या अर्थकारणाला एक वेगळी दिशा मिळाली. राज्याच्या आर्थिक शिस्तीची परंपरा अधिक बळकट करणाऱ्या त्यांच्या कार्याची आज विशेष आठवण होत आहे. आजपासून Maharashtra State Legislature चे ‘अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६’ औपचारिकपणे सुरू होत...

महिलेचा वेष धारण करून कंपनीत चोरी करणारे दोन शिताफीबाज गुन्हेगार वानवडी पोलिसांच्या जाळ्यात

0

पुणे पोलिसांनी अत्यंत चलाखीने चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना जेरबंद केले आहे. या आरोपींनी पोलिसांची दिशाभूल व्हावी या हेतूने महिलेचा वेष, गाऊन, सलवार-कमीज तसेच मास्क व ओढणी घालून कंपनीत चोरी केली होती. मात्र वानवडी पोलिसांच्या तपासपथकाने केवळ सीसीटीव्ही फुटेज, चपलेचा मागोवा आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना गाठले आणि मोठी कामगिरी बजावली. घटनेचा तपशील दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 1:43...

माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट; विविध विषयांवर मनमोकळा संवाद

0

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आज मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत करण्यात आले. राजकीय, सामाजिक तसेच राज्याच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर यावेळी मनमोकळ्या गप्पा झाल्या. या भेटीत खा. नारायण राणे यांनी आस्थेने प्रकृतीची विचारपूस करत उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी मनःपूर्वक सदिच्छा व्यक्त केल्या. त्यांच्या या आपुलकीच्या भेटीमुळे वातावरण अधिकच...

वराळे गावठाणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ – शरदभाऊ बुट्टे पाटीलांसह शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

0

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वराळे गावठाण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ऐतिहासिक क्षण साकारला गेला. माजी सभापती श्री. शरदभाऊ बुट्टे पाटील यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या सामूहिक प्रवेशामुळे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा बदल घडून आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली आहे. या प्रसंगी उपस्थित नेते...

डेअरी फार्म उड्डाणपुलाला ‘लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब’ यांचे नाव द्यावे; पिंपरीतील राष्ट्रवादी नगरसेवकांची जोरदार मागणी

0

पिंपरी | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या पिंपरी येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या डेअरी फार्म उड्डाणपुलाला ‘लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब उड्डाणपूल’ असे नाव देण्यात यावे, अशी ठाम आणि भावनिक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांकडून करण्यात आली आहे. ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक २१ मधील सर्व नगरसदस्यांच्या वतीने नगरसेवक डब्बू आसवानी यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका...

पुण्यात येरवडा सेंट्रल जेलच्या कैद्यांच्या टीमने गो… स्पर्धेत केले विजय; कैद्यांच्या क्रीडा कौशल्याचा प्रभाव

0

पुणे : येरवडा सेंट्रल जेल (YCJ) मध्ये कैद्यांनी आपल्या क्रीडा कौशल्याचा पुनर्जागरण करत नवे रेकॉर्ड स्थापित केले आहेत. अलीकडेच आयोजित गो… स्पर्धेत येरवडा जेलच्या कैद्यांच्या टीमने प्रथम क्रमांक मिळवून आपले प्रावीण्य सिद्ध केले. जेल प्रशासन आणि क्रीडा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कैद्यांनी कठोर सराव केला. स्पर्धेत भाग घेतलेल्या कैद्यांनी आत्मविश्वास, संघभावना आणि शिस्त दाखवली, ज्यामुळे उपस्थित प्रेक्षक आणि न्यायालयीन अधिकारी प्रभावित झाले....

दिल्ली विजय आणि पानिपत बदला विजयसोहळा उत्साहात संपन्न

0

पुणे : भारत इतिहास संशोधक मंडळ व श्री देवदेवेश्वर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिल्ली विजय आणि पानिपत बदला विजयसोहळा’ मंगळवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात व गौरवशाली वातावरणात संपन्न झाला. मराठ्यांच्या शौर्य, पराक्रम आणि ऐतिहासिक विजयाची स्मृती जागवणारा हा सोहळा इतिहासप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण केले  तसेच माधवराव पेशवे, महादजी शिंदे व तुकोजी होळकर...

कोंबडी पुलावर धडाडीची कारवाई! देशी बनावटी पिस्तूल बाळगणारा इसम अटक; गुन्हे शाखा युनिट १ ची मोठी कामगिरी

0

पुणे शहरातील मंगळवार पेठ परिसरात गुन्हे रोखण्यासाठी युनिट ०१ गुन्हे शाखेचे अधिकारी सतत गस्त घालत असताना, २२ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या दक्षतेमुळे एक गंभीर गुन्हा रोखण्यात पोलीस दलाला यश मिळाले. कोंबडी पुल, जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाजवळ एका संशयित इसमाकडे देशी बनावटी पिस्टल असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त झाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे तत्काळ पथक नेमण्यात आले व गुन्हे शाखा...

Copyright ©