पोलीस अधिकाऱ्यांच्या उज्वल कार्याचा गौरव!
पुणे | प्रतिनिधी:- पोलीस दलातील उत्कृष्ठ तपास कौशल्य, निष्कलंक सेवा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेत केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदकांचे वितरण समारंभ यंदा दि. १३ जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता पोलीस संशोधन केंद्र, पाषाण, पुणे (सी.पी.आर.) येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मा. पोलीस...
खुनाचा गुन्हा उघडकीस: पुणे पोलिसांची कौशल्यपूर्ण कारवाई, उत्तर प्रदेशातील सराईत गुन्हेगार अटकेत!
पुणे | प्रतिनिधी :- शहरातील आंबेगाव बु. परिसरात घडलेल्या एका अमानुष आणि निर्घृण खुनाचा पर्दाफाश करत पुणे पोलिसांनी आपल्या कुशल तपास कौशल्याची पुन्हा एकदा छाप उमठवली आहे. दिनांक २० मे २०२५ रोजी सहस रोडवर एका अज्ञात महिलेवर धारधार हत्याराने केलेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला होता. या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी तब्बल ३२०० किलोमीटरचा प्रवास करत उत्तर...
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालेतील १९९८-९९ बॅचचा स्नेहमेळावा आठवणींनी भरलेल्या वातावरणात उत्साहात संपन्न!
बोपोडी, पुणे | प्रतिनिधी :- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला, बोपोडी येथील सन १९९८-९९ बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल २६ वर्षांनंतर एका स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आणि शाळेच्या आठवणींनी भारलेले वातावरण पुन्हा एकदा अनुभवले गेले. ११ जून २०२५ रोजी पार पडलेल्या या खास कार्यक्रमात माजी विद्यार्थी, शिक्षक, गुरुजन आणि कर्मचारी यांचा सहभाग भावनांनी ओथंबलेला होता. स्वागतपर भाषणानंतर विद्यार्थ्यांनी एकेक करून आपल्या...
पुणे हडपसर पोलिसांची धडाडी! २९.७६ लाखांची सायबर फसवणूक रोखली; नागरिकांना मिळाले पैसे परत
पुणे | ११ जून २०२५ – पुणे शहरातील नागरिकांना सायबर चोरट्यांनी सोशल मिडिया अॅप्सच्या माध्यमातून फसवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, हडपसर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे तब्बल ₹२९,७६,८२२/- ची फसवणूक झालेली रक्कम तक्रारदारांच्या खात्यात परत जमा करण्यात यश मिळवलं आहे. या प्रकरणामुळे हडपसर पोलीस ठाण्याच्या सतर्कतेचं सर्वत्र कौतुक होत आहे. काय आहे प्रकरण? सायबर चोरट्यांनी नागरिकांशी संपर्क साधून,...
शिवम आंदेकर याच्यासह सहकाऱ्यांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल; विजेची चोरी, निष्काळजीपणा आणि परवानगीशिवाय फलक लावल्याने झाला अपघात
पुणे | ११ जून २०२५ – पुणे शहरातील नानापेठ येथे शिवम उदयकांत आंदेकर याने परवानगीशिवाय लावलेल्या लोखंडी फलकामुळे आणि त्यात बेकायदेशीररित्या वायरींग करून वीजपुरवठा घेतल्यामुळे घडलेली ८ वर्षीय चिमुरडीच्या मृत्यूची घटना सध्या शहरात संतापाचे आणि दुःखाचे वातावरण निर्माण करत आहे. फलकाच्या लोखंडी खांबाला विजेचा करंट उतरल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? दिनांक १ जून २०२५ रोजी नानापेठमधील...
पुण्यात खंडणीखोर टोळीचा पर्दाफाश! मासेविक्रेत्याला जीवे मारण्याची धमकी देत ४८ लाखांची खंडणी वसूल करणाऱ्या सराईत गुंडांवर कारवाई
फरासखाना, पुणे | १० जून २०२५ :- पुण्यातील गणेश पेठ मच्छी मार्केटमधील एका मासे विक्रेत्याला तब्बल ९ वर्षांपासून जीवे मारण्याची धमकी देत दर महिन्याला ५० हजार रुपये खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. फिर्यादीकडून सुमारे ४८ लाख रुपये ऑनलाईन व प्रत्यक्ष पद्धतीने वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, फरासखाना पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात शिवम उदयकांत...
एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश – समर्थ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे यश
पुणे | १० जून २०२५ :- शहरातील नागरिकांची फसवणूक करण्यासाठी एटीएम मशीनमध्ये काळी पट्टी लावून बनावट तांत्रिक बिघाड निर्माण करणाऱ्या दोन सराईत आरोपींना समर्थ पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली. या आरोपींनी आधीही अशा प्रकारची फसवणूक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. घटनाक्रम:दि. ५ जून २०२५ रोजी रात्री ८:०५ वाजता, रास्ता पेठ येथील बँक ऑफ इंडिया एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी...
पुण्यात डॉक्टरची आत्महत्या; मोबाईलचा पासवर्ड कागदावर लिहून ठेवत संपवलं आयुष्य!
पुणे – सध्या वैद्यकीय क्षेत्रात एकामागोमाग एक डॉक्टर आत्महत्या करत असल्याच्या घटनांनी चिंता वाढवली असताना, पुण्यात आणखी एका युवक डॉक्टरने आयुष्य संपवले आहे. रुबी हॉल क्लिनिकमधील रेडिओलॉजी विभागात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. श्याम व्होरा (वय 28) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईलचा पासवर्ड ठेवलाय, पण प्रश्न अनुत्तरित या घटनेतील सर्वात रहस्यमय बाब म्हणजे, डॉ....
कामगारांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही! विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची ठाम भूमिका – राज्यभरातील हजारो श्रमिकांसाठी निर्णायक लढा सुरू
कामगारांचे न्यायहक्क अबाधित ठेवण्यासाठी बनसोडे यांचा पुढाकार – अन्याय करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध ठाम भूमिका पिंपरी – झपाट्याने होत असलेल्या औद्योगिक विकासाच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योग कंपन्यांमध्ये कामगारांचे मूलभूत हक्क पायदळी तुडवले जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. पर्मनंट नोकर्या रद्द करून कंत्राटी पद्धतीने कामगारांची पिळवणूक, अपघातांमधील निष्काळजीपणा, वेतनवंचना, न्यायालयीन आदेशांची उघडपणे अवहेलना – अशा घटनांनी श्रमिक वर्गातील असंतोषाला तोंड फुटले आहे. याच...
पुणेकरांसाठी मोठी बातमी! कात्रज चौकातील वाहतूक पूर्ववत सुरू – ६ जूनपासून सर्व मार्ग खुले
वाहतूक पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय; काम पूर्ण झाल्यानंतर कात्रज चौक पुन्हा सर्व वाहनांसाठी खुला पुणे – कात्रज चौकात सुरू असलेले सेगमेंटल लाँचिंगचे काम पूर्ण झाल्यामुळे, आता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी कात्रज चौक पुन्हा खुला करण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी यासंदर्भात अधिकृत प्रेसनोट प्रसिद्ध केली आहे. दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने कात्रज मुख्य...




