१२ तासांत पोलीसांचा मोठा पराक्रम! खंडणीसाठी धमकी देणारा आरोपी घोरपडी येथून अटकेत
पुणे शहरातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीला व्हॉट्सअॅप कॉलवरून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला केवळ १२ तासांच्या आत अटक करण्यात आली आहे. हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून, आरोपीने वेळोवेळी फोन करत धमकी दिली की, "तुम्ही खूप पैसे कमावलेत, मला ५० लाख रुपये खंडणी पाहिजे, नाहीतर मी तुझा खून करेन." अशा प्रकारच्या धमक्यांमुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण...
भारतीय बुद्धिबळाची मान अभिमानाने उंचावली! दिव्या देशमुख यांचा नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भव्य नागरी सन्मान
प्रतिनिधी | नागपूर :- २०२५ च्या FIDE महिला विश्वचषक स्पर्धेची विजेती ठरलेली आणि भारतासाठी अभिमानाची ठरणारी पहिली भारतीय महिला ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुख हिचा आज नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सन्मान करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रासाठी, विशेषतः विदर्भासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे. या सन्मान समारंभाला मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, आमदार डॉ....
खून, बलात्कार व ‘मोका’खालील फरार आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक!
पुणे शहरात गेल्या दोन वर्षांपासून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आणि ‘मोका’ अंतर्गत घोषित आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातून फरार असलेल्या विशाल लक्ष्मण भोले (वय ३२, रा. दुष्काळ झोपडपट्टी, ताडीवाला रोड, पुणे) याला पोलिसांनी ३१ जुलै रोजी अटक केली. आरोपीने फिर्यादी महिलेला खोटे सांगून लग्नाचे आमिष दाखवले. आपले आधीच लग्न झाले आहे हे लपवून फिर्यादीच्या...
मुंढवा परिसरात सशस्त्र गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांची तत्परता — हडपसर रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून अटक
पुणे : मुंढवा पोलीस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकाने धडक कारवाई करत एका २३ वर्षीय तरुणाला पिस्तुल व जिवंत राऊंडसह अटक केली आहे. हा प्रकार हडपसर रेल्वे स्टेशनजवळील किर्तनेबाग सार्वजनिक रस्त्यावर ३१ जुलै रोजी उघडकीस आला. पोलीस अंमलदार विनोद सांळुके यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून तपास पथकाने तत्काळ सापळा रचत संशयितास अटक केली. आरोपीच्या अंगझडतीत १ देशी बनावटीचे पिस्तुल व १...
वाघोलीत ट्रॅव्हल्स चालकावर हल्ला करून जबरी चोरी करणारे चौघे जेरबंद!
वाघोली, पुणे – २४ जुलै २०२५ रोजी समृद्धी लॉज समोर, बकोरी फाटा वाघोली येथील महामार्गावर उभी असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सवर चार अनोळखी इसमांनी अचानक हल्ला चढवून चालक व वाहकाला जबर मारहाण केली. पैशांची मागणी करत त्यांनी जबरी चोरी करत खिशातील रोख रक्कम हिसकावली व घटनास्थळावरून चारचाकी गाडीतून पलायन केले. या धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. यासंदर्भात वाघोली पोलीस...
पुणे पोलिसांची यशस्वी कामगिरी – मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघे आरोपी जेरबंद!
पुणे – शहरातील आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी मोठी चोरी उघडकीस आणली आहे. अवघ्या १९ वर्षांच्या तिघा तरुणांनी मिळून पुण्यातील आंबेगाव आणि भारती विद्यापीठ हद्दीतून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईत एकूण पाच मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या असून, याची अंदाजे किंमत दोन लाख रुपये इतकी आहे. गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलेले युवक – वय फक्त १९ वर्षे,...
हिंजवडी व चाकण वाहतूक कोंडीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल! PMRDA ला ‘सिंगल पॉइंट कोऑर्डिनेटर’ ची जबाबदारी!
हिंजवडी आयटी पार्क, चाकण-तळेगाव-माळुंगे औद्योगिक पट्टा तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांवरील ताण दूर करण्यासाठी आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ला ‘सिंगल पॉइंट कोऑर्डिनेटर’ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंदवार यांनी दिली असून, यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि यंत्रणांमध्ये एकत्रित समन्वय साधला जाणार आहे. मुख्यमंत्री मा....
गुन्हेगारी विश्वातील मोठा फरार आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात!
पुणे – बंड गार्डन पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या अत्यंत कौशल्यपूर्ण कारवाईतून विशाल लक्ष्मण भोळे या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या फरार आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. आरोपीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात MCOCA अंतर्गत नोंदवलेली खूनाची केस व बंड गार्डन पोलीस ठाण्यात बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो पोलिसांच्या नजरेआड होता. गुप्त माहितीच्या आधारे धायरी-सिंहगड रस्त्याजवळून आरोपीला अटक करण्यात आली. पुणे गुन्हे...
तुळशीबाग मंडळाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष, पुण्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
पुणे शहरातील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यांच्यावतीने शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम राबवला जात आहे. रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नु. म. वि. शाळा, बाजीराव रोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रुद्रांग वाद्य पथक, स्वरूप वर्धिनी, शिवमुद्रा, गजलक्ष्मी यांच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम पार पडणार...
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न…
पिंपरी :- जगात सर्वत्र तंत्रज्ञानाचे वारे वाहत आहे. आजकाल प्रत्येक पालकांच्या हातात चोवीस तास मोबाईल दिसत आहे. त्याचेच अनुकरण घरातील लहान मुले मोबाईलचा वापर करतांना दिसत आहेत. त्यामुळे मोबाईल वापरामुळे विचार करण्याची क्षमता खुंटत चालली आहे. मुलांचे आरोग्याकडील लक्ष कमी होत आहे. लहान मुलांनी मैदानी व बौद्धिक खेळ खेळले पाहिजेत त्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला तरच आपल्या पाल्यांचे आरोग्य व्यवस्थित राहील...




