अग्निशामक जवानांनी प्रसंगावधान दाखवत वाचवले तरुणाचे प्राण!
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वल्लभनगर येथील किल्लेदार गार्डनसमोर मंगळवारी (दि.२ डिसेंबर २०२५) सायंकाळी ०५.४५ वा. च्या सुमारास एक तरुण व्यक्ती इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली जमीनीवर उडी मारण्याच्या उद्देशाने चढली होती. या बाबत नागरिकांमार्फत माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी ताबडतोब धाव घेत सदर व्यक्तीची सुखरूप सुटका केली आहे. घटनेबाबत अग्निशमन विभागाच्या पिंपरी येथील मुख्य अग्निशमन नियंत्रण...
भोर येथील तरुणाच्या आत्महत्या प्रकरणाची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीने घेतली दखल
पुणे : भोर येथील मयूर संपत खुंटे वय 19 या तरुणाने केलेल्या आत्महत्त्या प्रकरणी समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयास प्राप्त झालेल्या अहवालानुसार भोर पोलीस स्टेशनमध्ये सदस्य सचिव जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती तथा सहायक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी आणि गट विकास अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी यांचे समवेत रविवारी भेट दिली. भोर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा...
पुणे ट्रॅफिकमध्ये मोठा बदल! विमानतळ वाहतूक विभागाचा नवा आदेश जाहीर
पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी पुणे विमानतळ वाहतूक विभागाने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी मोटार वाहन कायदा कलम 115, 116(1)(A)(B), 116(4) व 117 अन्वये नवे वाहतूक नियम तात्काळ प्रभावाने लागू झाल्याचे जाहीर केले. अत्यावश्यक सेवेतील फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी वाहने वगळता सर्वांसाठी हे नवे नियम बंधनकारक असतील,...
पुण्यातील ‘ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह’चा वाढता कहर!
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आजकाल शिक्षणापेक्षा ड्रिंक अॅण्ड ड्राइव्हमुळे घडणारे भयानक अपघातच चर्चेचा विषय बनले आहेत. शनिवार-रविवारी शहरात उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्ट्या, बाहेरून आलेले विद्यार्थी, कॉर्पोरेटमधील तरुणाई, मोठा पॉकेटमनी, पबची वाढती संख्या… या सगळ्यांनी मिळून पुण्याचे रस्ते डेन्जर झोन बनवले आहेत. आणखी चिंतेची बाब म्हणजे, अनेक तरुण व विद्यार्थी मजा-मस्तीच्या भरात मद्यपान करून वाहन चालवतात आणि...
पुणे गुन्हे शाखा युनिट-२ ची धडाकेबाज कारवाई! एनडीपीएसखाली मोठी धडक – मेफेड्रॉनसह ₹2.02 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे – शहरातील वाढत्या अंमली पदार्थांच्या साखळीवर मोठा घाव घालत पुणे गुन्हे शाखा युनिट-२ ने आणखी एक महत्त्वपूर्ण कारवाई करत मेफेड्रॉन (एम.डी.) या घातक ड्रगचा मोठा साठा हस्तगत केला. गुरुवारी (दि. २७ नोव्हेंबर २०२५) करण्यात आलेल्या या कारवाईत ₹२,०२,८०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपीला रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले. गोपनीय माहिती, तात्काळ पथकाचे रवानगी आणि अचूक पाळत गुन्हे...
पुणे पोलिसांचा ‘मोबाईल परतावा महाअभियान’ यशस्वी – १९३ हरवलेले मोबाईल तक्रारदारांच्या हाती; नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक
पुणे – पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकाभिमुख कारभाराचे उत्तम उदाहरण घालत, परिमंडळ-१ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांमधील हरविलेले आणि गहाळ झालेले तब्बल १९३ मोबाईल फोन त्यांच्या respective तक्रारदारांना परत केले. सी.ई.आर. (CIER) पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्रासह इतर राज्यांतून हस्तगत करण्यात आलेल्या या मोबाईल्सचे वितरण २७ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आले. हा उपक्रम स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृह, मॉर्डन कॉलेज, शिवाजीनगर...
पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन; सामाजिक न्यायाच्या विचारांना नव्याने सलाम
पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महात्मा फुले यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद, अन्याय आणि विषमता नष्ट करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचा सामाजिक क्रांतीचा वारसा आजही देशभरातील जनतेला प्रेरित करत असल्याचे यावेळी नेत्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष व...
भारतीय संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला उतुंग भरारी घेण्याचा अधिकार – ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे
पिंपरी – भारतीय संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला उतुंग भरारी घेण्याचा अधिकार प्राप्त झाला असून भारतीय संविधान म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करणारा मानवमुक्तीचा जाहिरनामा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे यांनी केले. भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित पिंपरी येथील प्रबोधनात्मक कार्यक्रमात ‘भारतीय संविधान -मानवमुक्तीचा जाहिरनामा’ या विषयावर व्याख्यान देताना जोंधळे बोलत होते. या कार्यक्रमास राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अॅड. गोरक्ष लोखंडे, महापालिका ...
जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचा दमदार शक्तिप्रदर्शन! स्नेहल खोत यांच्यासह उमेदवारांना प्रचंड समर्थन; अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
जुन्नर — जुन्नर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेली प्रचार सभा जोरदार उत्साहात पार पडली. नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. स्नेहल निलेश खोत यांच्या नेतृत्वाखाली ही सभा भव्यतेनं पार पडली. सभेत पक्षाचे नेते, पदाधिकारी, हजारोंच्या संख्येने नागरिक आणि तरुण कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा बळकटी देणारी घटना घडली— इतर पक्षातील...
सिंहगड रोड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! गहाळ झालेले २० मोबाईल शोधून नागरिकांना परत — तांत्रिक विश्लेषणाचा उत्कृष्ट वापर
पुणे — तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल हरवणे ही मोठी समस्या ठरली असताना, सिंहगड रोड पोलीस स्टेशनने पुन्हा एकदा नागरिकांना दिलासा देणारी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. एकूण २० गहाळ मोबाईल शोधून संबंधित नागरिकांना परत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. गहाळ मोबाईलची नोंद अनेक नागरिकांनी ‘LOST AND FOUND’ या शासकीय वेबसाईटवर तसेच CIER पोर्टलवर करून सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या...




