पुणे

Home पुणे Page 89

पुणे: एसटी बसखाली चिरडल्याने तरुणाचा मृत्यू, धक्कादायक घटनेचा सीसीटीव्हीत कैद व्हिडिओ व्हायरल

0

पुणे: पुण्यातील एसटी बस स्थानकात (भोर एसटी स्टँड) झालेल्या एका धक्कादायक घटनेत, एक तरुण बसखाली चिरडल्याने मृत्यूमुखी पडला आहे. या घटनेचा सीसीटीव्हीत कैद व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मृत तरुणाचे नाव रूपेश गायकवाड असे आहे. ही घटना सोमवार दुपारी घडली. माहितीनुसार, रूपेश गायकवाड बसच्या डाव्या बाजूने उजव्या बाजूला जात असताना अचानक बसचालकाने बस पुढे घेतली. यावेळी बसच्या चाकाखाली चिरडल्याने रूपेशचा मृत्यू...

पुणे पोलीस विघ्नहर्ता ट्रस्ट तर्फे उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना गौरव – ४६ मंडळांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान

0

पुणे : पुणे शहर पोलीस व विघ्नहर्ता ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने सन २०२४ च्या गणेशोत्सव काळात सामाजिक उपक्रम, शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक आणि आदर्शवत आयोजन करणाऱ्या ४६ उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांचा गौरव करण्यात आला. यासोबतच या उपक्रमात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या परिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे ठिकाण व मान्यवरांची उपस्थितीहा सोहळा दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, पुणे येथे...

नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास आता दंड आणि टोइंगचा भुर्दंड; वाहतूक शाखेची कठोर कारवाई सुरू.

0

पिंपरी-चिंचवड: नो पार्किंग झोनमध्ये बेकायदा वाहनतळामुळे वाढणाऱ्या वाहतूककोंडीला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने कठोर पावले उचलली आहेत. आता बेशिस्तपणे वाहन लावल्यास वाहन टोइंग करून वाहनचालकांकडून दंड, टोइंग शुल्क आणि वस्तू व सेवा कर (GST) वसूल केला जाणार आहे. दुचाकीसाठी ७३६ रुपये आणि चारचाकीसाठी ९७२ रुपये असा दंड आकारण्यात येणार आहे. वाहनचालकांची बेशिस्ती आणि वाहतूककोंडीचे संकट पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण, भोसरी,...

औंध परिसरात दहशत माजवणाऱ्या सात कुख्यात गुंडांना पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गावठी कट्टा, कोयते, वाहनांसह ७.६ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पुणे : औंध येथील विधाते वस्तीमध्ये २८ जून २०२५ रोजी मध्यरात्री दहशत माजवणाऱ्या टोळीवर चतुःश्रृंगी पोलिसांनी निर्णायक कारवाई करत सात आरोपींना अटक केली असून सुमारे ७ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर घटना घडली तेव्हा फिर्यादी आणि त्यांचे मित्र गप्पा मारत बसलेले असताना १२ ते १५ जणांच्या टोळीने हातात लाकडी दांडके व धारदार शस्त्रं घेऊन परिसरात...

पगाराच्या थकबाकीसाठी पुण्यात टीसीएस कर्मचाऱ्याचं धाडसी आंदोलन! फूटपाथवर झोपून मागितला न्याय

0

पुणे – देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या TCS (Tata Consultancy Services) च्या पुणे ऑफिसबाहेर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीकडून थकवलेल्या पगाराच्या मागणीसाठी सौरभ मोरे या तरुणाने थेट ऑफिसबाहेरील फूटपाथवर झोपून आंदोलन केलं. सौरभ मोरे याने आपल्या शारीरिक आणि मानसिक कष्टांचे मोबदले मिळावे यासाठी रात्रीच्या अंधारातही न डगमगता लढा दिला. त्याचा फूटपाथवर झोपलेला फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला...

शहरवासियांनी स्वत:च्या विकासासोबत गावाच्याही विकासावर भर दिला पाहिजे : प्रवीण दरेकर

0

पुणे : पोलादपूर मुळ निवासी पुणे शहरात वास्तव्यास असणाऱ्या शहरवासीयांनी आपल्या गावाची नाळ न तोडता शहरात आपल्या विकासासोबत गावाच्या ही विकासाचा विचार करावा असे प्रतिपादन पोलादपूर भूमिपुत्र प्रवीण दरेकर (आमदार- विधान परिषद, अध्यक्ष-मुंबई बँक) यांनी पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे आयेजित भव्य सत्कार समारंभात बोलत होते. पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे प्रवीण दरेकर यांच्या हस्ते माधुरीताई मिसाळ (राज्यमंत्री, महाराष्ट्र ) आणि संतोष...

उरुळी कांचनमध्ये मोबाईल दुकानावर टोळक्याचा हल्ला; दुकानाची तोडफोड.

0

पुणे : उरुळी कांचनमधील महात्मा गांधी विद्यालय रस्त्यावर असलेल्या मोरया मोबाईल शॉपवर गुरुवारी दुपारी ४.३० वाजता टोळक्याने थरारक हल्ला केला. सुमारे ५ ते ६ जणांच्या टोळक्याने दुकानात घुसून धारदार हत्यारांनी आणि काठ्यांनी दुकानाची तोडफोड केली. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेचा तपशील: साक्षीदारांच्या माहितीनुसार, आरोपींनी चेहऱ्यावर मास्क घातले होते. त्यांनी दुकानात प्रवेश करताच दुकानमालकाला शिवीगाळ केली आणि दुकानातील...

वाघोलीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून – पुणे पोलिसांची जलद कारवाई; आरोपी पती अटकेत

0

पुणे : शहरातील वाघोली परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका निर्दयी पतीने आपल्या पत्नीचा निर्दयपणे खून केला. ही घटना ६ ऑक्टोबर २०२५ रोजी लाडबा वस्ती, केसनंद (ता. हवेली, जि. पुणे) येथे घडली. आरोपीचे नाव बिराप्पा शंकर खांडेकर (वय ५० वर्षे) असे असून त्याने आपल्या पत्नीवर लाकडी दांडक्याने वार करत गंभीर दुखापत केली होती. घटनेनंतर जखमी महिलेवर उपचार...

नवीन थेरगाव रुग्णालयाला डीएनबी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळणे हा पिंपरी चिंचवडसाठी एक ऐतिहासिक टप्पा – आयुक्त शेखर सिंह

0

पिंपरी: नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) नवी दिल्ली यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयाला डीएनबी (जनरल मेडिसिन) पदव्युत्तर पदवी (Post Graduate Degree) अभ्यासक्रमासाठी २०२५ प्रवेश सत्राकरिता चार जागा मंजूर केल्या आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. पिंपरी चिंचवडसाठी हा एक ऐतिहासिक टप्पा आहे, असेही ते म्हणाले. नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन्स इन...

कोंढवा येथे मोठी कारवाई: १३.६ लाखांच्या मेफेड्रॉनसह एक जण अटक, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची यशस्वी धडक

0

पुणे शहरातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ (Anti-Narcotics Cell - 2) ने मोठी यशस्वी कारवाई करत १३ लाख ६० हजार रुपये किमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई दि. २ जुलै २०२५ रोजी करण्यात आली असून, कोंढवा परिसरातील अहिल्यादेवी होळकर भाजी मंडई समोर संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तीवर...

Copyright ©