मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी चमत्कार ठरणार! देशातील सर्वात लांब बोगदा आणि सर्वात उंच पूल महाराष्ट्रात; मुख्यमंत्री फडणवीसांचा गौरवोद्गार
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर उभारण्यात येणारा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प केवळ वाहतूक सुलभ करणारा नसून तो भारतातील अभियांत्रिकी क्षेत्रात एक अद्वितीय चमत्कार ठरणार आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. या प्रकल्पामुळे पुणे ते मुंबई प्रवासाचा कालावधी जवळपास अर्धा तासाने कमी होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या कामाची पाहणी नुकतीच पार पडली. यावेळी खासदार श्रीरंग...
पुण्यातील खड्ड्यांचा बळी! औंधमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू; नागरिकांमध्ये संतापाची लाट
पुणे: शहरातील रस्त्यांवरील खड्डे आता प्राणघातक ठरत असून, औंध परिसरात खड्ड्यामुळे घडलेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना ३० जुलै रोजी औंधमधील राहुल हॉटेलसमोर घडली असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव जगन्नाथ काशिनाथ काळे (वय ६१ वर्षे) असून, ते नाबार्डमध्ये कार्यरत होते व अलीकडेच सेवानिवृत्त झाले होते. काळे हे स्कूटरवरून जात...
पुणे गुन्हा फाइल्स: नाशिकच्या टॅक्सीचालकाची ४ अनोळखींना राइड देण्याची किंमत जीवघेणी!
नाशिक/पुणे: नाशिकच्या ५६ वर्षीय टॅक्सीचालक राजेश बाबुराव गायकवाड यांनी २७ जानेवारी रोजी पत्नी अरुणाला संध्याकाळी ७:३० वाजता घरी येण्याचे आश्वासन दिले. पण ती रात्री त्यांच्या फोनवर अनोळखी व्यक्तीने केलेला कॉल ऐकून तिच्या वाईट स्वप्नाला खरा अर्थ लागला – राजेशचा हत्या करून त्याची गाडी चोरी करण्यात आली होती! घटनेचा क्रम: २७ जानेवारी पहाटे ५ वाजता: राजेश नाशिकहून पुण्याला प्रवासी नेण्यासाठी निघाले. संध्याकाळी ७:३० वाजता: पत्नीशी शेवटचा संवाद...
पालखी सोहळा २०२५ मध्ये उल्लेखनीय योगदान करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गौरव!
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘पालखी सोहळा २०२५’ मध्ये, सेवाभावी संस्थांनी दिलेल्या योगदानाचे मोठे कौतुक करण्यात आले. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य तपासणी शिबिरे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहतूक नियंत्रण व जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य करून या संस्थांनी वारकरी सेवेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. या निमित्ताने एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महानगरपालिका...
पुणे पोलिसांची मोठी कारवाई – वाहन चोरीचे दोन गुन्हे उघड! दोन चोरांना अटक, चोरीच्या दुचाकी जप्त
पहिली कारवाई – चोरीची स्प्लेंडर विक्रीसाठी येणार, सापळा रचून अटक! पोलीस अंमलदार सचिन पवार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पेरणे फाटा, लोणीकंद येथे सापळा रचण्यात आला. आरोपी दीपक राजेंद्र बिडगर (वय २३, रा. न्हावरा, शिरूर, पुणे) याला हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकलसह पकडण्यात आले. चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर गाडीच्या नंबरवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये नोंद झालेला गुन्हा असल्याचे उघड...
शिक्षणाचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात गेल्या काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. पुण्याचा आणि पुण्यालगत असलेल्या पिंपरी चिंचवडचा गेल्या काही वर्षात मोठा विस्तार झाला आहे.
शिक्षणाचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात गेल्या काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. पुण्याचा आणि पुण्यालगत असलेल्या पिंपरी चिंचवडचा गेल्या काही वर्षात मोठा विस्तार झाला आहे.अशातच आता पुणेकरांच्या सोयीसाठी शहरातील एका महत्त्वाच्या मार्गावर पीएमपीएलची बस सेवा सुरू करण्यात आली आहे. शहरातील वाघोली ते शिरूर या मार्गावर पीएमपीएलची बस सेवा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. खरंतर ही बस सेवा...
पुणे पोलिसांची प्रभावी नाकाबंदी : वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई!
पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने संपूर्ण शहरभर प्रभावी नाकाबंदी राबविण्यात आली. ज्यामध्ये शहरातील प्रमुख रस्ते, महत्त्वाचे चौक, रहदारीची ठिकाणे याठिकाणी कसून तपासणी करण्यात आली. ९३ पोलीस अधिकारी आणि १८७२ पोलीस अंमलदारांचा समावेश पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या नेतृत्वाखालील या कारवाईत परिमंडळीय पोलीस उपायुक्त, विभागीय सहायक पोलीस आयुक्त, ३९ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक, गुन्हे शाखेचे निरीक्षक, वाहतूक शाखा आणि तपास पथकातील अधिकारी व...
परिमंडळ ५ तर्फे भव्य महिला पोलीस बाईक रॅली – ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाला मोठा प्रतिसाद!
पुणे : महिला सशक्तीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस परिमंडळ ५ तर्फे भव्य महिला पोलीस बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या राष्ट्रीय मोहिमेला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा उपक्रम अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. ११६ दुचाकींचा भव्य ताफा – २३२ महिला...
परिमंडळ १ तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त भव्य बाईक रॅली – ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद!
पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून परिमंडळ १, पुणे शहर पोलिसांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या महत्वाकांक्षी मोहिमेच्या अनुषंगाने भव्य महिला पोलीस बाईक रॅलीचे आयोजन केले. ७ मार्च २०२५ रोजी शनवारवाडा येथून सुरू झालेल्या या भव्य रॅलीमध्ये महिलांच्या सामर्थ्याचा अद्वितीय नजारा पाहायला मिळाला. महिला दिनाचा भव्य उत्सव – महिला पोलिसांचा जोश! परिमंडळ १ कार्यक्षेत्रात ७ मार्च ते १० मार्च २०२५...
वडगावशेरीत ‘स्पा’च्या आड वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांची कारवाई, दोन महिलांची सुटका
पुणे : शहरातील वडगावशेरी परिसरात असलेल्या 'सृष्टी स्पा'मध्ये स्पा व्यवसायाच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा चंदननगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही धक्कादायक घटना आनंदपार्क येथील शैलेश पार्क इमारतीत घडली असून, या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली आहे. यासोबतच स्पा मॅनेजर रिया शर्मा, स्पा मालक संदीप त्रिपाठी आणि राहुल जाधव यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,...

















