“वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ सोहळा” उत्सवात रंगणार पुणे; रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
पुणे, ११ जुलै २०२५ : पारंपरिक वाद्यसंस्कृती आणि सांगीतिक परंपरेला जपणाऱ्या रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, दिनांक ११ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता हा विशेष सोहळा दत्तवाडी कमानी शेजारी, म्हात्रे ब्रिज जवळ, दत्तवाडी, पुणे येथील ग्राउंड झिरो या ठिकाणी संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती: या सोहळ्याला मा. श्री....
मुंबईत मराठी माणसाला घर नाकारल्यास बिल्डरवर कारवाई! राज्य सरकारचा स्पष्ट इशारा – मंत्री शंभूराज देसाई यांची विधानपरिषदेत ठाम घोषणा
मुंबईसारख्या महानगरात मराठी भाषिक नागरिकांना केवळ त्यांच्या भाषेचा, खानपानाचा किंवा पारंपरिक ओळखीचा आधार घेत घर नाकारले जाण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेत मोठा राजकीय आवाज उठला आणि राज्य सरकारकडून थेट बिल्डरांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. "मराठी माणसाचा मुंबईत पहिला हक्क" राज्याचे गृह आणि गृहनिर्माण राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टपणे विधानपरिषदेत जाहीर केलं की, "मुंबई, उपनगर किंवा राज्यात...
आमदार सुनील शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; देहूरोड कॅन्टोन्मेंटसाठी विशेष निधी, रेड झोन प्रश्न मार्गी लागणार!
देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसराच्या विकासासाठी अखेर महत्त्वाची पावले उचलली जाणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला आमदार सुनील शेळके यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे देहूरोड परिसरातील अनेक दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्या आता मार्गी लागणार आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या विकासाला नवा धक्का केंद्राच्या अखत्यारीत असलेला कॅन्टोन्मेंट बोर्ड...
विमानतळ परिसरात प्रखर बीम आणि लेझर लाईटवर बंदी; पुणे पोलीस आयुक्तालयाचा महत्वाचा आदेश | विमान सुरक्षेसाठी मोठा निर्णय
पुणे शहर पुणे विमानतळाजवळच्या परिसरातील कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रखर बीम लाईट व लेझर बीम लाईटवर ६० दिवसांची बंदी घालण्यात आली आहे.हा निर्णय पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त आणि विशेष कार्यकारी दंडाधिकारी रंजन कुमार शर्मा यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार घेतला असून, लोहगाव विमानतळाच्या १५ कि.मी. परिघात तो लागू राहणार आहे. का झाला निर्णय? भारतीय वायुसेनेने पुणे...
मीरा-भाईंदरमधील मराठी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तातडीने बदली; प्रशासनाच्या भूमिकेवर उठले अनेक प्रश्न!
मीरा-भाईंदर परिसरात मराठी भाषेच्या प्रश्नावर मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समिती यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले आंदोलन चिघळल्यामुळे संपूर्ण परिसरात राजकीय खळबळ उडाली. या आंदोलनाला परवानगी नाकारण्याच्या निर्णयामुळे तणाव वाढला आणि मराठी जनतेमध्ये तीव्र रोष व्यक्त झाला. मंगळवारी (८ जुलै २०२५) रोजी नियोजित मोर्चाला पोलिसांकडून परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या नागरिकांना, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलकांना अटक...
“विकसित पुण्यासाठी नवा टप्पा” – खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यअहवाल प्रकाशन आणि २४x७ जनसंपर्क कार्यालयाचा भव्य शुभारंभ!
ठिकाण: जंगली महाराज रोड, पुणे दिनांक: १२ जुलै २०२५ (शनिवार) वेळ: दुपारी ३.३० वाजता (कार्यालय उद्घाटन) | संध्याकाळी ४ वाजता (कार्यअहवाल प्रकाशन) पुणेकरांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असलेले पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे आता आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहेत. पुणेकरांच्या अडी-अडचणी निवारणासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात “२४ तास खुले असणारे जनसंपर्क कार्यालय” उभारले गेले आहे. हे कार्यालय छत्रपती संभाजी महाराज...
लोकहितासाठी समर्पित, सौम्य पण प्रभावी नेतृत्वाचे प्रतीक – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार!
सत्ताधारी असो वा विरोधक, सर्वांनाच आपलेसे वाटणारे, सौम्य पण प्रभावी भाषाशैलीने प्रत्येकाचे मन जिंकणारे नेतृत्व म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार साहेब. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सौजन्य, राजकीय परिपक्वता आणि कार्यक्षम निर्णयशक्ती यांचा अद्वितीय संगम आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ते एक स्थिरता देणारे आणि विकासाभिमुख भूमिका बजावणारे व्यक्तिमत्त्व म्हणून उभे राहिले आहेत. अजितदादांचे नेतृत्व हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नाही, तर...
#शक्ती_ऋतुजा : पुण्यात धर्मांतरविरोधी कायद्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाचा भव्य मोर्चा – “ऋतुजा ताईला न्याय मिळालाच पाहिजे!”
पुणे – धर्मांतरणाच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या ऋतुजा ताईला न्याय मिळावा या मागणीसाठी आणि महाराष्ट्रात धर्मातरविरोधी कायदा लागू करावा या प्रमुख मागणीसाठी पुण्यात आज एक ऐतिहासिक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व सकल हिंदू समाज, विविध हिंदू संघटना, आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केले. मोर्चाची सुरुवात आणि उपस्थित मान्यवर या भव्य मोर्चाची सुरुवात अभिनव चौक, टिळक रोड येथून झाली आणि तो सारसबागेतील...
श्री तुळशीबाग गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मदतनिधी वितरित
पुणे – गणेशोत्सव म्हटला की सर्वसामान्यांच्या मनात उत्साहाची लहर उसळते, मात्र त्याचवेळी अनेक मंडळे सामाजिक बांधिलकी जपत समाजातील वंचित घटकांसाठी विधायक कार्यही करत असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला, ज्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. भोई प्रतिष्ठानच्या पुण्यजागर...
वाघोली-लोहगाव रस्त्याची दुर्दशा: पुणे महापालिकेची निष्क्रियता की उघडपणे भ्रष्टाचार?
रस्ता दुरुस्तीसाठी निदर्शन आंदोलन पुणे: ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च करण्यात येत असताना, प्रत्यक्षातली परिस्थिती मात्र काही आणि भयानक वास्तव काही वेगळंच सांगते. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या वाघोली परिसरातील प्रमुख निवासी संकुले — अथकज विजय विहार, प्राईमेरा होम्स आणि रोहन अभिलाषा — अजूनही मूलभूत रस्ता व ड्रेनेजसारख्या सुविधांपासून वंचित आहेत. वाघोली-लोहगाव रोड ते अग्निशमन केंद्र, अथकज विजय विहार, मोरे कॉर्नर, रोहन...




