Home Breaking News आमदार सुनील शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; देहूरोड कॅन्टोन्मेंटसाठी विशेष निधी, रेड...

आमदार सुनील शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; देहूरोड कॅन्टोन्मेंटसाठी विशेष निधी, रेड झोन प्रश्न मार्गी लागणार!

देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसराच्या विकासासाठी अखेर महत्त्वाची पावले उचलली जाणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
या बैठकीला आमदार सुनील शेळके यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे देहूरोड परिसरातील अनेक दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्या आता मार्गी लागणार आहेत.

कॅन्टोन्मेंट बोर्डच्या विकासाला नवा धक्का

केंद्राच्या अखत्यारीत असलेला कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसर विकासापासून वंचित होता.
आमदार शेळके यांनी यासंदर्भात राज्य सरकारला वेळोवेळी जागं केलं.
यामुळे राज्य शासनाने आता विशेष निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.
‘रेड झोन’मधील नागरिकांना दिलासा
बांधकाम संमती, परवाने, वीज-पाणी अशा मूलभूत सुविधा रेड झोन अडथळ्यांमुळे नागरिकांना नाकारल्या जात होत्या.
आता मुख्यमंत्र्यांनी अशा अडचणी सोडवण्याचा आणि लवकर निर्णय घेण्याचा स्पष्ट शब्दांत उल्लेख केला आहे.

संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी सकारात्मक निर्णय

देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर आधुनिक सुविधांचा दर्जा वाढवण्यासंदर्भात लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
वारकऱ्यांसाठी स्वच्छतागृहे, विश्रांतीगृह, रस्त्यांची मजबुतीकरण यासारख्या सुविधा उभारण्याच्या दृष्टीने योजना तयार होणार.
आमदार सुनील शेळके यांचा खंबीर पाठपुरावा
विकासाच्या प्रश्नावर विधानसभेत वेळोवेळी आवाज उठवणारे सुनील शेळके हेच या निर्णयाचे खरे शिल्पकार आहेत.
त्यांच्या प्रयत्नामुळे आता देहूरोड परिसराला नवा श्वास मिळणार आहे.
भविष्यातील दिशा आणि नियोजन
निधी वितरणासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन केली जाणार आहे.
अंमलबजावणीसाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात येणार असल्याचेही सुत्रांकडून समजते.