राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांना अखेरचा निरोप; उत्राणे गाव शोकसागरात, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांच्या आकस्मिक निधनामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर येताच कार्यकर्ते, सहकारी आणि नागरिकांमध्ये शोककळा पसरली. आज त्यांच्या मूळगावी बागलाण तालुक्यातील उत्राणे येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. गावात सर्वत्र शांतता आणि हळहळ दिसून येत होती. सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी आणि अंत्यसंस्कारस्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली...
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित डायरीचे लोणावळ्यात प्रकाशन.
लोणावळा: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेवा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात त्यांच्या जीवनावर आधारित डायरीचे लोणावळ्यात प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती होती. शिवसेवा प्रतिष्ठानने प्रकाशित केलेली ही डायरी २०२५ साठी तयार केली असून तिचे वैशिष्ट्य म्हणजे अहिल्याबाईंच्या जीवनकार्याची ४० पृष्ठांची माहिती सांगलीच्या लेखिका सौ. विनिता ताई तेलंग यांनी साकारणे. या डायरीत पुण्यातील नामांकित चित्रकार...
प्रभाग २४ मध्ये कमळाचा जल्लोष; जनतेचा कौल भाजपाच्या बाजूने, चारही उमेदवारांचा दणदणीत विजय
पुणे | प्रतिनिधी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती – कमला नेहरू रुग्णालय – के. ई. एम. हॉस्पिटल परिसर) मधून भारतीय जनता पक्षाने यश मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या प्रभागातून नगरसेवक पदासाठी उभे असलेले भाजपाचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून, “कौल जनतेचा, विजय कमळाचा” हे घोषवाक्य प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. या...
पुण्यातील घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील गँगस्टर अटकेत, ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : Pune शहरात घडलेल्या घरफोडीच्या मालिकेचा मोठा पर्दाफाश करत Maharashtra Police दलातील Vishrambag Police Station तपास पथकाने धडाकेबाज कारवाई करत उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला अटक केली आहे. या कारवाईदरम्यान सुमारे ६२ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात घरफोडीचा गुन्हा नोंद झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश...
आर्थिक क्षेत्रातील ‘हक्क न सांगितलेल्या मालमत्ता निपटारा’ मोहीम नागरिकांसाठी उपयुक्त -जिल्हाधिकारी सौरभ कटियार
आर्थिक क्षेत्रातील 'हक्क न सांगितलेल्या मालमत्ता निपटारा' मोहीम केवळ वित्तीय क्षेत्रासाठीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही अत्यंत उपयुक्त आहे. नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी येथे केले. वित्तीय सेवा विभाग, अर्थ मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सल्ल्यानुसार राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसी) महाराष्ट्र व जिल्हा अग्रणी बँकेतर्फे राज्यात "हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा" या उपक्रमांतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई उपनगरमधील या शिबिराचा शुभारंभ...
निगडी प्रकरणात न्यायालयीन आदेशाचा अवमान; PCMC पोलिस आयुक्तांविरोधात अवमान याचिका, उच्च न्यायालयाची नोटीस
पुणे : निगडी, पुणे येथील एका गंभीर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक 09 जून 2025 रोजी दिलेल्या स्पष्ट, ठोस व बंधनकारक आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगर पोलिस आयुक्त (PCMC Police Commissioner) यांच्याविरोधात थेट Contempt of Court Act, 1971 अंतर्गत अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणेतील उत्तरदायित्व आणि कायद्याच्या...
चिखलीतील अंगणवाडी रोड ते अष्टविनायक चौक रस्त्याचे डांबरीकरण सुरू; यश साने यांच्या प्रयत्नांना यश
पिंपरी-चिंचवड : चिखली येथील अंगणवाडी रोड ते अष्टविनायक चौक या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण आज युवा नेते यश दत्ताकाका साने यांच्या प्रमुख उपस्थितीत मोरेवास्तीतील नागरिकांच्या वतीने नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. हा मार्ग काही काळापूर्वी स्ट्रोम वॉटर लाईनच्या कामामुळे खड्डेमय झाला होता आणि मनपाच्या वतीने दुरुस्ती न झाल्याने नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक यांना रोजच प्रवास करताना गंभीर असुविधांचा सामना करावा...
गुवाहाटी विमानतळाला नवे रूप! लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य नव्या टर्मिनलचे उद्घाटन
गुवाहाटी शहरासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभिमानास्पद ठरला आहे. लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अत्याधुनिक आणि भव्य नवीन टर्मिनल इमारत प्राप्त झाली असून, यामुळे आसामसह संपूर्ण ईशान्य भारताच्या हवाई संपर्काला नवे बळ मिळाले आहे. या नव्या टर्मिनलमुळे प्रवाशांच्या सुविधांमध्ये मोठी वाढ होणार असून, गुवाहाटीचे देश-विदेशाशी असलेले दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. नव्या टर्मिनलच्या उभारणीत अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल सुविधा आणि प्रवासी-केंद्रित...
कुदळवाडी-चिखली परिसरातील मोफत महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शत्रुघ्न काटेंनी केली सामाजिक कार्याची प्रशंसा!
कुदळवाडी आणि चिखली परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या माध्यमातून शेकडो नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या, औषधोपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मोफत घेतला. समाजासाठी केलेल्या या उपक्रमाचे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी विशेष कौतुक केले आणि आयोजक दिनेश यादव यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. समाजासाठी आरोग्याचा मोठा उपक्रम या शिबिरात सामान्य सर्दी-खोकल्यापासून ते हृदयरोग,...
पाकिस्तानी सेनाप्रमुख असीम मुनीरचा मुकेश अंबानीवर धमकी भरला बयब; भारतीय सुरक्षा तंत्र चिंतित.
बई/नई दिल्ली: पाकिस्तानच्या सेनाप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अलीकडे अमेरिकेच्या टॅम्पा, फ्लोरिडा येथे झालेया एका डिनरमध्ये भारताच्या प्रतिष्ठित उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावर धमकी भरलेल्या टिप्पण्या केल्याचे समोर आले आहे. हा बयब भारतीय सुरक्षा संस्थांनी गंभीरपणे घेतला आहे. त्यांनी अंबानीच्या फोटोसह एक ट्वीट करून "सूरह फील" चा उल्लेख केला होता, ज्यात अल्लाच्या सर्वशक्तिमानतेचे वर्णन आहे आणि कोणत्याही शत्रूला मात देण्याच्या क्षमतेचा उल्लेख आहे. धमकीचा संदर्भ: मुनीरने पाकिस्तानी प्रवासी समुदायासमोर म्हटले, "एक ट्वीट...










