0
0
0
0
0

सामाजिक

Home सामाजिक Page 14

ट्राफिक सिग्नल बंद पाडणाऱ्या बॅटरी चोरट्या टोळीचा वानवडी पोलिसांकडून पर्दाफाश; 34 बॅटरींसह चार जण जेरबंद, पाच गुन्ह्यांचा उलगडा

पुणे : शहरातील वाहतूक व्यवस्थेला थेट बाधा आणणाऱ्या ट्राफिक सिग्नल कंट्रोलर बॉक्समधील बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा वानवडी पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. सिग्नल लाईट गेल्यानंतरही बॅटरीवर चालणारी यंत्रणा ठप्प करून नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या या टोळीतील चार जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातून तब्बल 34 बॅटऱ्या, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि इतर साहित्य असा सुमारे ₹1.68 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात...

पिंपरी चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शंकर जगताप यांची ‘मॅरेथॉन बैठक

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि वाढत्या नागरीकरणाला योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी महापालिका प्रशासनासोबत सविस्तर ‘मॅरेथॉन बैठक’ घेत विविध विकासकामांबाबत ठोस सूचना दिल्या. या बैठकीत पाणीपुरवठा, रस्ते, सार्वजनिक सुविधा, हॉकर्स झोन, पोस्ट ऑफिस, पोलीस स्टेशन तसेच उद्योग महर्षी रतन टाटा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘ऑटोमोबाइल म्युझियम’ उभारणीसारखे अनेक महत्त्वाचे विषय चर्चेत...

20 दिवसांच्या अथक तपासानंतर चाकण उत्तर पोलिसांकडून अज्ञात तरुणाच्या खुनाचा उलगडा; आईसह तिघांना अटक

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि गुंतागुंतीच्या खुनाच्या प्रकरणाचा अवघ्या 20 दिवसांत यशस्वी उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. अनोळखी मृतदेहापासून सुरू झालेला तपास आरोपींपर्यंत पोहोचवून पोलिसांनी तिघांना अटक करत गुन्हा उघडकीस आणला आहे. दि. 11 जानेवारी 2026 रोजी मौजे बिरदवडी गावच्या स्मशानभूमीच्या मागील ओढ्यालगत असलेल्या मोकळ्या आणि निर्मनुष्य जागेत...

आडगाव बुद्रुक येथे भाजप प्रचारसभेला मोठी गर्दी; पंकजाताई मुंडे यांचे विकासावर ठाम मत

आडगाव बुद्रुक | प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक येथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सभेत आडगाव बुद्रुक गटाचे भाजप उमेदवार रामराव काका शेळके, तसेच आडगाव व गांधेली पंचायत समिती गणाचे उमेदवार चारुशीला गांवडे आणि संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला.  भाजप सरकारच्या कामगिरीचा आढावा सभेत उपस्थित नेत्यांनी बोलताना...

डेअरी फार्म उड्डाणपुलाला ‘लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब’ यांचे नाव द्यावे; पिंपरीतील राष्ट्रवादी नगरसेवकांची जोरदार मागणी

पिंपरी | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या पिंपरी येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या डेअरी फार्म उड्डाणपुलाला ‘लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब उड्डाणपूल’ असे नाव देण्यात यावे, अशी ठाम आणि भावनिक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांकडून करण्यात आली आहे. ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक २१ मधील सर्व नगरसदस्यांच्या वतीने नगरसेवक डब्बू आसवानी यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका...

कर्तृत्वाचा गौरव आणि अभिमानाचा क्षण: गुन्हे शाखेत पदोन्नतीचा सोहळा, ‘पाइपिंग सेरेमनी’त कुटुंबीयांच्या उपस्थितीत सन्मान

मुंबई | प्रतिनिधी पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण सेवेचा गौरव करत आज गुन्हे शाखेतील तीन पोलीस शिपाई यांना पोलीस हवालदार पदावर, तर एका पोलीस हवालदारास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर पदोन्नती देण्यात आली. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘पाइपिंग सेरेमनी’ कार्यक्रमात पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पदचिन्हे प्रदान या सोहळ्यात अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे यांच्या...

‘३६ तासांत १२ मुले बेपत्ता’ अफवा ठरली खोटी; मुंबई पोलिसांचा नागरिकांना इशारा, अफवा पसरवणाऱ्यांवर FIRची कारवाई

मुंबई | प्रतिनिधी मुंबईत अवघ्या ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी याबाबत ठाम शब्दांत खुलासा करत नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. या खोट्या पोस्ट्समुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई पोलिसांचा अधिकृत खुलासा मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर स्पष्ट करत म्हटले आहे की,“काही...

ठाण्यात अश्रूंनी न्हालेली श्रद्धांजली: स्व. अजितदादांच्या अस्थीकलशांचे दर्शन, पक्ष कार्यालयात भावनिक वातावरण

ठाणे | प्रतिनिधी मा. अजितदादांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असताना, आज ठाण्यातील पक्ष कार्यालयात त्यांच्या अस्थीकलशांचे दर्शन घेण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. वातावरण अत्यंत भावनिक असून, अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात आठवणींचा पूर दिसून येत होता. श्रद्धा, आठवणी आणि भावनांचा संगम अस्थीकलशांचे दर्शन घेताना अजितदादांच्या राजकीय कार्याची, नेतृत्वाची आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या...

कराडमध्ये भावनिक भेट: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिवंगत पीएसओ विदिप जाधव यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट

कराड, सातारा | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा पवार यांनी कराड येथे दिवंगत पीएसओ (Personal Security Officer) विदिप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कर्तव्य बजावताना आपले प्राण गमावलेल्या विदिप जाधव यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात असून, या दुःखद घटनेनंतर पवार यांनी प्रत्यक्ष कुटुंबीयांकडे जाऊन आपुलकीने संवाद साधला. दुःखात सहभागी होत व्यक्त केली संवेदना या भेटीदरम्यान सुनेत्रा...

अजितदादा हे विकासाचे चालतं बोलतं विद्यापीठ होतंः आ.अमित गोरखे

प्रतिनिधी | पिंपरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात रामकृष्ण मोरे सभागृहात शुक्रवारी (ता. ३०) सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेस शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी तसेच सर्व पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी अजितदादांच्या आठवणी जागवल्या असता, ते जणू पुन्हा एकदा उपस्थित असल्याचा भास निर्माण...

Copyright ©