आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे भव्य उद्घाटन – पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण
पुणे – पुणे शहराच्या पोलिस यंत्रणेत एक नवीन अध्याय आजपासून सुरू झाला आहे. आंबेगाव परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणारी आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे उद्घाटन पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार यांच्या हस्ते थाटात पार पडले. या सोहळ्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आंबेगाव पोलीस स्टेशनची सुरुवात दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी...
स्वारगेटमध्ये महिला चोरट्या जेरबंद – ₹२.७० लाखांचे दागिने जप्त; ३ गुन्ह्यांचा उलगडा!
पुणे – पुणे शहराच्या मध्यवर्ती स्वारगेट परिसरात गर्दीचा फायदा घेत महिलांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका सराईत महिला चोरट्याला अखेर स्वारगेट पोलिसांनी तडाख्यात घेतले आहे. पोलिसांनी तिला गुप्त माहितीच्या आधारे रंगेहाथ पकडले असून तिच्याकडून तब्बल ₹२,७०,००० किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईतून स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. स्वारगेट परिसरातील एसटी स्टॅंड आणि...
पोलीस दलाच्या कामगिरीचा सखोल आढावा – महिलांच्या सुरक्षेवर विशेष भर, महापुराच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांना सतर्कतेचा इशारा
सांगली, 23 मे : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दलाने अत्यंत सजगतेने आणि दक्षतेने कार्य करावे, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सांगलीत आयोजित गुन्हे आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीमध्ये त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी चित्र, दोषसिद्धीचे प्रमाण, आणि नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी या विषयांवर सखोल चर्चा केली. मुख्यमंत्री म्हणाले, “नवीन फौजदारी कायद्यांमुळे पुराव्यांची...
गोरेगावात शिवसेनेच्या बैठकीत ऊर्जा, संवाद आणि दृढनिश्चयाचा जलवा – संजय निरुपम व संजय मोरेंच्या पुढाकारातून स्थानिक प्रश्नांना नवी दिशा!
मुंबई | गोरेगाव: शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांच्या पुढाकाराने आयोजित पक्षाच्या बैठकीस गोरेगावमध्ये मोठा उत्साह लाभला. या वेळी संजय निरुपम आणि प्रा. संजय मोरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न आणि युवा विकासाच्या योजना मांडल्या. त्यांनी दिलेली आश्वासने आणि घेतलेले पुढाकार यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. "संजय" दुहेरी जोडीने केलेले कार्य उल्लेखनीय – शिवसेनेच्या लोकशाही समितीला बळ या बैठकीत संजय...
अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा यांची पावसाळा पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक व पहाणी दौरा
पिंपरी, २३ मे २०२५ : पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाळ्यात घडणाऱ्या घटनांसह कोणत्याही आपत्तीला सक्षमपणे हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. पावसामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी शासनाने पूरग्रस्तांना दिलेली मदत वेळेत पोहोचवण्यासाठी त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याची खबरदारी संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देशही...
राज्यातील २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या – गृह विभागाचा मोठा निर्णय, सुरक्षा व्यवस्थेत नवीन घडी!
मुंबई | प्रतिनिधी: महाराष्ट्र गृह विभागाने गुरुवारी २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करत राज्यातील पोलिस यंत्रणेमध्ये महत्त्वपूर्ण फेरबदल केले आहेत. या बदल्यांमुळे विविध जिल्ह्यांतील कायदा-सुव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता असून, नवीन अधिकाऱ्यांवर अनेक अपेक्षा ठेवण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या बदल्यांची झलक: रायगड जिल्ह्यात आंचल दलाल यांची अधिक्षक म्हणून नियुक्ती झाली असून त्या पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या पत्नी आहेत. पालघर जिल्ह्यात यतीश देशमुख यांनी...
पुणे हुंडाबळी प्रकरण: वैष्णवी हगवणेच्या लेकराचे कासपटे कुटुंबाशी अश्रूंतून पुनर्मिलन; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
पुण्यातील गाजलेल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात एक हृदयद्रावक व भावनिक क्षण गुरुवारी घडला. वैष्णवीचा अवघ्या १० महिन्यांचा चिमुकला मुलगा तिच्या माहेरच्या कासपटे कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. हा क्षण कुटुंबियांसाठी अत्यंत भावनिक होता. अश्रूंनी डोळे भरून आलेल्या कुटुंबाने सांगितले की, "क्षणभर तरी वैष्णवी परत आली, असं वाटलं." वैष्णवी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. तिच्या आत्महत्येच्या प्रकरणाने...
वैष्णवी हगवणे प्रकरण : आदिती तटकरे यांनी पालकांची भेट घेऊन सांत्वन केलं; “अन्यायग्रस्त वैष्णवीस न्याय मिळवून देणं ही आपली नैतिक जबाबदारी”
पुणे | मुळशी :- वैष्णवी हगवणे या तरुणीच्या दुर्दैवी व संशयास्पद मृत्यूप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांच्या दुःखात सहभागी होत मनापासून सांत्वन केलं. या भेटीत बोलताना तटकरे म्हणाल्या, “ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. एका संवेदनशील मुलीचं आयुष्य अन्यायाच्या सावटाखाली संपलं, यापेक्षा...
बारामतीतील ‘सहयोग’ निवासस्थानी नागरिकांसोबत मनमोकळा संवाद : जनतेच्या अडचणींचे लवकरात लवकर निराकरण करण्याचा निर्धार
बारामती |आज बारामती येथील ‘सहयोग’ निवासस्थानी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडला. जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नांना समजून घेत त्यांच्या अडचणींचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले. नागरिकांच्या प्रतिक्रिया, सूचनांवर आधारित निर्णय प्रक्रियेला गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. जनतेच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद या संवाद सत्रात विविध क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या अडचणी, अपेक्षा आणि...
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : सात दिवसांच्या शोधानंतर अखेर सासरे राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे यांना अटक!
मुंबई | पुणे | पिंपरी-चिंचवड :- मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांचा संशयास्पद मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चांगलंच गाजू लागलं आहे. तब्बल सात दिवसांपासून फरार असलेले आणि पोलिसांच्या शोधाची ससेमिरा झालेल्या राजेंद्र हगवणे (सासरे) आणि सुशील हगवणे (दीर) यांना आज पहाटे अटक करण्यात आली. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांनी स्वारगेट परिसरातून केली. राजेंद्र हगवणे हे तळेगावमधील एका हॉटेलमध्ये सीसीटीव्हीमध्ये आढळून आले होते,...




