सामाजिक

Home सामाजिक Page 17

खराडीत मेफेड्रॉनसह तरुण जेरबंद; पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई ६.२३ लाखांचा ऐवज जप्त, अमली पदार्थ विक्रीचा डाव उधळला

0

पुणे | पुणे शहराच्या खराडी परिसरात मेफेड्रॉन (MD) या घातक अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथक १ (गुन्हे शाखा, पुणे शहर) यांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या तरुणाकडून ६.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात अंमली पदार्थासह दुचाकी, मोबाईल व इतर साहित्यांचा समावेश आहे.  अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव : हर्षवर्धन राहुल धुमाळ (वय...

सैन्य दलातील भगोड्या जवानाचा चोरीसाठी कट! वानवडी पोलिसांनी गुप्त तपासातून पकडला, लाखोंचा ऐवज जप्त

0

पुणे शहरातील वानवडी परिसरात एका सैन्य दलातील भगोड्या जवानाने चक्क सरकारी निवासस्थानातून लाखोंचा ऐवज लंपास करत धक्कादायक कृत्य केले आहे. हा जवान चोरी करून फरार झाला होता, मात्र वानवडी पोलिसांच्या उल्लेखनीय तपासामुळे त्याला अखेर अटक करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली असून, सैन्य दलातील एका जवानानेच आपल्या सहकाऱ्याचे घर फोडल्याची बाब समोर आल्याने मोठे धक्कादायक...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इस्कॉनचे डॉ. सूरदास प्रभू यांची मंत्रालयात सदिच्छा भेट; आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमांवर सखोल चर्चा

0

मुंबई (दि. १७ जून २०२५) – इस्कॉन (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस) चे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. सूरदास प्रभू यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालय, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीत सामाजिक, आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रमांबाबत विस्तृत चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. सूरदास प्रभू यांच्या सेवाभावी कार्याची प्रशंसा करत इस्कॉनच्या उपक्रमांना शासनाची पूर्ण सहकार्याची हमी...

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई: एमसीओसीए प्रकरणातील फरार आरोपीसह दोन आरोपींना अटक.

0

पुणे: पुण्यातील सिंहगड रोड पोलिसांनी एका यशस्वी मोहिमेद्वारे दोन आरोपींना अटक केली आहे. यात एमसीओसीए अंतर्गत फरार असलेला आरोपी रवि माधवराव जाधव (वय २६) आणि त्याचा साथीदार अश्विन उर्फ बर्क्या बालकृष्ण लोणारे (वय २०) यांचा समावेश आहे. रवि जाधव हत्या प्रयत्न प्रकरणात फरार होता, तसेच त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (MCOCA) देखील गुन्हा दाखल होता. रवि जाधव दोन महिन्यांपासून...

पुण्यात ‘बारक्या टोळी’चा पर्दाफाश – घरफोडी व वाहनचोरी करणारे पाच जण जेरबंद!

0

पुण्यात घरफोडी आणि वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने मोठी कारवाई करत कुख्यात 'बारक्या टोळी'चा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या टोळीतील पाच आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर अनेक घरफोडी आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लागला आहे. गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी योजनाबद्ध कारवाई करत या टोळीचा बंदोबस्त केला. पो. हवा. नितीन मुंडे...

पुण्यनगरीच्या ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराच्या जतन व संवर्धन कामांना प्रारंभ!

0

पुणे (दि. ६ जुलै २०२५) : पुणे शहराच्या श्रद्धेचे प्रतीक, पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराच्या जतन व संवर्धन कार्याचा भव्य शुभारंभ आज सकाळी ११ वाजता करण्यात आला. या ऐतिहासिक क्षणी, आमदार हेमंत रसाने यांच्या पुढाकारातून आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ₹४० लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर करण्यात आला आहे. ही वास्तू केवळ धार्मिक नव्हे, तर हेरिटेज आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत...

शिवप्रेमींना अभिमानाचा क्षण: शिवरायांचे १२ दुर्ग युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट – भारताचे वैभव जागतिक स्तरावर चमकले!

0

पुणे | १२ जुलै २०२५ – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेचे ऐतिहासिक साक्षीदार ठरलेले १२ दुर्ग युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आता अधिकृतपणे समाविष्ट झाले आहेत. प्रत्येक शिवप्रेमींसाठी, मराठी मनासाठी आणि भारताच्या ऐतिहासिक शौर्याचे प्रतीक असलेल्या या किल्ल्यांचे जागतिक स्तरावर झालेले मान्यतेचे हे अनमोल यश आहे. कोणते आहेत हे गौरवशाली १२ किल्ले? रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, लोहगड,...

अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा यांची पावसाळा पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक व पहाणी दौरा

0

पिंपरी, २३ मे २०२५ : पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाळ्यात घडणाऱ्या घटनांसह कोणत्याही आपत्तीला सक्षमपणे हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. पावसामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी शासनाने पूरग्रस्तांना दिलेली मदत वेळेत पोहोचवण्यासाठी त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याची खबरदारी संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देशही...

महाराष्ट्रातील शाळांमध्ये आता CBSE अभ्यासक्रम लागू; शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी क्रांती

0

मुंबई, दि. २० मार्च २०२५ – महाराष्ट्रातील शालेय शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडवत राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते बारावी या वर्गांसाठी CBSE अभ्यासक्रम लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी विधान परिषदेत ही घोषणा करत सांगितले की, येत्या 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. CBSE अभ्यासक्रमामुळे शिक्षणात गुणवत्ता वाढणार या निर्णयामुळे राज्य...

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजितदादांचा निळकंठेश्वर पॅनल विजयी! 21 पैकी 20 जागांवर दणदणीत यश; युवा नेते यश साने व पंकज भालेकर यांची अभिनंदन भेट

0

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बहुचर्चित आणि राज्याचे लक्ष वेधून घेणारा निकाल अखेर जाहीर झाला असून, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलने तब्बल 21 पैकी 20 जागा जिंकत प्रचंड दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालामुळे अजित पवारांचे सहकार क्षेत्रातील वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले असून, विरोधी शरद पवार यांच्या बळीराजा पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही. या विजयामुळे संपूर्ण बारामती परिसरात...

Copyright ©