पुणे | पुणे शहराच्या खराडी परिसरात मेफेड्रॉन (MD) या घातक अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथक १ (गुन्हे शाखा, पुणे शहर) यांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या तरुणाकडून ६.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात अंमली पदार्थासह दुचाकी, मोबाईल व इतर साहित्यांचा समावेश आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव :
हर्षवर्धन राहुल धुमाळ (वय २०), रा. चंदननगर, खराडी, पुणे
काय सापडले आरोपीकडून?
मेफेड्रॉन (MD) अंमली पदार्थ – २३ ग्रॅम १८ मिलीग्रॅम – ₹ ४,६३,६००/-
मोटारसायकल (नंबर प्लेटशिवाय) – ₹ १,००,०००/-
मोबाईल फोन – ₹ ६०,०००/-
पारदर्शक प्लास्टिकच्या रिकाम्या २० पिशव्या
काळ्या रंगाचे पॉकेट पाऊच
एकूण जप्त ऐवजाची किंमत ₹६,२३,६००/-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…
दि. २६ जुलै रोजी खराडीतील स्वामी समर्थ प्लाझा समोर, सार्वजनिक रस्त्यावर आरोपी भरधाव केटीएम दुचाकीवर राँग साईडने जात असताना पोलिसांना संशय आल्याने त्याला थांबवण्यात आले. विचारपूस करताच आरोपी गोंधळलेली उत्तरे देऊ लागला. त्याची कसून झडती घेतल्यानंतर अंमली पदार्थ आणि इतर साहित्य मिळून आले.
आरोपीवर गुन्हा दाखल
खराडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १५३/२०२५ अन्वये NDPS कायदा कलम ८(क), २२(ब) अंतर्गत गुन्हा नोंद
कारवाईसाठी पुढील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी सज्ज :
मा. पोलीस आयुक्त – श्री. अमितेश कुमार
अपर पोलीस आयुक्त – श्री. पंकज देशमुख
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) – श्री. निखील पिंगळे
सहाय्यक पोलीस आयुक्त – श्री. राजेंद्र मुळीक
पोलीस निरीक्षक – प्रशांत अन्नछत्रे
सहा. पो. निरीक्षक – अनिल सुरवसे
PSI – दिगंबर कोकाटे व पथक
खराडी पोलीस स्टेशनचे – PSI राहुल कोळपे व सहकारी
शहरातील तरुणाईला अंमली पदार्थांच्या गर्तेतून वाचविण्यासाठी पोलिसांची कार्यवाही सुरूच
या कारवाईमुळे खराडी परिसरात काही काळ खळबळ उडाली असून, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्यांवर पोलीस प्रशासन सतर्क आहे. पुणे शहरात अंमली पदार्थांचे जाळे उध्वस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून अशा टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांना आवाहन
“कुठेही संशयास्पद हालचाल आढळल्यास किंवा अंमली पदार्थांबाबत माहिती असल्यास त्वरित पोलीस कंट्रोल रूम अथवा नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये कळवावे.”