महाराष्ट्र
आमदार हेमंत रासने यांच्या पुढाकाराने ‘स्वच्छ आणि सुंदर कसबा’ मोहिमेअंतर्गत बेवारस वाहने हटवण्याची मोहीम सुरू!
पुणे – कसबा मतदारसंघाच्या स्वच्छता आणि सौंदर्यात भर घालण्यासाठी आमदार हेमंत रासने यांच्या पुढाकाराने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने कसबा मतदारसंघात बेवारस वाहने हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामुळे रस्ते अधिक स्वच्छ, मोकळे आणि सुस्थितीत राहणार असून, रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांचा प्रश्न निकाली निघणार आहे. बेवारस वाहने शहर...
महाराष्ट्रात ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ बसवण्याच्या दरांबाबत मोठी माहिती; अन्य राज्यांप्रमाणेच दर निश्चित!
मुंबई – राज्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याचे दर महाराष्ट्रात अन्य राज्यांप्रमाणेच आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी गैरसमज टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठी HSRP बंधनकारक! देशभरात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या वाहनांसाठी ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी परिषद – 2025: महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय!
मुंबई – महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या बळकटीसाठी तसेच राज्यातील पोलिस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने ‘वरिष्ठ पोलीस अधिकारी परिषद – 2025’ चे भव्य आयोजन करण्यात आले. या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले. या वेळी सुरक्षा व्यवस्थेच्या सुदृढीकरणावर भर देण्यात आला असून, पोलीस दलाच्या अत्याधुनिकरणासह गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नव्या उपाययोजनांचा आढावा...
राष्ट्रीय बाल आरोग्य मोहीम : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भव्य शुभारंभ!
राज्यातील बालकांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी राज्य सरकारने राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत विशेष तपासणी मोहीमेचा शुभारंभ केला आहे. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते औंध येथील इंदिरा गांधी मॉडेल स्कूलमध्ये या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी मंचावर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,...
शिवाजी कोर्ट बसस्थानकातील प्रकार : डीसीपी गिल साहेबांचा तपास, सत्य उघडकीस आणण्याची मागणी
पुणे - शिवाजी कोर्ट बसस्थानकात घडलेल्या प्रकारानंतर पुणे पोलिसांनी वेगवान कारवाई सुरू केली आहे. डीसीपी गिल साहेब यांनी स्वतः चौकशी केली असून, याप्रकरणी नेमकी सत्यस्थिती काय आहे हे स्पष्ट करण्यासाठी संबंधित अधिकारी आणि साक्षीदारांची जबानी घेतली जात आहे. या घटनेबाबत बोलताना एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले की, "सत्य माहिती मिळेपर्यंत कोणतेही आंदोलन करणार नाही. मात्र, प्राथमिक माहिती खरी आहे की नाही,...
मुंबईत डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय! MMRDA आणि NPCI यांच्यात ऐतिहासिक करार, BKC येथे NPCI चे जागतिक मुख्यालय उभारणार
मुंबई :- महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आर्थिक व्यवहारांचे प्रमुख केंद्र आहे. या अर्थसत्ता आणि तंत्रज्ञानाच्या केंद्रबिंदूत आता आणखी एक मोठी भर पडली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, या करारानुसार BKC (बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स) येथे NPCI चे जागतिक मुख्यालय उभारले जाणार आहे. मुख्यमंत्री...
मुंबईत फेब्रुवारीतच उष्णतेचा कहर! उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम, नागरिकांनी घ्यावी काळजी
मुंबई :- मुंबईत सध्या उष्णतेची लाट पसरली असून फेब्रुवारी महिन्यातच तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई आणि परिसरासाठी यलो अलर्ट जारी केला असून, पुढील काही दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. IMD चा इशारा – तापमान वाढीचा ट्रेंड चिंताजनक भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार २८ फेब्रुवारी रोजी तापमान कमाल ३५ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे. जागतिक...
११ वर्षांनी कैद्याचा पर्दाफाश! पोलीस हत्येच्या गुन्ह्यातील दोषी शिताफीने अटकेत
पुणे :- तब्बल ११ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत आयुष्य जगणाऱ्या आणि पोलीस हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या आरोपीला अखेर पुणे पोलिसांनी अत्यंत शिताफीने जेरबंद केले. कर्नाटकातील गुलबर्गा येथे एका पोलीस अंमलदाराच्या हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला अमरीश काशीनाथ कोळी (वय ४५, मुळगाव घाटगे लेआउट, कलबुर्गी, कर्नाटक, सद्य: रा. गंगानगर, फुरसुंगी, पुणे) हा कैदी शासकीय रुग्णालयातून २०१४ मध्ये पळून गेला होता. अखेर...
स्वारगेट अत्याचार प्रकरण: तब्बल 70 तासांनंतर आरोपीला अटक! पोलिसांनी उलगडला शोधमोहिमेचा थरार
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी दत्ता गाडे (Dattatray Gade) याला अखेर पुणे पोलिसांनी शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास अटक केली. तब्बल 70 तास पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी श्वान पथक, ड्रोन आणि मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचारी तैनात केले होते. विशेष म्हणजे, ग्रामस्थांच्या मदतीने हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला. आरोपी तब्बल तीन दिवस...













