Home Breaking News बेकायदेशीर गॅस रिफिलींग प्रकरण: पुण्यात छापा टाकून १.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेकायदेशीर गॅस रिफिलींग प्रकरण: पुण्यात छापा टाकून १.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

110
0

हडपसर परिसरात बेकायदेशीर गॅस रिफिलींग करणाऱ्या एका इसमावर काळेपडळ पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे १,३०,४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

📍 घटनेचा तपशील:

दिनांक १८ मार्च २०२५ रोजी काळेपडळ पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे आणि त्यांचे पथक पेट्रोलिंग दरम्यान गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अतुल पंधरकर यांना गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे माऊली गॅस एजन्सी, हांडेवाडी रोड, हडपसर येथील पत्र्याच्या गाळ्यात छापा टाकण्यात आला.

📌 या कारवाईत निकांत राजकुमार जाधव (वय २२, रा. साईबाबा मंदिराजवळ, शोभास्पर्श अपार्टमेंट, फ्लॅट नं. १०२, ससाणेनगर, हडपसर, पुणे) या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले.

📍 मुद्देमाल:

छाप्यात एकूण ८० गॅस टाक्या, वजन काटा, आणि गॅस ट्रान्सफर पाईप असे सुमारे १,३०,४३० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

📍 पोलीस अधिकार्‍यांची कामगिरी:

ही कारवाई मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहा. पोलीस आयुक्त श्री. धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, अतुल पंधरकर, महादेव शिंदे, आणि सद्दाम तांबोळी यांच्या पथकाने केली.

📌 पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे करत आहेत.