महाराष्ट्र
लोणीकंद येथे भरधाव टेम्पोचा अपघात; चालक ठार, क्लिनर गंभीर जखमी – वाहतुकीच्या नियमांकडे केले दुर्लक्ष
पुणे शहराजवळील लोणीकंद परिसरात २९ जून २०२५ रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता एक भीषण अपघात झाला. खंडोबा माळ, लोणीकंद येथे भरधाव वेगात असलेला टेम्पो मागून ट्रेलरवर आदळून टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना केसनंद रोडने नगर रोडकडे जात असताना घडली. अपघातात मृत झालेल्या टेम्पो चालकाचे नाव ईश्वर बाळासाहेब उगले (वय ३४...
तुळशीबाग परिसरात भरदिवसा महिला पादचारीवर झडप घालून पर्स हिसकावली; सुमारे ७०,००० रुपये किंमतीचा ऐवज चोरीला
पुणे शहराच्या मध्यवर्ती आणि नेहमीच गर्दीने फुललेल्या तुळशीबाग परिसरात भरदिवसा एक धक्कादायक चोरीची घटना घडली आहे. २८ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास, कावरे कोल्ड्रिंक्स ते राम मंदिर दरम्यान पायी जात असलेल्या एका महिलेची पर्स अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. सदर महिलेकडे असलेली पर्स ही जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आली असून, त्यामध्ये १०,०००/- रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने होते....
सिंहगड रोडवरील ‘वि मार्ट’ परिसरात दहशतीचा अतिरेक; मोटारसायकलवर आलेल्या सहा दरोडेखोरांकडून धारदार शस्त्रांनी हल्ला, अनेक गाड्यांचे नुकसान!
पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात दुपारी सुमारे २.४० वाजण्याच्या सुमारास मोहीते पॅराडाईज, मॅकडोनाल्ड जवळील 'अनलिमीटेड (वि मार्ट)' शोरूम परिसरात मोठा गोंधळ आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले. सहा अज्ञात इसम धारदार हत्यारांसह मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी शोरूमच्या काचेच्या दरवाज्यावर हल्ला केला, तसेच परिसरातील १५ ते २० चारचाकी वाहनांची तोडफोड केली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव...
मोका गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट २ ने केली जेरबंद; आंबेगाव परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई!
पुणे शहरातील गुन्हेगारीच्या मुसक्या आवळण्याच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) अंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी रुपेश राजन केंद्रे (वय १९) याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने एक शिताफीने अटक केली आहे. या आरोपीविरोधात भा.दं.वि कलम 103, 109, 126(2), 352(3)(5), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट, आर्म अॅक्ट 4(25) आणि महत्त्वाचे म्हणजे MCOCA कायद्याच्या...
पुणे पोलीस आयुक्तालयातील आंबेगाव पोलीस स्टेशन ठरले ISO 9001:2015 मानांकित; नागरिकांसाठी दर्जेदार सेवांचा नवा अध्याय सुरू!
पुणे शहर पोलीस दलासाठी एक अभिमानास्पद क्षण... आंबेगाव पोलीस स्टेशनने "ISO 9001:2015" प्रमाणपत्र प्राप्त करून पोलीस आयुक्तालयातील पहिले मानांकित पोलीस ठाणे होण्याचा मान पटकावला आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून आज मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान समारंभ संपन्न झाला. या वेळी उपस्थित असलेले वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी आंबेगाव पोलीस स्टेशनच्या सुसूत्र व गुणवत्तापूर्ण कार्यपद्धतीचे...
“स्व. ऋतुजाचे बलिदान व्यर्थ जाणार नाही…! धर्मांतरबंदी कायदा लवकरच लागू होणार – धर्मांतर बंदी कायद्यासाठी महेशदादा लांडगे यांनी दिला निर्धाराचा इशारा!
सांगली जिल्ह्यातील एका उच्चशिक्षित, सात महिन्यांची गर्भवती असलेल्या हिंदू भगिनीच्या दुःखद मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. स्व. सौ. ऋतुजा राजगे या तरुण विवाहितेने सासरच्या मंडळींकडून ख्रिश्चन धर्मांतरणासाठी होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून आपले जीवन संपवले. मात्र मृत्यूपूर्वी तिने आपल्या कृतीतून एकच संदेश दिला – “प्राण सोडला पण हिंदू धर्म नाही सोडला!” ही घटना केवळ एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण हिंदू...
बंडगार्डन रेल्वे स्थानकाजवळ जबरी चोरी करणारा राजस्थानमधील आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात; तब्बल १८.६६ लाखांचे सोने जप्त
पुण्यातील बंडगार्डन रेल्वे स्टेशनबाहेर दिनांक ११ जून २०२५ रोजी घडलेली ७४० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची जबरी चोरीची घटना शहरातील खळबळजनक गुन्ह्यांपैकी एक ठरली होती. सदर घटनेत मुंबईवरून आलेल्या पुण्यातील नामांकित सोनं पेढी शोरूमच्या प्रतिनिधीकडून तब्बल ₹६९ लाख किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १८६/२०२५ भा.दं.वि. कलम ३९२, ३४ तसेच शस्त्र कायद्यान्वये गुन्हा...
नांदेडसिटी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; तब्बल ९.१३ लाखांचा मुद्देमाल परत देत नागरिकांचा विश्वास संपादन
नांदेडसिटी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या तपास पथकाने आणि सायबर सेलच्या समन्वयाने एक उल्लेखनीय आणि जनतेच्या हितासाठी साकारलेली कामगिरी नुकतीच पार पडली. गुन्हेगारी तपासाच्या दरम्यान पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला एकूण ₹९,१३,०००/- किंमतीचा मुद्देमाल पुन्हा संबंधित तक्रारदारांना परत करण्यात यश मिळवले आहे. ही कामगिरी नागरिकांच्या दृष्टीने दिलासादायक ठरली असून, पुणे पोलिसांची कार्यक्षमता आणि तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. गोपनीय...
लाच घेताना दोन न्यायालयीन लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; पिडीत तक्रारदाराला मिळाला न्याय
पुणे : पुण्यातील भाडे नियंत्रण कायद्यान्वये दाखल खटल्यात न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर फ्लॅटचा ताबा मिळावा यासाठी तडजोड म्हणून लाच मागणाऱ्या दोन न्यायालयीन लिपिकांना अंमलबजावणी करताना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २७ जून रोजी सापळा रचून केली असून, यात लिपिक रविंद्र हिंदूराव पवार (वय ४०) आणि अमित बबन भुसारी (वय ३४) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. प्रकरण काय...
“शेअर मार्केटच्या नशेत सुजलेले डोळे! नातवाने आजीच्या डोक्यात घातली कुऱ्हाड; जळगाव हादरलं”
जळगाव | दिनांक: २८ जून २०२५ - जळगाव जिल्ह्यातील धरणगाव परिसरातून आलेली ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. केवळ शेअर बाजारात अधिक पैसे गुंतवण्यास नकार दिल्यामुळे एका नातवाने आपल्या ७३ वर्षीय आजीवर क्रूरपणे कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामुळे जखमी झालेल्या आजीवर सध्या रुग्णालयात गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत. घरातच घडलेली रक्तरंजित घटना! पीडित आजीचे नाव लिलाबाई रघुनाथ विसपुते (वय ७३,...




