महाराष्ट्र
येरवडा जमीन अभिलेख कार्यालयात भीषण आग; ५० हून अधिक वाहने जळून खाक, कारणाबाबत संशय कायम
पुण्यातील येरवडा परिसरात दुपारी सुमारे १२:३० वाजण्याच्या सुमारास जमीन अभिलेख कार्यालयाच्या खुल्या जागेत भीषण आग लागल्याची घटना घडली. ही जागा Pune Municipal Corporation (PMC) हद्दीत येते. आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ५० हून अधिक पार्क केलेली वाहने जळून खाक झाली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आगीत अंदाजे १५ ते २० चारचाकी आणि ४० ते ५० दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. खुल्या...
सलीम खान यांच्या प्रकृतीत सुधारणा; आमिर खान यांची भेट, कुटुंबीय आशावादी
मुंबई : ज्येष्ठ पटकथालेखक Salim Khan यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याची माहिती अभिनेते Aamir Khan यांनी दिली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आमिर खान यांनी सकारात्मक अपडेट देत “सलीम साहेब लवकरच बरे होऊन घरी परततील,” असा विश्वास व्यक्त केला. बुधवारी Mumbai Press Club च्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आमिर खान यांना माध्यमांनी सलीम खान यांच्या प्रकृतीविषयी विचारले...
नगरसदस्य, नगरसदस्या यांच्या तक्रारींचा प्राधान्याने निपटारा करून जबाबदारीने काम करा; नागरिकांकडून कडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यावरही कार्यवाही करा – महापौर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना….
पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांनी समन्वयाने काम करणे अत्यावश्यक आहे. शहर स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख ठेवण्यासाठी प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी, कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणांचे सुशोभीकरण, अतिक्रमणांवर कारवाई करताना फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसह आवश्यक पायाभूत कामे वेळेत पूर्ण करणे यावर विशेष भर देणे आवश्यक आहे. याशिवाय, नागरिक व नगरसदस्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा विहीत वेळेत निपटारा करून प्रशासनाने...
“रात्रभर झोप शहरासाठी! नव्या आयुक्तांच्या आदेशानंतर पुणे शहरात रात्रीतून कचरा उचलण्याची मोहिम सुरू” महापालिकेचा मोठा निर्णय; १३६ टन कचरा गोळा – स्वच्छ पुण्यासाठी नवीन दिशा
पुणे, दि. १० जुलै २०२५ : शहरातील स्वच्छतेसाठी महत्त्वाचा निर्णय घेत पुणे महापालिकेने रात्रीतून कचरा उचलण्याची ऐतिहासिक मोहिम अखेर सुरू केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा निर्णय नवनियुक्त आयुक्त नवलकिशोर राम यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्षात उतरला आहे. पूर्वी अनेक नागरिक रात्रीच्या अंधारात उघड्यावर कचरा टाकून देत असल्याने सकाळपर्यंत शहरात कचराकुंड्या ओसंडून वाहायच्या. दुसरीकडे सकाळी उशिरा येणाऱ्या घनकचरा वाहनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र...
रोह्यात ‘सुनील द. तटकरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी’चे लोकार्पण; तरुणांना करिअरच्या नव्या संधी
Roha येथे तरुणांच्या शैक्षणिक आणि करिअरच्या संधी वाढविण्याच्या उद्देशाने ‘सुनील द. तटकरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी’ तसेच IESP Institute चा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट, रोहा, द युनिक अकॅडमी आणि आय.ई.एस.पी. संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार Sunil Tatkare यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी वरदाई चॅरिटेबल ट्रस्टच्या...
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाला गती; पहिल्या टप्प्यात ८६४ कुटुंबांना नव्या घरांच्या चाव्या
Naigaon BDD Chawl येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ८६४ पुनर्वसन सदनिकांच्या वितरण सोहळ्याचा शुभारंभ आज दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थ्यांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या आणि ताबा पत्र सुपूर्द करण्यात आले. जवळपास चार दशकांच्या प्रतीक्षेनंतर...
गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहराची मोठी कामगिरी — सराईत घरफोड्या आरोपीस अटक, तब्बल २१ लाखांचा मुद्देमाल जप्त!
पुणे : शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष मोहिम राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट ६ ने आणखी एक मोठी कामगिरी बजावली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी वाघोली येथील चोखीढाणीजवळ सापळा रचून सराईत आरोपी बिरजू राजपूतसिंग दुधानी (वय ४०, रा. रामटेकडी, वानवडी, पुणे) यास अटक केली. आरोपीकडून चोरीची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार आणि...
खंबीर श्रद्धेचा आणि भक्तीचा महासागर: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे भव्य स्वरूप
🔸 संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने डोंगररांगांमधून उलगडला भक्तीरसाचा प्रवाहपावसाच्या सरी, डोंगररांगा, हिरवाई आणि हजारो भक्तांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला… संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रवासाला डोंगराळ वाटांवरून अद्वितीय दृश्य लाभले. पंढरपूरकडे प्रस्थान करताना लाखो वारकऱ्यांनी भक्तिभावाने वाट चालली. ढोल-ताशांचा निनाद, टाळ-मृदुंगांचा ताल, आणि "ज्ञानोबा माऊली तुकाराम" चा जयघोष सर्वत्र निनादत होता. 🔸 वारकऱ्यांची गर्दी म्हणजे श्रद्धेचा महासागर डोंगर उतारांवरून तर सरळ...
“एक दिवा – पराक्रमासाठी”: सीमारेषेवरील वीरांसाठी पुण्यात दिवे लावून अभिवादन!
पुणे :- देशाच्या संरक्षणासाठी सीमारेषेवर दिवस-रात्र झगडणाऱ्या भारतीय सैन्यदलाच्या जवानांना आणि सीमावर्ती भागातील सामान्य नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर प्रांगणात “एक दिवा – पराक्रमासाठी” हा प्रेरणादायी कार्यक्रम असीम फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, लहान मुलं, महिलावर्ग आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत एकात्मतेचा, शौर्याचा आणि आशेचा दिवा...
चतुःश्रृंगी पोलिसांची मोठी कारवाई! बाणेरमधील ‘फार्म कॅफे’ शेतात चालणारा अवैध हुक्का बार उध्वस्त — ४८,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे :- पुणे शहर पोलिसांच्या चतुःश्रृंगी पोलिसांनी औंध-बाणेर लिंक रोडवरील शेतात अनधिकृतरित्या चालणारा हुक्का बार उध्वस्त करून अवैध व्यवसायाला आळा घातला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४८,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी जागेचा मालक, व्यवस्थापक आणि कामगारांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई ८ नोव्हेंबर २०२५ रोजी कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान करण्यात आली. तपास पथकातील...








