महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 62

ठाण्यातून 14 वर्षीय मुलगी बेपत्ता! अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल

0

🔹 गौतमी स्कूलमधून 14 वर्षीय मुलगी बेपत्ता 🔹 ठाणे नगर पोलीस स्टेशनकडून नागरिकांना मदतीचे आवाहन 🔹 अपहरणाचा गुन्हा दाखल, तपास सुरू ठाणे : ठाणे पश्चिम येथील गौतमी स्कूलमधून 14 वर्षीय मुलगी पूजा हरसन राम पुरोहित हिला कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संदर्भात ठाणे नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तिचा शोध घेत...

२ रिक्षा आणि १ दुचाकी चोरीप्रकरणी आरोपी जेरबंद; पोलिसांच्या तपास पथकाची शानदार कारवाई!

0

पुणे |भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरीसंदर्भात सुरू असलेल्या तपासात मोठी कामगिरी बजावत, पोलिसांनी २ रिक्षा आणि १ दुचाकी जप्त करत एक वाहन चोर अटक केला आहे. या कारवाईमुळे पुणे शहरात वाहन चोरी करणाऱ्या टोळ्यांवर चांगलाच धसका बसला आहे. पोलीस आयुक्तालयाच्या सूचनेनुसार, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांचे तपास पथक — पो.अं. तुकाराम सुतार, संदीप...

पुण्यातील कोंढवा भागात घरफोडी करणारा भाऊ जेरबंद – तिजोरीतील दागिने व रोख रक्कमसह अटक!

0

पुणे शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या घरफोडीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पुणे पोलिसांकडून वेगवान आणि ठोस पावले उचलली जात आहेत. कोंढवा भागात घडलेल्या एका धक्कादायक घरफोडी प्रकरणात पोलिसांनी मोठी कामगिरी करत सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे, ही चोरी पीडिताच्या दाजीकडून म्हणजेच घरातीलच माणसाकडून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनेचा तपशील कोंढवा येथील साईबाबानगरमधील फ्लॅटमध्ये राहणारे पीडित आपल्या कुटुंबासह...

चार तासांत आरोपीला अटक! वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावणाऱ्या लुटारूला डेक्कन पोलिसांची चोख कारवाई!

0

पुणे:-  पुणे शहरात दिवसाढवळ्या चोरी आणि जबरी लुटीच्या घटना घडत असताना डेक्कन पोलिसांनी अतिशय वेगवान आणि प्रभावी कारवाई करत अवघ्या चार तासांत एका वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी लुटणाऱ्या आरोपीला जेरबंद केले आहे. या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या जलद गती तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रशंसा होत आहे. घटना कशी घडली? डेक्कन पोलीस ठाणे हद्दीतील नदीपात्र वीटभट्टी परिसरात एका वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावून नेण्याचा प्रकार...

पुणे रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरी करणारे दोघे आरोपी पोलीसांच्या ताब्यात

0

पुणे शहरातील लोहमार्ग पोलीस ठाणे आणि आरपीएफ पुणे युनिटच्या संयुक्त कारवाईत दोन आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत, जे रेल्वे प्रवाशांकडून मोबाईल चोरी करत होते. ही कारवाई दि. ०३/०९/२०२५ रोजी करण्यात आली. फिर्यादी रूतुराज दिलीपराव काटकर (वय २६, जगदंबा सोसायटी, वडगाव शेरी) यांनी दि. ३०/०८/२०२५ रोजी दानापुर एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून १५,०००/- रुपये किमतीचा Vivo मोबाईल चोरी झाला असल्याची तक्रार लोहमार्ग पोलीस...

बारामती: 37 लाखांच्या बैल व्यवहारातून गोळीबार; रणजीत निंबाळकर यांचा मृत्यू, काकडे कुटुंबातील दोघांना अटक”

0

पुण्यातील बारामती तालुक्यातील निंबुत येथे 37 लाखांच्या बैल खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या गोळीबारात जखमी रणजीत निंबाळकर यांचा शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. निंबाळकर यांच्या मृत्युमुळे त्यांच्या नऊ महिन्यांच्या मुलीचे पितृछत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बारामती तालुक्यातील निंबुत येथे शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास बैल खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून फलटण येथील रणजित निंबाळकर यांच्या डोक्यात गौरव काकडे याने गोळी झाडली होती....

वाघोलीत सोनसाखळी चोरीचा पर्दाफाश; गुन्हेगार जेरबंद, पोलिसांकडून १ लाखांची सोनसाखळी जप्त

0

पुणे शहरातील वाघोली पोलीस स्टेशनच्या कार्यकुशल तपासातून अट्टल सोनसाखळी चोरट्याला अखेर जेरबंद करण्यात आले. दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी मौजे केसनंद, थेऊर रोडवरील पाटील वस्ती येथे गणेश किराणा स्टोअरमध्ये घडलेल्या सोनसाखळी चोरीप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटनेच्या दिवशी दोन अनोळखी इसम मोटारसायकलवरून किराणा दुकानात आले. त्यातील एकाने दुकानात बिस्किटे आणि चॉकलेट मागण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्याशी संवाद साधला व संधी...

धक्कादायक अपघातात विक्री कर निरीक्षकाचा मृत्यू, थेरूर रोडवरील दुर्घटना.

0

थेरूर रोडवरील कुंजीरवस्ती येथे झालेल्या अपघातात महाराष्ट्र सरकारच्या विक्री कर निरीक्षक अभिजीत सुरेश पवार (वय ३२, राहणार श्रीगोंदा) यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पवार हे थेरूरहून पुण्याकडे कारने प्रवास करत होते. या कारमध्ये एक दहा वर्षांचा मुलगा, दोन महिला आणि दोन पुरुष होते. कुंजीरवस्ती येथे पोहोचल्यावर, थेरूर फाट्याकडून थेरूरकडे जाणाऱ्या डंपरने उच्च गतीने कारला जोरदार धडक दिली. अभिजीत पवार,...

पूजा खेडकरच्या आईवर शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा दाखल, पिस्तुल दाखविण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वडिलांविरुद्धही एफआयआर

0

पूजा खेडकरच्या आई-वडिलांच्या विरुद्ध एका शेतकरीविरोधात दायर केलेला FIR दाखल केला गेला आहे. "पूजा खेडकर यांच्या आई-वडीलांना बदनाम करण्याचा आरोप लागवडाचा आजही कोणत्याही समस्यांची किंवा अंत दिसत नाही. पुण्यातील पाउड पोलीस स्थानिक शेतकर्‍यांच्या तक्रारावर आधारित मानोरम खेडकर आणि दिलीप खेडकर विरुद्ध शुक्रवारी एफआयआर दाखल केली. या अभियांत्रिकीच्या वार्षिकीत संबंधित विवादांचा भाग त्याच्या विलक्षण आवश्यकतांची चर्चा करीत आहे. पुजा आणि तिच्या वाईफाला...

पुणे पोलिसांची अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई! दोन्ही ठिकाणाहून ७.८८ लाख रुपयांचा दोडाचुरा व गांजा जप्त – पाच जणांना अटक

0

पुणे शहरातील गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक २ ने मोठी कारवाई करत तब्बल ₹७,८८,१००/- किंमतीचा अफूच्या बोंडांचा चुरा (दोडाचुरा) व गांजा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणात दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी मिळून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही विशेष कारवाई हडपसर आणि खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून, ही धडक मोहीम वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात...

Copyright ©