महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 14

मुंबई महापालिकेचे माजी महापौर आणि उपबथाचे उपनेते शिवसेनेत; मुंबई महापालिकेवर भगव्या झेंड्याचा बोलबाला!

0

मुंबई – मुंबई महापालिकेचे माजी महापौर आणि उपबथाचे उपनेते यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. यासोबतच, मुलुंड, भांडूप, विक्रोळी, ठाणे, रायगड, जळगाव येथील विविध पक्षांचे पदाधिकारीही शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकवटले आहेत. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे मुंबई महानगरपालिकेतील राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता आहे. महायुतिच्या नेतृत्वाखाली मुंबईचा विकास: महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबईतील स्वच्छतेचे काम प्रभावीपणे सुरू झाले. ब्रिटिश काळानंतर...

निगडीतील विद्यानंद भवन हायस्कूलचा दहावीचा १००% निकाल – विद्यार्थ्यांची घवघवीत यशकथा राज्यभर गाजतेय

0

दहावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, निगडी येथील विद्यानंद भवन हायस्कूलने सलग यंदाही आपली यशस्वी परंपरा कायम राखत १००% निकाल साध्य केला आहे. शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीचे हे मोठे उदाहरण मानले जात आहे. यंदा एकूण १५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ५० जणांनी प्रथम श्रेणी आणि ७ जणांनी द्वितीय श्रेणी मिळवून...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता ५ जूनपासून खात्यात जमा होणार! आदिती तटकरेंकडून महिलांना दिलासा

0

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यावर जमा झालेला नसल्याने अनेक महिलांमध्ये चिंता आणि नाराजीचे वातावरण होते. मात्र, या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती देत महिलांच्या मनातील संभ्रम दूर केला आहे. आदिती तटकरे यांनी ट्विटरवरून माहिती देताना सांगितले की, “मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्याची तांत्रिक प्रक्रिया ४ जूनपासून सुरु करण्यात आली...

कामगारांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही! विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची ठाम भूमिका – राज्यभरातील हजारो श्रमिकांसाठी निर्णायक लढा सुरू

0

कामगारांचे न्यायहक्क अबाधित ठेवण्यासाठी बनसोडे यांचा पुढाकार – अन्याय करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध ठाम भूमिका पिंपरी – झपाट्याने होत असलेल्या औद्योगिक विकासाच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योग कंपन्यांमध्ये कामगारांचे मूलभूत हक्क पायदळी तुडवले जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. पर्मनंट नोकर्या रद्द करून कंत्राटी पद्धतीने कामगारांची पिळवणूक, अपघातांमधील निष्काळजीपणा, वेतनवंचना, न्यायालयीन आदेशांची उघडपणे अवहेलना – अशा घटनांनी श्रमिक वर्गातील असंतोषाला तोंड फुटले आहे. याच...

पुण्यात भोंदू बाबा ‘प्रसाद तामदार’चा खळबळजनक प्रकार उघड – श्रद्धेच्या नावाखाली तांत्रिक फसवणूक!

0

पुणे |  “तुमच्यावर ग्रहदोष आहे, तुमचं नशीब मी उजळवू शकतो,” अशी भुरळ घालून भक्तांची मानसिक, आर्थिक आणि तांत्रिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा प्रसाद तामदार याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बावधन पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करत तामदारने अनेक भक्तांची गुप्त माहिती चोरली आणि त्यांचा मानसिक छळ केला, हे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं...

पुण्यात धक्कादायक अपहरण व खंडणी प्रकरण उघडकीस | वाघोली पोलिसांची शिताफिने कामगिरी

0

पुणे | वाघोली पोलीस स्टेशन – पुणे शहरात खळबळ उडवणाऱ्या एका अपहरण आणि खंडणी प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावत वाघोली पोलिसांनी शिताफिने चार सराईत आरोपींना जेरबंद केले. अपहरण करून १५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत अपहृत व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दिनांक १५ जून २०२५ रोजी, फिर्यादीचे चुलत भाऊ वाघोली पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी कळवले...

पुण्याच्या सेवेसाठी आणखी एक पाऊल! खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या २४x७ जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ आणि कार्य अहवाल प्रकाशन सोहळा भव्यदिव्य आयोजनात

0

पुणे, १२ जुलै २०२५ : पुण्याचे लोकप्रिय आणि कार्यक्षम खासदार तसेच केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या नेतृत्वात पुणे शहराच्या विकासासाठी उभारण्यात आलेले “२४ तास जनसंपर्क कार्यालय” या उपक्रमाचा शुभारंभ सोहळा आणि त्यांच्या खासदारकीच्या पहिल्या वर्षाचा कार्य अहवाल प्रकाशन सोहळा आज शनिवार, १२ जुलै रोजी उत्साहात आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडला. शुभारंभ...

लोणीकाळभोर टोलनाक्यावर दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू; वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे अपघात

0

पुणे | प्रतिनिधी – लोणीकाळभोर परिसरात कवडीपाट टोलनाक्याजवळ शनिवारी सकाळी एक दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात निरनिमगाव, इंदापूर येथील समाधान संभाजी भिटे (वय ३१) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताची नोंद लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २०६/२०२५ प्रमाणे करण्यात आली आहे. अपघाताची सविस्तर माहिती दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी कवडीपाट टोलनाक्याजवळील एस.आर. टायर दुकानासमोर, मयत समाधान भिटे व त्यांचा मित्र...

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई: एमसीओसीए प्रकरणातील फरार आरोपीसह दोन आरोपींना अटक.

0

पुणे: पुण्यातील सिंहगड रोड पोलिसांनी एका यशस्वी मोहिमेद्वारे दोन आरोपींना अटक केली आहे. यात एमसीओसीए अंतर्गत फरार असलेला आरोपी रवि माधवराव जाधव (वय २६) आणि त्याचा साथीदार अश्विन उर्फ बर्क्या बालकृष्ण लोणारे (वय २०) यांचा समावेश आहे. रवि जाधव हत्या प्रयत्न प्रकरणात फरार होता, तसेच त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (MCOCA) देखील गुन्हा दाखल होता. रवि जाधव दोन महिन्यांपासून...

“महाराष्ट्रातील उत्कृष्ट तपास कार्याचा गौरव! ११ पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान”

0

पुणे (दि. १३ जून २०२५) – महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलातील उत्कृष्ट कार्यक्षमतेचा सन्मान करत ११ पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान करण्यात आले. पोलीस संशोधन केंद्र, पुणे येथे आयोजित या भव्य समारंभात महाराष्ट्र राज्याच्या मा. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या पुरस्कारासाठी निवडले गेलेले पोलीस अधिकारी यांनी खून, दरोडा, जबरी...

Copyright ©