मुंबई – मुंबई महापालिकेचे माजी महापौर आणि उपबथाचे उपनेते यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. यासोबतच, मुलुंड, भांडूप, विक्रोळी, ठाणे, रायगड, जळगाव येथील विविध पक्षांचे पदाधिकारीही शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकवटले आहेत. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे मुंबई महानगरपालिकेतील राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता आहे.
महायुतिच्या नेतृत्वाखाली मुंबईचा विकास:
-
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबईतील स्वच्छतेचे काम प्रभावीपणे सुरू झाले.
-
ब्रिटिश काळानंतर प्रथमच महायुती सरकारने मुंबईचे रस्ते धुतले असल्याचा ऐतिहासिक उल्लेख यावेळी करण्यात आला.
-
काही विरोधकांनी यावर टीका केली असली तरी, प्रत्यक्षात मुंबईच्या स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले असल्याचे दाखवून देण्यात आले.
भव्य पक्षप्रवेश:
-
उपबथाच्या सुमारे ४५ ते ५० नगरसेवकांनी शिवसेनेत पुनर्प्रवेश केला आहे.
-
विविध पक्षांचे जवळपास ७० विद्यमान नगरसेवकही शिवसेनेत सामील झाले आहेत.
-
धारावी, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप भागातील महिला विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि ५०० हून अधिक कार्यकर्ते शिवसेनेत सामील झाले.
-
मुरबाड येथील उपबथा तालुकाध्यक्ष, उपतालुकाध्यक्ष, विभागप्रमुख, विधानसभा संयोजक, युवासेना पदाधिकारी तसेच जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे पदाधिकारी, मंगलवेढा तालुक्यातील १८ सरपंच देखील शिवसेनेत दाखल झाले.
शिवसेनेत विविध क्षेत्रातील नेतृत्वाचा सहभाग:
-
हिंदुस्तान फिल्म वर्कर्स सेना फेडरेशनचे पदाधिकारी,
-
पिंटो यांच्यासह अनेक ख्रिश्चन बंधू भगव्या झेंड्याखाली आले आहेत.
-
यामुळे विविध समाजघटक आणि क्षेत्रांतील व्यक्तींनी एकत्र येत शिवसेनेला नवसंजीवनी दिली आहे.
उपस्थित मान्यवर:
या भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमाला
-
रोजगार हमी योजना मंत्री भारत गोगावले
-
खासदार संदीपान भुमरे
-
आमदार अशोक पाटील
-
शिवसेना सचिव राम रेपाळे
-
माजी नगरसेविका सुवर्णा करंजे
-
शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी
-
शिवसेना सचिव संजय म्हसळकर
-
प्रवक्ते राजू वाघमारे
-
तसेच असंख्य प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





