महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 117

पुणे शहरातील तत्कालीन तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल!

0

पुणे: आर्थिक गुन्हे शाखेने पुणे शहरातील तत्कालीन तहसीलदार श्री. सूर्यकांत येवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर मोठी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात भूमी अधिनियमाचे उल्लंघन, बेकायदेशीर जमीन व्यवहार आणि शासकीय आदेशांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खडक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गु.र.नं. ५५२/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम २०१, ३६५(२), ३८५(३), ३८६(३), ३८८(४), ३३६(३), ३३८(४), ३८०(२), ६१(२), ३(४) या...

पुण्यातील थंडी कायम राहणार; नववर्षात आणखी गारठा वाढण्याचा इशारा – हवामान विभाग

0

पुणे | प्रतिनिधी — गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि राज्यात जाणवणारी थंडी पुढील काही दिवस कायम राहणार असून, नववर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात गारठा आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. त्यामुळे यंदाचा हिवाळा अधिक काळ टिकणार असून, पुणेकरांना सुखद पण बोचरी थंडी अनुभवायला मिळणार आहे. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे, स्वच्छ आकाश आणि कोरडे हवामान यामुळे...

धानोरीत कोयता गँगचा थरकाप; सोसायटीच्या आवारातच घरावर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

0

पुण्यात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पूर्वी फक्त रस्त्यांवर आणि वर्दळीच्या ठिकाणी अरेरावी करणारी ही टोळी, आता थेट सर्वसामान्यांच्या घराच्या दारात पोहोचली आहे. धानोरी परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये घडलेली घटना नागरिकांच्या अंगावर शहारा आणणारी आहे. या सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही धक्कादायक दृश्ये कैद झाली असून, त्यामध्ये कोयत्याने हातात घेतलेल्या गुंडांची टोळी थेट सोसायटीमध्ये शिरून एकाच घरावर लक्ष्य...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीत अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न

0

पिंपरी, शगुन चौक: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री सामाजिक संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला अभिवादन कार्यक्रम यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे शिवसेना मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन होणे. कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार गौतम...

वाघेश्वर महाराजांच्या कृपेने महेश लांडगे यांचा प्रचार जोशात सुरू, ‘भोसरी माझी आई, चारहोळी मावशी’ म्हणत विजयाची नांदी

0

महेश लांडगे यांनी वाघेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने त्यांच्या राजकीय प्रचार मोहिमेला जोरदार सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या भाषणात अत्यंत भावनिक शब्दांत "भोसरी माझी आई आणि चारहोळी माझी मावशी" असे उद्गार काढले, ज्यातून त्यांचा या दोन गावांबद्दलचा सखोल स्नेह आणि आदर दिसून आला. भोसरीने त्यांना नेहमीच मायेची आणि प्रेमाची ऊब दिली, तर चारहोळीने त्यांच्या राजकीय आयुष्यात महत्त्वाचा आधार दिला आहे. लांडगे...

पुणे: कामाच्या बहाण्याने डांबून ठेवून महिलेला लैंगिक अत्याचार; आरोपीस अटक.

0

तळेगाव दाभाडे येथे राहणार्‍या मध्य प्रदेशातील एका महिलेला हॉटेलमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून बारामती तालुक्यातील पणदरे गावात डांबून ठेवून तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आरोपी पोपट धनसिंग खामगळ (वय २५, रा. खामगळवाडी, बारामती) याला अटक केली आहे. प्रकरणाचे तपशील: पिडित महिला मध्य प्रदेशातील असून तिचा पती तळेगाव दाभाडे येथील कंपनीत काम करत...

दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना समर्थ पोलिसांनी अटक; ८.११ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पुणे शहरात दिवसा घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना समर्थ पोलीस स्टेशनने मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मंगळवार पेठ परिसरात दिवसा घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून चोरीचा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी मंगळवार पेठ येथील एका नागरिकाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश...

तिकीट परीक्षकाच्या सतर्कतेमुळे बनावट आरक्षित तिकीट पाठवणारा फसवणूक करणारा पुणे स्थानकावर जेरबंद.

0

पुणे: झेलम एक्सप्रेसमध्ये सतर्क तिकीट तपासनीसाने (TTE) रेल्वे सुरक्षा दलाला (RPF) महत्त्वाची माहिती पुरवून बनावट आरक्षित तिकीट पाठवणाऱ्या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला जेरबंद करण्यात मदत केली. हा प्रकार २३ डिसेंबर रोजी पुणे रेल्वे स्थानकावर उघडकीस आला. फसवणूक करणाऱ्याची ओळख प्रविणकुमार मधुलार लोंढे अशी पटली असून, तो प्रवाशांना बनावट आरक्षित तिकिटांच्या मेसेजेस पाठवून त्यांच्याकडून पैसे उकळत होता. त्याने झेलम एक्सप्रेससारख्या गाड्यांमध्ये स्वस्त...

एकाच तिकीटावर मुंबईकरांना सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांचा लाभ!

0

मुंबईच्या वाहतुकीसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला गेला असून, एकाच तिकीटावर मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतूकसेवा उपलब्ध होणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत "इंटीग्रेशन ऑफ तिकिटिंग सर्व्हिसेस" या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "आजचा दिवस मुंबईच्या दळणवळणाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. एका...

पिंपरी चिंचवडच्या वाहतूक समस्येवर दीर्घकालीन नियोजन आराखडा तयार करा – मंत्री चंद्रकांत पाटील…

0

पिंपरी, ७ नोव्हेंबर २०२५ :  पिंपरी चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या व वाढती वाहनसंख्या विचारात घेऊन भविष्यात शहरामध्ये वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी आगामी १५ वर्षांचा विचार करून महापालिकेने नियोजन आराखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.        पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांची आढावा बैठक आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील माजी महापौर मधूकर पवळे...

Copyright ©