Home Breaking News पुणे शहरातील तत्कालीन तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल!

पुणे शहरातील तत्कालीन तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल!

89
0
पुणे: आर्थिक गुन्हे शाखेने पुणे शहरातील तत्कालीन तहसीलदार श्री. सूर्यकांत येवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर मोठी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात भूमी अधिनियमाचे उल्लंघन, बेकायदेशीर जमीन व्यवहार आणि शासकीय आदेशांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
खडक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गु.र.नं. ५५२/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम २०१, ३६५(२), ३८५(३), ३८६(३), ३८८(४), ३३६(३), ३३८(४), ३८०(२), ६१(२), ३(४) या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार प्रविणा शशिकांत बोर्डे, नायब तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर तहसील कार्यालयाच्या कार्यकाळात मौजे भोजपुरी, ता. पुणे शहर येथील स.नं. ६२ व मौजे मुळांदा स.नं. ८८ या क्षेत्रांतील जमिनीबाबत नियमांचे उल्लंघन करून संशयास्पद व्यवहार करण्यात आला. अर्जदार हेमंत गावडे, संचालक राजेंद्र रामचंद्र विद्वंस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डिसें प्रॉपर्टी तर्फे या जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी मुंबई कुर्ला येथील अधिकार्‍यांशी संगनमत करून बेकायदेशीररीत्या आदेश मिळवले असल्याचे दिसून आले.
तसेच, मौजे मुळांदा येथील १७ हेक्टर ५१ आर जमीन विकत घेण्यासाठी दिपविजय अमरसिंह पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमत करून सरकारी जमीन विक्रीसाठी अर्ज दाखल केला होता. त्या संदर्भातही तपासात अनेक गैरप्रकार उघड झाले आहेत.
या प्रकरणातील प्रमुख आरोपींमध्ये तत्कालीन तहसीलदार सूर्यकांत येवले, संचालक दिपविजय अमरसिंह पाटील, शीतल किसनचंद तेजवाणी आणि इतर सहकारी यांचा समावेश असून, या सर्वांविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.
या गुन्ह्यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी सरकारी जमिनींचे विक्री आदेश देताना नियमांची पायमल्ली करून खाजगी व्यक्तींना फायदा करून दिल्याचा आरोप आहे.
🔹 मुख्य मुद्दे:
  • तत्कालीन तहसीलदारावर गुन्हा दाखल
  • बेकायदेशीर जमीन व्यवहारांचा आरोप
  • आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू
  • भूमी अधिनियम १८४८ चे उल्लंघन