Breaking News
खराडी उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर धाड – २६ आरोपींवर गुन्हे दाखल, लाखोंचा मुद्देमाल जप्त
पुणे – पुणे शहरातील खराडी परिसरातील मावल सिरीन या उच्चभ्रू सोसायटीतील एका बंद फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत २६ जणांना अटक केली आहे. या धाडीत लाखो रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी खारडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या...
बीएसएनएलची नवी झेप! ४ नवीन कोचसह जलद, सुरक्षित आणि ग्राहकाभिमुख एक्सप्रेस ट्रेन सेवेला सुरुवात
भारतीय संचार क्षेत्रातील महत्त्वाचा खेळाडू असलेली बीएसएनएल आता एक नवीन प्रवास सुरू करत आहे. ४ अत्याधुनिक आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त कोचसह बीएसएनएलने एक्सप्रेस ट्रेन सेवेत आपले पाऊल टाकले आहे. ही नवी सेवा प्रवाशांना जलद, सुरक्षित, कार्यक्षम आणि अधिक सोयीस्कर प्रवासाचा अनुभव देणार आहे. कोचेसमध्ये अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली, आरामदायी आसनव्यवस्था, वाय-फाय कनेक्टिव्हिटी, डिजिटल माहिती फलक आणि स्वच्छतेची विशेष काळजी यांसारख्या सुविधा...
नवी मुंबई: तळोज्यात भरधाव कारने पादचाऱ्यांना चिरडले; एका तरुणाचा मृत्यू, महिला गंभीर जखमी.
नवी मुंबईतील तळोजा भागात एका भरधाव कारने रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, ४४ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. मृत व्यक्तीचे नाव लालू दास (वय २७) असून, जखमी महिलेचे नाव प्रमिला दाश (वय ४४) असे...
“अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या संकटाचा मंत्रिमंडळात सखोल आढावा; मुख्यमंत्र्यांचे तातडीचे पंचनामे आणि मदतीचे निर्देश”
मुंबई — राज्यभरात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला. शेती, घरे, रस्ते आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आणि नुकसानग्रस्तांना त्वरीत भरपाई देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. अतिवृष्टीने राज्याला झोडपले राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतात उभ्या पिकांचे नुकसान,...
वॉर्ड क्र. २०१ मध्ये शिवसेनेचा प्रचार शिगेला; रेखा मयुर कांबळे यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
आज वॉर्ड क्र. २०१ मधील शिवसेना उमेदवार रेखा मयुर कांबळे यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आणि मा. आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमामुळे संपूर्ण वॉर्डात राजकीय वातावरण तापले असून शिवसैनिकांमध्ये नवे चैतन्य संचारले आहे. उद्घाटनप्रसंगी परिसरातील शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी...
महापालिकेच्या वतीने २१ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन.
पिंपरी - महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सांगवी येथील पी. डब्ल्यू. डी. मैदानावर २१ ते २४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेमध्ये महाराष्ट्राची संस्कृती व शहराच्या परंपरा यांची सांगड घालून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. ...
भारतीय कन्यांचा ऐतिहासिक विजय! ICC U19 महिला T20 विश्वचषक 2025 जिंकत ‘नारीशक्ती’ने रचला नवा इतिहास
नवी दिल्ली: भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात आज सुवर्णाक्षरांनी कोरला जाणारा दिवस आहे! ICC U19 महिला T20 विश्वचषक 2025 स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात शानदार विजय मिळवत जगज्जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. हा विजय केवळ एक स्पर्धा जिंकण्यापुरता मर्यादित नसून, भारतीय महिला क्रिकेटच्या भविष्यासाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील भारतीय संघाचे विशेष कौतुक करत अभिनंदन केले आहे. संघाच्या...
वाहतूक पोलीस व जहागीर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ट्रॅफिक मिटिगेशन’ इंटर्नशिप प्रोग्रामचा शुभारंभ
पुणे – पुणे शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाहतूक व्यवस्थापनाच्या क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वाहतूक पोलीस, जहागीर हॉस्पिटल, पीपीसीआर आणि टीएमसीएफ संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘ट्रॅफिक मिटिगेशन’ इंटर्नशिप प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आणि लेक्सिकॉन कॉलेजच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा शुक्रवार, दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५.२० वा. पोलीस आयुक्त कार्यालयातील कॉप एक्सलन्स हॉलमध्ये...
निगडीमध्ये खड्ड्यांमुळे रिक्षातून पडून ५० वर्षीय महिलेचा मृत्यू, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल.
पुणे: १६ ऑगस्ट रोजी हडपसर येथील ५० वर्षीय महिला निगडी येथील थेर्मॅक्स चौकाजवळ रिक्षातून पडल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. महिलेच्या पतीने निगडी पोलिस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी भा.न्या.सं. कलम १०६(२) आणि २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. निगडी पोलिस ठाण्याचे...
पिंचीच्या मंगळागौर स्नेहमेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परंपरा, एकजूट आणि स्त्रीशक्तीचा भव्य उत्सव!
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील महिलांसाठी एक खास आणि संस्मरणीय ठरलेला ‘पिंची’ समूहाचा मंगळागौर व नागपंचमी स्नेहमेळावा पारंपरिक उत्साहात आणि महिलांच्या उस्फूर्त सहभागात नुकताच पार पडला. समाजमाध्यमांपासून परिसरातील मैदानांपर्यंत या कार्यक्रमाची रंगत सर्वत्र पाहायला मिळाली. महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक जतन आणि आपुलकीने भरलेल्या या सोहळ्यात हजारो महिलांनी सहभाग घेत महिलांचा जल्लोष अनुभवला. या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती मा. नीलम गोऱ्हे आणि...
















