Breaking News
T20 World Cup 2026: टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व, गिल बाहेर, अक्षर पटेल उपकर्णधार
नवी दिल्ली | आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. आज (२० डिसेंबर) झालेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयने पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. या पत्रकार परिषदेला बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया,...
पुण्यात सिमेंट बल्करला अचानक भीषण आग – थोडक्यात बचाव
पुण्यात सिमेंट बल्करला अचानक लागलेल्या भीषण आगीने खळबळ उडवली. धूर आणि जळत्या वाहनामुळे रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला. सुदैवाने चालकाने तातडीने प्रसंगावधान दाखवत वाहनातून बाहेर उडी घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. घटना पुण्याच्या वडगाव ब्रिज परिसरात घडली. सिमेंट बल्कर भरधाव वेगाने जात असताना इंजिनमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले आणि वाहनाने पेट घेतला. काही क्षणांतच आग पसरली आणि गाडीने धूर सोडायला सुरुवात केली. चालकाने वाहनातील...
प्रशांत किशोरांचे वक्तव्य : “अर्ध्याहून अधिक हिंदू भाजपसोबत नाहीत; गांधी-आंबेडकर-लोहियांच्या अनुयायी हिंदूंनी मुस्लिमांसोबत युती करावी”
नवी दिल्ली : देशातील प्रख्यात निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज वक्तव्य करत सध्याच्या राजकीय समीकरणांना हादरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, “देशातील अर्ध्याहून अधिक हिंदू वैचारिकदृष्ट्या भाजपसोबत नाहीत. गांधी, आंबेडकर आणि लोहिया यांचे विचार मानणाऱ्या हिंदूंनी जर मुस्लिम समाजासोबत हातमिळवणी केली, तर भाजपला पराभूत करणे अशक्य नाही.” प्रशांत किशोर यांनी पुढे स्पष्ट केले की, हिंदू समाज एकसंधपणे...
अवैध गोमांस विक्री केंद्रावर छापा — मोठ्या प्रमाणावर गोमांस हस्तगत, सहा जणांची संघटित मोहीम
शिरूर तालुक्यात अवैध गोमांस विक्रीबाबत मिळालेल्या माहितीवरून बजरंग दलाच्या गोरक्षकांनी आणि शिरूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, हे जाळे मोठ्या प्रमाणावर कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. FIR तपशील (NCRB फॉर्मनुसार): जिल्हा: पुणे ग्रामीण पोलीस ठाणे: शिरूर FIR क्रमांक: 0872/2025 दिनांक व वेळ: 07/12/2025, रात्री 21:11 गुन्हा...
25 हजार सरपंचासोबत मुख्यमंत्र्यांनी साधला ऑनलाईन संवाद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : सरपंच संवाद हा 'क्यूसीआय'ने तयार केलेला प्लॅटफॉर्म, देशभरातील सरपंचांचा हक्काचा प्लॅटफॉर्म आहे. आज त्याच्यावर पंचवीस हजार सरपंचांसोबत एकावेळी आपण संवाद साधत आहोत ही अभिनंदनीय बाब आहे. या संवादातून ग्रामविकासात आलेली प्रगल्भता लक्षात येते. अशा सशक्त संवादातून निश्चितपणे आपण समृद्ध राज्य आणि समृद्ध देश तयार करू ,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी आयोजित क्वालिटी कौन्सिल...
पुण्यातील खड्ड्यांचा बळी! औंधमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू; नागरिकांमध्ये संतापाची लाट
पुणे: शहरातील रस्त्यांवरील खड्डे आता प्राणघातक ठरत असून, औंध परिसरात खड्ड्यामुळे घडलेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना ३० जुलै रोजी औंधमधील राहुल हॉटेलसमोर घडली असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव जगन्नाथ काशिनाथ काळे (वय ६१ वर्षे) असून, ते नाबार्डमध्ये कार्यरत होते व अलीकडेच सेवानिवृत्त झाले होते. काळे हे स्कूटरवरून जात...
पुण्यात बनावट आर्मी ऑफिसर पकडला! – अभिषेक भोसलेची लष्करी वेशात फसवणूक; लष्कर व पोलिसांची संयुक्त कारवाई
पुणे : लष्करी अधिकाऱ्याची बनवाबनवी करत पुण्यातील कॅन्टोन्मेंट परिसरात सळसळत फिरणाऱ्या एका तरुणाला लष्कर व पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. सदर तरुण लष्करी गणवेशात वावरत असतानाच तांत्रिक माहितीच्या आधारे त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे - अभिषेक शिवाजी भोसले अटकेची कारवाई : ही कारवाई पुण्याच्या बिशप स्कूलजवळ दुपारी २ वाजता करण्यात आली. साऊथर्न...
व्हॅट, परवाना शुल्क आणि एक्साईज ड्युटीतील भरमसाठ वाढीविरोधात नवी मुंबईतील हॉटेल व्यवसाय ठप्प!
नवी मुंबई – "कोरोना महामारीच्या संकटातून सावरत असताना आता शासनाच्या अन्यायकारक करवाढीने आम्हाला उध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे," असा संतप्त स्वर नवी मुंबईतील हॉटेल व्यवसायिकांमधून उमटत आहे. दारूवरील व्हॅट कर, परवाना शुल्क आणि एक्साईज ड्युटी यामध्ये भरमसाठ वाढ करण्यात आल्यामुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या निषेधार्थ सोमवार, 14 जुलै 2025 रोजी नवी मुंबईतील हॉटेल्स, परमिट रूम्स आणि बार्स...
पिंपरी चिंचवड महापालिकेत खात्यांचे फेरबदल : अधिकाऱ्यांना नवे कार्यभार, प्रशासकीय गतीस नवे बळ
पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल करण्यात आला असून, काही अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी देण्यात आली आहे. हा निर्णय महापालिका आयुक्त आणि प्रशासक यांच्या आदेशानुसार घेण्यात आला असून, प्रशासनाच्या गती आणि समन्वयाला चालना देण्याचा यामागे हेतू आहे. महापालिकेतील सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, जे निवडणूक व जनगणना तसेच कर आकारणी व संकलन विभागाचा...
बनावट सोन्याच्या बिस्किटांचा आमिष दाखवून फसवणूक करणारा अट्टल आरोपी पुणे गुन्हे शाखेच्या जाळ्यात
पुणे शहरात बनावट सोन्याच्या बिस्किटांचा वापर करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक क्रमांक २ ने अटक केली आहे. आरोपीकडून मोठ्या प्रमाणात बनावट सोन्याची बिस्कीटे, बेनटेक्स चेन तसेच लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत...










