पुणे — शहरातील विमानतळ पोलीस स्टेशनने मोठी कारवाई करत घरफोडी आणि दुकानफोडी करणाऱ्या सराईत चोरट्या टोळीचा भंडाफोड केला आहे. या टोळीने दिवाळीच्या काळात विमानतळ परिसरातील रिकाम्या घरांमध्ये आणि दुकानदारांच्या बंद शटरमध्ये हात घालून लाखो रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता. पोलिसांनी जलद सूचना, तांत्रिक तपास आणि जागरूक पथकाच्या मदतीने या टोळीला अखेर गजाआड केले.
🔹 पोलिसांच्या सखोल तपासातून उलगडले घरफोडीचे जाळे
दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात फिर्यादींच्या घरातील गेट आणि दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी
एकूण ₹१०,५१,०९३/- किंमतीचे सोन्याचे, चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती.
घटनास्थळी पोहोचून पोलीस अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालू काहे, हरीप्रसाद पुंडे यांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, बातमीदारांच्या माहितीच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्यात आली.
🔹 सराईत आरोपी जेरबंद — विधी संघर्षित बालक ताब्यात
पोलिसांनी खालील आरोपींना अटक केली :
1️⃣ शिवम दत्ता अवचर (वय १९), रा. कामटे कॉलनी, न-हे
2️⃣ नवनाथ उर्फ लखन बाळु मोहिते (वय २२), रा. मोर्कंडेय नगर, हडपसर
3️⃣ एक विधीसंघर्षित बालक ताब्यात
या आरोपींकडून
👉 १० लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने
👉 गुन्ह्यात वापरलेली दुचाकी
जप्त करण्यात आली.
🔹 दिवाळीत ७ घरफोड्यांची कबुली — २ लाखांचा अतिरिक्त माल जप्त
अटक केलेले दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीदरम्यान त्यांनी दिवाळीच्या सुट्यांचा फायदा घेत विमानतळ हद्दीत ७ घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
त्या गुन्ह्यांमधील आणखी
👉 ₹२,०६,०००/- किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख
जप्त करण्यात आले.
🔹 संपूर्ण मार्गदर्शनाखाली पोलिसांची धाडसी कारवाई
ही कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली :
-
मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व विभाग — श्री. मनोज पाटील
-
पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४ — श्री. सोमय मुंडे
-
सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग — सौ. प्रांजली सोनवणे
-
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ — श्री. गोविंद जाधव
-
पोलीस निरीक्षक (गुन्हे) — श्री. शरद शेळके





