Breaking News
सहा महिने फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या; वानवडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई
पुणे | प्रतिनिधी :- पुणे शहरातील गंभीर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वानवडी पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा महिन्यांपासून फरार असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यातील पाहिजे आरोपी गणेश दीपक आष्टुळ याला अत्यंत शिताफीने अटक केली आहे. स्वतःचे अस्तित्व लपवून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या आरोपीला अखेर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. घटनेची पार्श्वभूमी दि. ४ जुलै २०२५ रोजी रात्री ८.१५ वाजता, हडपसर येथील शिंदे...
वारजे पुलावर एलपीजी टँकर उलटला; मोठा अनर्थ टळला, वाहतुकीत अडथळा.
वारजे पुलाजवळ एलपीजी टँकरचा अपघात; प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा धोका टळला आज सकाळी ७:३० वाजता वारजे पुलावर मुंबई-पुणे महामार्गावर कटराजकडे जाणाऱ्या लेनवर एलपीजी गॅसने भरलेला टँकर उलटला. अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. अपघातस्थळी तात्काळ मदतकार्य सुरू अग्निशमन दलाचे जवान आणि दोन क्रेनच्या सहाय्याने मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Sr PI) आणि...
महापालिका निवडणूक शांततापूर्ण व पारदर्शक पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; पोलिस व महापालिका यंत्रणांमध्ये समन्वयाचे निर्देश
पिंपरी : आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक शांततापूर्ण, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे स्पष्ट निर्देश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले. तर निवडणूक प्रक्रिया ही केवळ प्रशासकीय कामकाज नसून नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास जपण्याची मोठी जबाबदारी असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यावेळी अधोरेखित केले. पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी...
काँग्रेस भवनाबाहेर भाजप–काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री; पुणे पोलिसांकडून क्रॉस FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू
पुण्यातील काँग्रेस भवनाबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीनंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. या घटनेनंतर पुणे शहर पोलीस यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांविरोधात क्रॉस FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. आंदोलनानंतर तणाव वाढला ही घटना राज्य काँग्रेस अध्यक्षांनी केलेल्या राजकीय वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर घडली. आंदोलन संपल्यानंतर काही कार्यकर्ते काँग्रेस भवनाजवळ...
पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार ह्यांनी विद्यापीठासाठी नव्या पद्धतीच्या कार्यप्रणाली राबवणार असे विधान करून आशावासित केले ❗❗
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शनिवारी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना ह्यांच्यासोबत समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रम साठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त रंजन शर्मा, प्र कुलगुरू डॉ पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ विजय खरे, माजी पोलीस अधिकारी जयंत उम्राणीकर, विद्यापीठाचे सुरक्षा संचालक सुरेश भोसले, आदी उपस्थित होते. लोकशाही...
युद्धकलेत आघाडीवर राहणे ही काळाची गरज” – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन.
पुणे :लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आधुनिक युद्धनीती आणि लष्करी तयारीसाठी सतत पुढे राहण्याच्या गरजेवर भर दिला आहे. युद्धकला केवळ आवश्यकता नसून ती एक उत्कृष्ट संगीतमय समन्वयाने युक्त कला आहे, असे प्रतिपादन करत त्यांनी लष्करी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना प्रेरित केले. डिफेन्स सर्व्हिसेस टेक्निकल स्टाफ कोर्सला (DSTSC) संबोधन: पुण्यातील डिफेन्स सर्व्हिसेस टेक्निकल स्टाफ कोर्स (DSTSC) येथे प्रशिक्षण घेणाऱ्या युवक लष्करी अधिकाऱ्यांना संबोधित करताना...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024: अवैध दारूविरोधातील मोहिमेत ₹5 कोटींचा मुद्देमाल जप्त; पुण्यात 1979 जणांना अटक.
पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024 च्या पार्श्वभूमीवर, राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे जिल्ह्यात अवैध दारूविरोधात मोठी कारवाई केली आहे. 1 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत ₹5.5 कोटींची अवैध दारू आणि वाहने जप्त करण्यात आली आहेत. मुख्य मुद्दे: कारवाईची सुरुवात: राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी आणि पुणे जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या...
“नवीन भारताचा मंत्र – प्रत्येक घर स्वदेशी!” आत्मनिर्भरतेच्या दिशेने देशाची वाटचाल
नवीन भारताचा मंत्र आज प्रत्येकाच्या ओठांवर आहे – “प्रत्येक घर स्वदेशी आहे, प्रत्येक घर स्वदेशी आहे!” या घोषणेद्वारे देशभरात स्वदेशी उत्पादनांच्या वापराला चालना मिळत असून आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार होत आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महात्मा गांधींचा ‘स्वदेशी’ हा विचार आज पुन्हा जागृत होत आहे. आयात केलेल्या वस्तूंवर अवलंबून न राहता भारतीयांनी आपल्या हातांनी तयार केलेल्या वस्तूंचा स्वीकार करावा, हा संदेश या...
नवी मुंबईत तयार घरांचा सुवर्णसंधी! आकर्षक सुविधा, तात्काळ ताबा आणि मर्यादित युनिट्स – घरखरेदीदारांसाठी मोठी संधी
नवी मुंबईसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरात ‘रेडी-टू-मूव्ह’ फ्लॅट्स खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आधुनिक सुविधा, उत्कृष्ट लोकेशन आणि तात्काळ ताबा मिळणारे हे फ्लॅट्स सध्या घरखरेदीदारांमध्ये मोठ्या उत्सुकतेचा विषय ठरत आहेत. रिअल इस्टेट मार्केटमध्ये वाढलेल्या मागणीमुळे आणि भाड्यांनी वाढत्या दरांमुळे अनेक कुटुंबे तयार फ्लॅट्स शोधू लागली असून, नवी मुंबई त्यासाठी सर्वात पसंतीचे ठिकाण ठरत आहे. नवी मुंबईत घर खरेदी...
शिरोळ तालुक्यात जिओला मोठा धक्का; अवघ्या १८ तासांत ६,५२९ ग्राहकांनी निवडला एअरटेलचा मार्ग!
कोल्हापूर – शिरोळ तालुक्यातील टेलिकॉम क्षेत्रात आज एक मोठी घडामोड समोर आली आहे. गेल्या केवळ १८ तासांत तब्बल ६,५२९ जिओ ग्राहकांनी आपला सिमकार्ड नंबर एअरटेलमध्ये पोर्ट केला आहे. ही संख्या पाहता, जिओसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक पातळीवर याबाबत चर्चेला उधाण आले असून, ग्राहकांचा कल आता एअरटेलकडे झुकताना दिसतोय. नेटवर्क समस्यांपासून ते ग्राहक सेवा त्रुटीपर्यंत अनेक तक्रारी जिओच्या...













