Breaking News
२० वर्षांनंतर ऐतिहासिक एकत्र येणं! ‘व्हिक्टरी रॅली’मध्ये उद्धव-राज ठाकरे एकाच व्यासपीठावर, मराठीच्या मुद्यावर ठोस भूमिका
महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. तब्बल २० वर्षांनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर वरळीतील एनएससीआय डोम येथे एकत्र येणार आहेत. ही 'व्हिक्टरी रॅली' मराठी भाषेच्या सन्मानासाठी लढलेल्या संघर्षाचा आणि त्यात मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करणारी आहे. मागील भेट आणि दूरावलेली वाट:याआधी दोघे बंधू...
“संभाजीनगर रस्त्यावर पांढरी पुलाच्या घाटात आज सकाळी ट्रक उलटल्यामुळे भीषण अपघात झाला आहे.”
संभाजीनगर रस्त्यावरील पांढरी पुलाच्या घाटात ट्रक उलटला, अपघात झाल्याने १ ठार तर एकजण जखमी.व्हिडिओ. (Ghodegaon pandri bridge sambhaji nagar Highway) संभाजीनगर रस्त्यावर पांढरी पुलाच्या घाटात घडलेल्या या भीषण अपघाताने एकजण आपला जीव गमावला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे ट्रकचालकांनी अधिक सतर्कतेने वाहन चालविण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
ज्या भागात लहानाचा मोठा झाला, आणि ज्या ठिकाणी शरद मोहोळ चा खुनाचा कट रचित दहशत करून वर्चस्व गजविण्याचं ठिकाणीच पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड विठ्ठल शेलार ची धिंड काढली…….
विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील मुठा गावापासून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या उरवडे या गावचा मुळचा रहिवासी आहे. विठ्ठल शेलार याच्याविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्हे होते. त्याच्यावर मोक्का कारवाई केली होती. त्यातून जामीन मिळाल्यावर २०१७ मध्ये त्याने तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट व भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय भेगडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याला मुळशी, भोर, वेल्हा या...
मावळमध्ये इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून भीषण दुर्घटना! ४ पर्यटकांचा मृत्यू, ५१ जण जखमी – आमदार सुनील शेलके घटनास्थळी धावले
मावळ तालुक्यातील कुंडमळा (इंदुरी) येथील ३० वर्ष जुना लोखंडी पूल रविवारी दुपारी अचानक कोसळल्याने मावळ हादरले. इंद्रायणी नदीवर उभा असलेला हा पूल कोसळल्याने पुलावर उपस्थित असलेल्या १०० ते १२५ पर्यटकांमध्ये अफरातफरी माजली. या दुर्घटनेत चार पर्यटकांचा मृत्यू झाला असून ५१ जण गंभीर जखमी झाले आहेत. जुना पूल, प्रशासनाकडून दुर्लक्ष? हा पूल मुख्यतः दोन गावांना जोडणारा होता, मात्र गेल्या काही वर्षांत...
मुंबईत येणार जगातील सर्वात मोठा GCC (जीसीसी) प्रोजेक्ट; ४५ हजार रोजगार निर्माण होणार मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई - महाराष्ट्राला GCC (जीसीसी) हब बनवण्याच्या दिशेने हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असून ब्रुकफील्ड कंपनी मुंबईत सुमारे 20 लाख चौरस फूट क्षेत्रावर आशियातील सर्वात मोठे Global Capability Center (GCC) अर्थात जागतिक क्षमता केंद्र उभारणार आहे. या प्रकल्पातून 15,000 थेट आणि 30,000 अप्रत्यक्ष असे एकूण 45,000 रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जिओ कन्व्हेशन सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, सीईओ, ANSR , विक्रम आहुजा, ब्रुकफिल्डचे अंकुर गुप्ता यांच्यासोबत बैठकीचे...
ऑनलाइन वेश्याव्यवसाय करणाऱ्या राजस्थान मधील अभिनेत्रीसह दोन परदेशी तरुणी वर पुणे शहर सामाजिक सुरक्षा पोलिसांची बेधक कारवाई
पुणे शहरातील विमानगर येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत राजस्थानी अभिनेत्रीसह उझबेकिस्तानमधील दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी दलाल इरफान उर्फ राहुल मदन उर्फ मदन सन्यासी व रोहित यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानगर भागातील एका हॉटेलमध्ये...
नवी दिल्लीतील गोंधळ! सेल्फीच्या प्रयत्नावर जया बच्चन संतापल्या, चाहत्याला दिला जोरदार धक्का
नवी दिल्ली – बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या तडक-भडक स्वभावामुळे चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, कॉन्स्टिट्यूशन क्लब परिसरात घडलेला अनपेक्षित प्रकार लोकांना चांगलाच आश्चर्यचकित करतो आहे. घटनेनुसार, जया बच्चन कार्यक्रमानंतर बाहेर पडत असताना, एका तरुण चाहत्याने मोबाईल पुढे करत त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. अचानक आलेल्या या कृतीमुळे...
वारजे-वडगाव-नऱ्हे रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी गडकरींच्या अध्यक्षतेखाली बैठक; रु. ५२ कोटींची मंजुरी.
पुणे: केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी वारजे-वडगाव-नऱ्हे रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामावर चर्चा करण्यासाठी सोमवारी एक बैठक बोलावली आहे. हा रस्ता पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या चांदणी चौकाजवळील भागावर आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्याने हा मुद्दा मांडला होता, त्यानंतर रस्ते मंत्रालयाने या कामासाठी रु. ५२ कोटी मंजूर केले आहेत. सुळे म्हणाल्या, “वारजे उड्डाणपूल आणि मुठा नदीवरील पुलाजवळ महामार्गावर रस्ता अरुंद होत...
पुण्यात १ किलो अफिम जप्त! एका आरोपीला अटक; २१ लाख रुपयांच्या अमली पदार्थाची तस्करी रोखण्यात यश!
पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठं यश मिळवत १ किलो अफिम जप्त केलं असून एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात ५२ वर्षीय नथुराम जीवनराम जाट, मूळचा राजस्थानचा रहिवासी, याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून २१ लाख रुपयांच्या अफिमचा साठा सापडला असून, त्याचा वापर अमली पदार्थांच्या अवैध व्यापारासाठी होणार असल्याचा संशय आहे. माहितीनुसार, आरोपी नथुराम जाट हा एका लाल...
लंडनमध्ये ममता बॅनर्जींना बंगाली हिंदूंचा तीव्र विरोध! आरजी कार आणि संदेशखळी प्रकरणांवर निषेधाचा सूर
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लंडनमध्ये बंगाली हिंदूंकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. आरजी कार हॉस्पिटल आणि संदेशखळी येथील वादग्रस्त घटनांवरून संतप्त नागरिकांनी जोरदार निदर्शने केली. 🔹 ममता बॅनर्जींच्या विदेश दौऱ्यात गोंधळ! ममता बॅनर्जी एका विशेष दौऱ्यावर लंडनला गेल्या असताना तिथे राहणाऱ्या बंगाली हिंदू संघटनांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. बंगालमधील राजकीय हिंसाचार, हिंदू समुदायावरील कथित अन्याय आणि प्रशासनाच्या निष्क्रीयतेबद्दल संताप व्यक्त...















