Breaking News

Home Breaking News Page 194

पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तपदी डॉ. अभिजित चौधरी यांचा पदभार स्वीकार; पुणे महानगर क्षेत्राच्या विकासाला नवी गती देण्याचा निर्धार

0

आकुर्डी, पुणे | प्रतिनिधी Pune Metropolitan Region Development Authority (पीएमआरडीए) चे नूतन महानगर आयुक्त म्हणून Dr. Abhijit Chaudhari (IAS) यांनी आज, ९ मार्च २०२६ रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. आकुर्डी येथील पीएमआरडीए मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात मावळते महानगर आयुक्त Dr. Yogesh Mhase यांनी त्यांच्याकडे कार्यभार सुपूर्द केला. या वेळी अतिरिक्त महानगर आयुक्त Deepak Singla तसेच सहआयुक्त (प्रशासन) Rupali Awale-Dambe यांच्यासह विभागातील वरिष्ठ...

चोरट्यांकडून दोन दुचाकी जप्त! भारती विद्यापीठ पोलिसांची तत्परता; दुचाकी चोरी प्रकरणाचा पर्दाफाश

0

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने दुचाकी चोरी प्रकरणात महत्त्वाची कामगिरी बजावत एकाच आरोपीकडून दोन दुचाकी गाड्या जप्त करून वाहन चोरीचा मोठा कट उध्वस्त केला आहे. ही कारवाई पोलिसांनी प्रचंड बारकाईने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केली असून, आरोपीकडून आणखी चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी, स्पाईस गार्डन हॉटेल लेकटाऊन, पुणे येथे फिर्यादी...

ईरानचा इजरायलवर जोरदार हल्ला! गृह मंत्रालयाच्या इमारतीवर क्षेपणास्त्रांनी थेट निशाणा; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला

0

मध्यपूर्वेतील तणाव अधिकच चिघळला आहे. आज सकाळी ईरानने इजरायलच्या गृह मंत्रालयाच्या मुख्य इमारतीवर थेट क्षेपणास्त्र हल्ला करून ती इमारत उध्वस्त केली, अशी माहिती आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ईरानचा निर्णायक आणि प्रतिशोधात्मक हल्ला 🔹 ईरानकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे इजरायलमध्ये खळबळ उडाली आहे.🔹 "ईरान ही काही खेताची मूळी...

पुणे पोलिसांची अंमली पदार्थविरोधात मोठी धडक! आठ दिवसांत ६४ किलो गांजा जप्त, ओडिशा व धुळे येथून आलेले आरोपी अटकेत

0

पुणे शहरात अंमली पदार्थ तस्करीवर कठोर कारवाई करत अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी आठवडाभरात दोन मोठ्या कारवायांमध्ये तब्बल ६४ किलो गांजा जप्त करत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर एक विधिसंघर्षित बालक सुद्धा या प्रकरणात अडकला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांज्याची एकूण किंमत सुमारे ₹१३,२८,०००/- इतकी आहे. आजची कारवाई – पुणे रेल्वे स्थानकाजवळून ३० किलो...

संविधान दिनी पिंपरी चिंचवड महापालिकेत अभिवादन, सामूहिक प्रास्ताविक वाचन; ‘संविधानिक मूल्यांनुसार पारदर्शक प्रशासन’ — अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर

0

भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत पिंपरी चिंचवड महापालिकेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्य प्रशासकीय इमारतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. संविधान दिन हा लोकशाहीच्या प्रवासातील एक स्मरणीय टप्पा असल्याचे भासत होते, आणि या कार्यक्रमामध्ये संविधानातील मूल्यांना पुन्हा एकदा दृढनिश्चयाने स्वीकारण्याचा संकल्प करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त...

मुंबईतील हॉस्पिटल रिक्रूटमेंट घोटाळा उघड! HBT ट्रॉमा सेंटरवरील बनावट डॉक्टर नियुक्ती प्रकरणाची BMC कडून उच्चस्तरीय चौकशी सुरू

0

मुंबई : जोगेश्वरी (पूर्व) येथील HBT ट्रॉमा केअर सेंटरमध्ये मोठा रिक्रूटमेंट घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. बनावट डॉक्टर, बोगस नियुक्त्या, मुलाखतीशिवाय भरती, तसेच पगार हडप केल्याच्या गंभीर तक्रारी समोर येताच रुग्णसेवेशी निगडित या संवेदनशील विभागातील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ६० ते ७० डॉक्टर मुलाखतीशिवाय नियुक्त? तक्रारीनुसार ऑक्टोबर...

संतोष देशमुख हत्या प्रकरण: फरार वाल्मिक कराड पुण्यात शरण, १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली

0

पुण्यात खळबळ माजवलेल्या संतोष देशमुख हत्येप्रकरणात अनेक दिवस फरार असलेले आरोपी वाल्मिक कराड अखेर सीआयडीसमोर शरण आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय बनलेल्या कराड यांना पुण्यात सीआयडी न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. काय आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण? संतोष देशमुख यांची हत्या हे मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेले प्रकरण आहे. या घटनेमुळे देशमुख कुटुंबाला...

“पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा”

0

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पडली. आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी ९२ तक्रारी वजा सूचना मांडल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी सर्व क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज पार पडलेल्या जनसंवाद  सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह  या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे १२, ९, २, १८, ३, ८, ८ आणि ९ अशा एकूण ६९ तक्रारवजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या. महापालिकेच्या वतीने  जनसंवाद सभेसाठी...

हिंदमातामध्ये पुन्हा पूरस्थिती; BMC च्या अपयशावर पावसाचं खापर, नागरिक संतप्त

0

मुंबई | २८ मे २०२५ —मुंबईच्या हिंदमाता परिसरात सोमवारच्या पहिल्या जोरदार पावसात पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली, आणि नेहमीप्रमाणे महापालिकेचे अपयश समोर आले. बीएमसीने यावेळी देखील पावसावर जबाबदारी ढकलत सांगितले की, "मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर आल्यामुळे पंप सुरू करायला उशीर झाला." हिंदमात्याचा दरवर्षीचा पूरकाळ हिंदमाता हा परिसर दरवर्षी मान्सून आणि अगोदरच्या पावसात जलमय होतो. मागील दोन वर्षांत या ठिकाणी ११...

पुण्यात गोळीबार करून फरार झालेल्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश; ५ आरोपी ताब्यात, विदेशी पिस्तूल व मोटारसायकल जप्त

0

पुणे : पुणे शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या धक्कादायक गोळीबार प्रकरणातील आरोपींना पुणे पोलिसांनी शिताफीने अटक करत मोठे यश मिळवले आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशन आणि खंडणी विरोधी पथक-१ यांच्या संयुक्त कारवाईत या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपींसह एकूण पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट...

Copyright ©