पुणे शहरात अंमली पदार्थ तस्करीवर कठोर कारवाई करत अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी आठवडाभरात दोन मोठ्या कारवायांमध्ये तब्बल ६४ किलो गांजा जप्त करत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर एक विधिसंघर्षित बालक सुद्धा या प्रकरणात अडकला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांज्याची एकूण किंमत सुमारे ₹१३,२८,०००/- इतकी आहे.
आजची कारवाई – पुणे रेल्वे स्थानकाजवळून ३० किलो गांज्यासह दोन आरोपी अटकेत
आज दिनांक ०१ मे २०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पुणे रेल्वे स्थानक आउट गेट समोर पेट्रोलिंग दरम्यान ओडिशा राज्यातून आलेले दोन संशयित तस्कर पकडले.
➡️ अटक आरोपींची नावे:
-
पप्पु चक्रधर देवरी, वय ३२ वर्षे, रा. रसलपुर, ओडिशा
-
चंदन सुभाष कुंवर, वय १९ वर्षे, रा. कटक, ओडिशा
या दोघांच्या ताब्यातून ३० किलो गांजा (किंमत ₹६,२४,०००/-) व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून बंडगार्डन पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४५/२०२५ नुसार NDPS कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(क), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील कारवाई – खडकी परिसरात धुळे येथील आरोपीकडून ३४ किलो गांजा जप्त
याच पथकाने २२ एप्रिल २०२५ रोजी खडकी परिसरात नॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्सजवळ, वाकडेवाडी येथे पेट्रोलिंग दरम्यान धुळे येथून आलेले दोन इसम अटक करण्यात आले.
➡️ आरोपींची नावे:
-
राकेश रूपसिंग पावरा, वय २५ वर्षे, रा. दापचेपाडा, शिरपूर, धुळे
-
एक विधिसंघर्षित बालक, वय १७ वर्षे, रा. धुळे





