मुंबई : जोगेश्वरी (पूर्व) येथील HBT ट्रॉमा केअर सेंटरमध्ये मोठा रिक्रूटमेंट घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. बनावट डॉक्टर, बोगस नियुक्त्या, मुलाखतीशिवाय भरती, तसेच पगार हडप केल्याच्या गंभीर तक्रारी समोर येताच रुग्णसेवेशी निगडित या संवेदनशील विभागातील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
६० ते ७० डॉक्टर मुलाखतीशिवाय नियुक्त?
तक्रारीनुसार ऑक्टोबर २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान जवळपास ६०-७० डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. आश्चर्य म्हणजे—
-
एकाही डॉक्टरची मुलाखत झाली नाही,
-
एक करारनिहाय क्लर्क सांगितलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून सर्व नियुक्त्या करत असल्याचा आरोप,
-
अनेक डॉक्टरांना नियुक्ती देऊन कामावर न बोलावण्याचा संशय,
-
तर काहींना ‘घोस्ट डॉक्टर’ म्हणून नोंदवून पगार हडप केल्याची शक्यता.
या प्रकारामुळे रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम झाला असण्याची भीती व्यक्त होत आहे.
रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर — ट्रॉमा सेंटरची कामगिरी धोक्यात
जोगेश्वरी ट्रॉमा सेंटर हे मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील अपघातग्रस्त व आपत्कालीन रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. जर खरोखरच बोगस डॉक्टर किंवा अनुपस्थित कर्मचारी नियुक्त झाले असतील, तर रुग्णांची सेवा धोक्यात आल्या शिवाय राहणार नाही. अनेक गंभीर प्रकरणांमध्ये या ट्रॉमा सेंटरवर लोकांचीच आशा असते.
BMC ची तीन सदस्यीय चौकशी समिती नियुक्त
ही प्रकरणे गंभीर आहेत याची दखल घेत BMC ने तातडीने तीन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे:
-
मृणालिनी सर्वे – जॉइंट चीफ पर्सोनेल ऑफिसर, कूपर हॉस्पिटल
-
डॉ. नीलम रेडकर – विभागप्रमुख, मेडिसीन, कूपर हॉस्पिटल
-
डॉ. घनश्याम आहुजा – कार्यवाहक डेप्युटी डीन, LTMG हॉस्पिटल






