Breaking News
कांवड यात्रेच्या मार्गावरील सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी मालकांची नावे प्रदर्शित करावीत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आदेश
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी कांवड यात्रेच्या मार्गावरील सर्व हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानाबाहेर मालकांची नावे प्रदर्शित करण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयाचा उद्देश धार्मिक यात्रेकरूंच्या सुरक्षिततेचे रक्षण आणि त्यांच्या यात्रेच्या पवित्रतेची खात्री करणे आहे. आता प्रत्येक खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी, ते रेस्टॉरंट असो, रस्त्याच्या कडेला असलेले ढाबे असो किंवा खाद्य गाडी, मालकाचे नाव व माहिती प्रदर्शित करणे...
फरार आरोपीस येरवडा पोलिसांची शिताफीने जेरबंदी — मोक्का अंतर्गत मोठी कारवाई!
पुणे : येरवडा पोलीस स्टेशनच्या पथकाने सहा महिन्यांपासून फरार असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीस अखेर गजाआड करण्यात यश मिळवले आहे. हा आरोपी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणात फरार होता. पोलिसांच्या दक्षतेमुळे आणि गुप्त बातमीच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आली. गुन्हा क्रमांक १८३/२०२५ अंतर्गत आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ११८ (१), ११८ (२), ३५१(३)(५), आर्म्स...
चिखली-जाधववाडी परिसरात आज पाणीपुरवठा बंद! मेट्रोच्या कामासाठी मुख्य जलवाहिनी स्थलांतरित — नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचं आवाहन
पिंपरी-चिंचवड : चिखली आणि जाधववाडी परिसरातील नागरिकांना आज (मंगळवार, ११ नोव्हेंबर २०२५) पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. निगडी भक्ती शक्ती चौकात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून चिखली-जाधववाडी परिसराकडे जाणारी मुख्य जलवाहिनी स्थलांतरित करण्याचं काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत हाती घेण्यात आलं आहे. या जलवाहिनी स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात...
“सातारा पोलिसांना हवे असलेले कुख्यात आरोपी पुण्यात जेरबंद — दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची अचूक टप्प्याटप्प्याने केलेली कारवाई”
पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक–१ ने सातारा शहर पोलीस स्टेशनला हव्या असलेल्या दोन गंभीर गुन्ह्यांमधील पाहिजे आरोपीला अचूक माहिती आणि शिताफीने आखलेल्या सापळ्यात पकडले. निखील अशोक काळे (वय २२, रा. मातंग वस्ती, कोडोली, सातारा) असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध सातारा शहर पोलिसांत गंभीर कलमांखाली दोन गुन्हे दाखल आहेत. गोपनीय बातमी आणि पुणे पोलिसांचा...
“कानपूरमध्ये भरधाव ई-रिक्षाने महिलेला धडक दिली, महिला मृत्यूमुखी; CCTV फुटेजने उघडली घटना”
कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका धक्कादायक घटनेत भरधाव ई-रिक्षाने एका महिलेला धडक देऊन ठार केले. ई-रिक्षा घटनास्थळावरून फरार झाला. CCTV फुटेजने या घटनेचा साक्षात्कार करावा लागतो. फुटेजमध्ये एक ई-रिक्षा प्रचंड वेगात जात असताना महिला धडकली आहे. धडकेत महिला रस्त्यावर फेकली गेली आणि त्यानंतर रस्त्यावर असलेल्या लोकांनी तिला उचलण्यास मदत केली. या हृदयद्रावक घटनेने कानपूरमध्ये सर्वत्र चिंता आणि संताप व्यक्त केला आहे....
अमितेश कुमार पुण्याचे नवे पोलीस आयुक्त, तर रवींद्र कुमार सिंगल यांच्याकडे नागपूरची धुरा
पुण्याचे विद्यमान पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बढती झाली असून त्यांच्या जागी नागपूरचे पोलील आयुक्त अमितेश कुमार यांची नियुक्ती झाली आहे. अमितेश कुमार यांची पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. इतरही अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बढती आणि बदल्या करण्यात आल्या आहेत. रितेश कुमार होमगार्डचे महासमादेश पुण्याचे पोलिस आयु्क्त असलेल्या रितेश कुमार यांची होमगार्डचे महासमादेश म्हणून बढती करण्यात आली आहे. होमगार्डचे...
टाळ–मृदुंगाच्या गजरात पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘दिंडी – मतदानाची’ काढत केला लोकशाहीचा जागर
पिंपरी : "मतदार राजा जागा हो-लोकशाहीचा धागा हो" अशा घोषणानी दुमदुमला परिसर सोबत टाळ–मृदुंगाचा गजर... लोकशाहीच्या मूल्यांचा जयघोष.. महापुरुषांची वेशभूषा साकारलेले विद्यार्थी… वारकरी परंपरेचा साज आणि भक्तिरसाने भारलेले वातावरण… अशी संस्कार, इतिहास आणि मतदानाचे महत्त्व यांचा संगम साधणारी ‘मतदानाची दिंडी’ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथील संतपीठ परिसरात काढण्यात आली. या दिंडीच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराने मतदान करणे हीच लोकशाहीची...
आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीपूर्व मंजूर कामांची माहिती मागवली! तुषार कामठे यांची पारदर्शकतेसाठी ठाम भूमिका — महापालिकेतील घोटाळ्यांवर नव्या चौकशीची मागणी जोरात
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीनंतर अनेक प्रलंबित आणि मंजूर कामांबाबत अनियमिततेचे आरोप पुढे आले आहेत. विशेष म्हणजे, या सर्व संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पुढाकार घेतला आहे. तुषार कामठे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीपूर्व ३० दिवसांत मंजूर झालेल्या सर्व भांडवली कामे...
मराठी अभिनेत्री हर्षदा खानविलकर ह्यांनी खदखद व्यक्त केली…..आपली लेक पण कुठेतरी सून आहे, हे सासूबाईंनी…”,
हर्षदा खानविलकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सासू-सुनेच्या नात्यावर भाष्य केलं. रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना "सुरुवातीपासून सासूबाईंनी कसं वागायला हवं, जेणेकरून पुढचं सगळं सोपं होईल?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत त्या म्हणाल्या, "पूर्वी आई मुलींना सांगून पाठवायची की सासूला आईच समज. सासूबाईंचंही म्हणणं असायचं की तू माझ्या मुलीसारखीच आहेस. पण हे सगळं कशाला? आई आहे मला....
पुणे रेल्वे स्थानकांवर तिकीट तपासणी मोहीम राबवली; एकाच दिवशी ५९४ प्रवासी पकडले, ₹२.११ लाखांचा दंड वसूल
पुणे (दि. १७ जून २०२५): पुणे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत एकाच दिवसात तब्बल ५९४ बिनतिकीट, अनियमित तिकीटधारक व परवानगीशिवाय सामान घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण ₹२,११,३८० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. ही मोहीम पुणे रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अनिल...















