Home Breaking News फरार आरोपीस येरवडा पोलिसांची शिताफीने जेरबंदी — मोक्का अंतर्गत मोठी कारवाई!

फरार आरोपीस येरवडा पोलिसांची शिताफीने जेरबंदी — मोक्का अंतर्गत मोठी कारवाई!

107
0
पुणे : येरवडा पोलीस स्टेशनच्या पथकाने सहा महिन्यांपासून फरार असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीस अखेर गजाआड करण्यात यश मिळवले आहे. हा आरोपी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणात फरार होता. पोलिसांच्या दक्षतेमुळे आणि गुप्त बातमीच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आली.
गुन्हा क्रमांक १८३/२०२५ अंतर्गत आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ११८ (१), ११८ (२), ३५१(३)(५), आर्म्स अ‍ॅक्ट कलम ४ (२५), म.पो. अधि.क. ३७ (१)(ब), १३५, तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट ३,७ आणि मोक्का कलम ३ (१)(२), ३(२), ३(४) या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल होता.
गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून पोलीस अंमलदार नटराज सुतार आणि अक्षय शिंदे यांना आरोपी करण खंडेराव कुंभार (वय २४, रा. इराणी मार्केट, येरवडा, पुणे) ताडगुत्ता परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीस शिताफीने पकडले. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यास अटक केली.
या कारवाईत मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस अप-आयुक्त (परिमंडळ-४) श्री. सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके आणि गुन्हे निरीक्षक श्री. विजय ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे, प्रदीप सुर्वे तसेच अंमलदार शिंदे, कोकणे, वाबळे, जायभाय, सोगे, कांबळे, सुतार, जाधव, अडकमोल, गायकवाड आणि निलख यांनी सहभाग घेतला. पोलिसांच्या या जलद आणि धाडसी कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि गुन्हेगारीविरोधातील त्यांच्या दृढ निश्चयाचे उत्तम उदाहरण ठरत आहे.