Home Breaking News मनोज जरांगे पाटील तुझ्या सारखं सासऱ्यांच्या जीवावर तुकडा तोडत नाही –...

मनोज जरांगे पाटील तुझ्या सारखं सासऱ्यांच्या जीवावर तुकडा तोडत नाही – छगन भुजबळाची टीका

काल साताऱ्यात मनोज जरांगे ह्यांची सभा आयोजित केली गेली होती, त्यात त्यानी म्हंटले कि मराठ्यांचा ओबीसीत सामावेश झाल्यात जमा आहे. छगन भुजबळ हे राज्यातील चांगले नेते म्ह्णून मानत होतो, परंतु मराठ्यांना आरक्षण मिळणार हे समझताच ते बिथरलेत, छगन भुजबळ ह्यांच्यावर सभेत कडाडून टीका करण्यात आली, घटनेच्या पदावर बसून ते घटनेची तत्वे पायदळी तुडवत आहे. मराठ्याना आरक्षण मिळणार हे लक्षात आल्याने राजकीय स्वार्थासाठी काही नेत्यांचा कळप तयार झाला आहे. मराठ्यांनी त्यांच्यावर बोलावी एव्हडी त्यांची लायकी नाही असे उदगार जरांगे पाटील ह्यांनी छगन भुजबळ ह्यांच्यावर सभेत टीका केली. जातीय दंगली घडविण्याचा त्यांचा डाव हाणून पाडावा, असे आवाहन त्यानी सकल मराठा समाजाला केला. जोसपर्यंत मराठा समजला आरक्षण मिळणार नाही, तोसपर्यंत मी एक इंच पण मागे हटणार नाही असा निषचय निर्धार मनोज जरांगे पाटील ह्यांनी जाहीर सभेत केला.