Home Breaking News प्राध्यापक नामदेवराव जाधव ह्यांनी महाराष्ट्राचे केंद्र बिंदू, मातबगार अभ्यासू राजकारणी शरद...

प्राध्यापक नामदेवराव जाधव ह्यांनी महाराष्ट्राचे केंद्र बिंदू, मातबगार अभ्यासू राजकारणी शरद पवार ह्यांच्यावर आरोप केल्याप्रकारणी तोंडाला काळे फासण्यात आले ………

पुणे येथे शुक्रवारी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था कार्यक्रमासाठी नामदेवराव जाधव येणार होते, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाधव ह्यांनी शरद पवार ह्यांच्यावर आरोप केले असल्यामुळे त्यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा निर्विणा इशारा दिल्याने पोलीसानी हा कार्यक्रम रद्द करायला लावला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ह्यासाठी राज्यभर आंदोलन सुरु आहे, त्यातच जाधव ह्यांनी शरद पवार ह्यांच्या भूमिकेमुळेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले नाही. त्यानी स्वतः मात्र ओबीसी च्या दाखल्यावर निवडणूक लढविल्याचे आरोप जाधव ह्यांनी केला होता. हे केले गेले आरोप खोटे आहेत त्यामुळे जाधव ह्यांनी माफी मागावी अन्यथा पुण्यात आल्यावर तोंडाला काळे फासले जाईल असा सजड्ड इशारा राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी दिला होता. त्याप्रमाणे जाधव हे सायंकाळी सव्वा पाच च्या सुमारास नवी पेठ येथे आल्याची माहिती मिळताच तेथे ते प्रसारमाध्यमांशी सवांद साधतं असताना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाधव ह्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या तोंडाला काळे फासले, या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला त्यावेळी त्यांच्या अंगरक्षक पोलीस कर्मचाऱ्यांने जाधव ह्यांना त्वरित बाजूला काढून त्यांच्या गाडीत बसवून पुढे पाठवून दिले. नामदेराव जाधव ह्यांनी ह्या घटनेच्या सलोखा म्हणजे लोकशाही व विचारांचा खून आहे असे विधान करीत, शरद पवार आणि रोहित पवार ह्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर कायदेशीर करावी अशी मागणी केली. त्या अनुसरून जाधव ह्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली व अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती विश्रामबाग पोलीसानी दिली.