Home Breaking News उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केली निगडी प्राधिकरण अग्निशमन केंद्राच्या कामाची पाहणी…

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केली निगडी प्राधिकरण अग्निशमन केंद्राच्या कामाची पाहणी…

13
0
दि.१८ फेब्रुवारी २०२६ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून निगडी प्राधिकरण येथे नवीन अग्निशमन केंद्राच्या इमारतीच्या काम सुरू आहे. या इमारतीच्या कामाची महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी संबधित अधिका-यांकडून कामाची माहिती घेत काम मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य़ विभागाअंतर्गंत निगडी प्राधिकरण येथील डॉ. हेडगेवार भवनाजवळ अत्याधुनिक अशा अग्निशमन क्रेंद्राचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी महानगरपालिकेच्या उपमहापौर बाबर यांनी स्थापत्य विभागाच्या अ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ननावरे आणि संबधित अधिकारी यांच्यासह भेट दिली.
            अधिका-यांनी उपमहापौर शर्मिला बाबर यांना या कामाची माहिती दिली. दहा मजली इमारतीत तळमजल्यावर पार्किग, अग्निशमन वाहन पार्कीग, स्टोअररुम, सुसज्ज कार्यालये, व्यायामशाळा, सदनिका इ. गोष्टींचा अंतर्भाव असणार आहे. अग्निशमन केंद्राच्या या इमारतीचे काम मुदतीत पूर्ण करावे. अग्निशमन विभागाला आवश्यक अशा सुविधा तेथे असतील, ही खबरदारी घ्यावी. कामाचा दर्जा राखावा, अशा सूचना यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर यांनी अधिका-यांना दिल्या.