पुणे : शहरात वाढणाऱ्या अवैध अग्नीशस्त्र तस्करीवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. “पुण्यश्लोक” गुन्हे शाखा युनिट-०५ च्या पथकाने गावठी बनावटीची पिस्तुले विक्रीसाठी आणणाऱ्या व ती खरेदी करणाऱ्या आरोपींना रंगेहाथ पकडत ३ गावठी पिस्तुल आणि १३ जिवंत काडतूस हस्तगत केली आहेत.
पुणे शहरात होणाऱ्या अवैध शस्त्रतस्करीबाबत माहिती गोळा करून संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून वेळोवेळी देण्यात येत होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-०५ चे पथक गोपनीय माहिती संकलन करत होते.
दि. १६ जानेवारी २०२६ रोजी पोलीस अभिलेखावरील आरोपी गौस ऊर्फ निहाल गब्बर मोमीन (वय ३६, रा. मिरज, जि. सांगली) हा हडपसर परिसरात गावठी बनावटीचे पिस्तुल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार शशिकांत नाळे व गणेश माने यांना मिळाली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार सापळा रचून काळेबोराटे नगर, हडपसर येथे कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पिस्तुल विकणारा आरोपी गौस ऊर्फ निहाल गब्बर मोमीन तसेच ती खरेदी करणारे आरोपी
-
अजय अरुण गायकवाड (वय २७, रा. म्हाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे)
-
सुनील नागेंद्र जमादार (वय १९, रा. म्हाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे)
यांना ताब्यात घेण्यात आले.





