पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2025–26 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ (तळवडे – रुपीनगर – त्रिवेणीनगर – ज्योतिबानगर) येथे भारतीय जनता पार्टीने आपली ताकद दाखवत अधिकृत उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. श्री. प्रवीण महादेव भालेकर, सौ. शितल धनंजय वर्णेकर, सौ. शिवानी दादासाहेब नरळे आणि श्री. शांताराम कों. भालेकर यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल केले.
उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “तुमची आमची, भाजपा सर्वांची..!” असा नारा देत संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कमळ या चिन्हावर प्रचंड बहुमताने विजय मिळवण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
भाजपचा विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार, पारदर्शक प्रशासन, मजबूत पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, महिला सुरक्षितता आणि युवकांसाठी संधी या मुद्द्यांवर आधारित विकासाचे स्पष्ट व्हिजन उमेदवारांनी मांडले आहे. “काम करणारा पक्ष” म्हणून भाजपची ओळख असून, प्रभाग १२ चा सर्वांगीण विकास हेच आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे उमेदवारांनी सांगितले.
प्रभागातील नागरिकांमध्येही भाजपच्या उमेदवारांविषयी सकारात्मक चर्चा सुरू असून, मागील काळात झालेली विकासकामे आणि पुढील काळातील ठोस आराखडा यामुळे भाजपकडे पुन्हा एकदा विश्वासाने पाहिले जात आहे. “विकासाचा मार्ग, सुरक्षित भविष्य आणि सक्षम नेतृत्व” या त्रिसूत्रीवर प्रभाग १२ मध्ये भाजप जोरदार प्रचार करत असून निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आघाडीवर असल्याचे चित्र आहे.