Home Breaking News पुणे महापालिका निवडणुकीसाठी ‘आप’ची पहिली यादी जाहीर; २५ उमेदवार रिंगणात, स्वबळावर लढणार...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी ‘आप’ची पहिली यादी जाहीर; २५ उमेदवार रिंगणात, स्वबळावर लढणार निवडणूक

पुणे | प्रतिनिधी
आगामी २०२५-२६ पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी (AAP) ने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करून राजकीय वातावरण तापवले आहे. पुणे शहर समितीच्या वतीने मंगळवारी २५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, याची अधिकृत घोषणा पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
यावेळी बोलताना आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले की, “पुणे महापालिकेची निवडणूक गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. या काळात प्रशासकीय राजवटीमुळे नागरिकांनी मनमानी निर्णय, पारदर्शकतेचा अभाव आणि विकासकामांतील गोंधळ अनुभवला आहे. सत्तेसाठी विविध पक्षांमध्ये सुरू असलेली युती-आघाडीची खेळी जनतेने जवळून पाहिली आहे.”
ते पुढे म्हणाले, “संस्कृती आणि शिक्षणासाठी ओळखले जाणारे पुणे शहर आता दुर्दैवाने गुन्हेगारी आणि अपघातांचे शहर बनत चालले आहे. त्यामुळे पुणेकरांना बदल हवा आहे आणि हा बदल आम आदमी पार्टी एक सक्षम पर्याय म्हणून देणार आहे. यासाठी ‘आप’ पुण्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.”
वाहतूक कोंडी, आरोग्यसेवा, दर्जेदार शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि गुन्हेगारीमुक्त पुणे या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत निवडणूक लढवली जाईल, असेही किर्दत यांनी स्पष्ट केले. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी आणि पारदर्शक कारभार करणारी महापालिका उभारणे, हाच आम आदमी पार्टीचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
 जाहीर झालेली ‘आप’ची पहिली उमेदवार यादी (२५ उमेदवार) :
  1. शीतल कांडेलकर – प्रभाग ३ (A) OBC महिला
  2. संतोष काळे – प्रभाग ५ (A) OBC सर्वसाधारण
  3. श्रद्धा शेट्टी – प्रभाग ६ (A) अनुसूचित जाती
  4. शंकर तोरट – प्रभाग ७ (D) सर्वसाधारण
  5. विकास चव्हाण – प्रभाग ८ (A) अनुसूचित जाती
  6. अ‍ॅन अनीस – प्रभाग ८ (C) सर्वसाधारण महिला
  7. सुदर्शन जगदाळे – प्रभाग ९ (D) सर्वसाधारण
  8. आरती करंजवणे – प्रभाग १० सर्वसाधारण महिला
  9. ॲड. कुणाल घारे – प्रभाग १० (D) सर्वसाधारण
  10. ॲड. दत्तात्रय भांगे – प्रभाग ११ (D) सर्वसाधारण
  11. समीर अरावडे – प्रभाग १९ (C) सर्वसाधारण
  12. मधु किरण कांबळे – प्रभाग २२ (A) अनुसूचित जाती महिला
  13. उमेश बागडे – प्रभाग २३ (C) अनुसूचित जाती
  14. विजया किरण काद्रे – प्रभाग २३ (B) OBC महिला
  15. निरंजन अडगळे – प्रभाग २६ (A) अनुसूचित जाती
  16. अनिल कोंढळकर – प्रभाग २७ (D) सर्वसाधारण
  17. ॲड. अमोल काळे – प्रभाग ३१ (D) सर्वसाधारण
  18. निलेश वांजळे – प्रभाग ३२ (D) सर्वसाधारण
  19. सुरेखा भोसले – प्रभाग ३२ (C) सर्वसाधारण महिला
  20. रमेश माते – प्रभाग ३३ (D) सर्वसाधारण
  21. धनंजय बेंकर – प्रभाग ३४ (A) OBC सर्वसाधारण
  22. कुमार ढोंगडे – प्रभाग ३९ (D) सर्वसाधारण
  23. गजानन भोसले – प्रभाग ४० (D) सर्वसाधारण
  24. प्रिया निलेश कांबळे – प्रभाग १४ (A) अनुसूचित जाती महिला
  25. प्रशांत कांबळे – प्रभाग ३८ (E) सर्वसाधारण
या यादीत महिला, OBC, अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण प्रवर्गाला संतुलित प्रतिनिधित्व देण्यात आले असून, स्थानिक पातळीवर सक्रिय व स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना संधी देण्यावर भर देण्यात आला आहे. आगामी काळात आणखी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जाणार असल्याचेही पक्षाने संकेत दिले आहेत.